Monday, October 31, 2011

होता एक मित्र...माणुसकी नावाचा..!!!

''ये ना घरी कधीतरी '' एका मित्राची अपुरी मागणी होती.
माणुसकी होते नाव त्याचे, भेटीच्छा लोचनी चाळवली होती

चटकन उठलो, सहृदय बांधिले, होती सोबतीला हास्याची पुरचुंडी
ओला आनंदाश्रूचा 'कृतज्ञ' सदरा, त्यावर जुनी आपुलकीची गुंडी

''आटपाट नगरात कोणालाही विचार'' अगदी सोप्पा पत्ता होता
कल्पकतेने बनेल रंगरंगोटीत झाकला विध्वंसी जरीपटका होता

अंती हवे असलेले छत्र गावले, थोडी शेजारी दांभिक घाण होती
मी मी करणारे जनावरच सर्व ,पण थोडी सुशिक्षित जाण होती

चव्हाट्यावरच पाय थबकला, विधिलिखिताचे भाग्यप्रताप बघून
''माणुसकी'' भिंतीवर दिसला, दिसले अस्पष्ट हंबरडे निर्माल्यातून

''दया'' दिसला सुपुत्र त्यांचा, कंजूस हसला अन खोटा आदर
कज्जळ ''आत्मा'' बाहेर आली, नजरसलाम अंथरून भ्रष्ट चादर

पोटदु:ख लपवण्यात चपखल दिसले, जगणे मात्र हतबल दिसले
वारसी क्षुल्लकशाही अंशी थोडी, गुणगान करत खोटेच हसले

''असंच चाललंय हो आता इथे'', चांगुलपणास अतिशय त्राण आहे
प्रत्येकाचे देव हजार आराध्य देवी मात्र पैसा विराजमान आहे

माणूस मरतो फुकटात इथे,कावळ्यास पिंड शिवण्या पण वेळ कुठे?
आपण रडण्याचीही किंमत मोजावी, मयताचे सामानही विकत भेटे

एक पडतो की दुसरा उचलतो, या एकतेच्या धड्यांना सजाण आहे
आता गरजू खिडकीतूनच 'जात' मागवतो,चौकातच धार्मिक दुकान आहे

हलका रडलो, जरा अवखडलो, शेवटी सावरून 'आता येतो' म्हण्टले
एक माणुसकीचा अकाल मृत्यू, अन पूर्ण हयातीचे समीकरणच बदलले

कधी एकटाच आता विचार करतो, ''माणुसकी'' मय आठवण ही येते
ते निघतानाचे ''दया''चे शेवटचे वाक्य, सर्व भान थोबाडीत मारून जाते

''या हो घरी कधीतरी'' थांबा,.. आमच्या मुलांना पण भेटायची तहान आहे
हा बघा थोरला धर्म, मधला राज्यपात, अन हा देश सर्वात लहान आहे
.
.
त्यानंतर जाणे कधी झालेच नाही हो.....!!!! ..वाटलंच नाही जावसं....!!!!

तनवीर सिद्दिकी

Saturday, October 29, 2011

अभूतप्रेम

'अजून एक बनव' - एका हाताने ग्लास सांभाळत आणि एका हात टेबलावर ठेवून स्वत:ला सावरत शाहिद अस्पष्ट बोलला.
'बस..बस..पुरे..आधीच चढलिये तुला..' - लोकेशने समजूत घातली..
'@#%&, टाक रे..' .. शाहिदचा स्वर आता थोडा भिजून हलका झाला होता..
'अरे पण झाल तरी काय?..कोणी काही बोललं का? ती काही बोलली का ?... आपण काहीतरी मार्ग काढूच की..सांग तरी... ' - लोकेश

शाहिद आपल्याच तंद्रीत होता. समोरची पूर्ण बाटली एकट्यानेच संपवणे ही जणू काही काहीतरी मोठी महत्वाची जबाबदारी आपल्या अंगावर टाकली गेली आहे अश्या अविर्भावात तो पटापट एक-एक पेग रिचवत होता. लोकेश काहीतरी विचारतोय, एक-दोन पेग रागात, जास्त चढल्याने त्याच्या शर्टवर पडून शर्ट भिजलाय, त्याला काही काही भान नव्हते. डोक्यात विचारांचे तांडव चालले होते. डोळ्यासमोर झापड येत होती. तो शांत आकाशाकडे बघत अधून मधून ग्लास तोंडाला लावत शांत बसला होता. चेहऱ्यावर कुठलाच भाव नाही... राग, द्वेष, ईर्ष्या... कसलेच नाही..लोकेश ही एव्हाना विचारून दमला होता. त्यानेही शाहीदला थोडा वेळ एकटाच सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या पाठीवर एक सहानुभूती मिश्र मैत्रीची एक थाप मारत तो उठून तो खाली आपल्या रूमवर आला.

शाहिद अजून गच्चीवरच होता. रातकिड्याचा आवाजच काय तो फक्त शांततेशी लढत होता. फक्त एक-दोनच झुरके ओढलेली सिगरेट हातातच जळून अर्ध्यापर्यंत आली होती. मध्यरात्रीला मिनिटाभराचा अवकाश असेल..!! सोसायटीच्या रखवालदाराच्या शिट्या धूसर ऐकायला येत होत्या..आणि त्यात कुत्र्याची भू-भू.. ..पण शाहीदची शून्यावस्था मात्र काही भंग होत नव्हती. तो असंच अजून..आपला आभाळात अंधार मोजत..!!.. आणि त्यात हा विचारांचा गदारोळ...!!

.....किती आनंदात गेला होता तो!! किती दिवसांनी त्याच्या महत्प्रयासाला देव पावल्यासारखे वाटले होते. आणि आता?.. आता तर सगळी स्वप्ने,सगळ्या इच्छा धूसर झाल्यागत दिसत होत्या. ''देव देतो आणि कर्म नेते'' अस म्हणतात पण यात देव देवून चुकला की कर्म हिसकावून घेवून जातंय म्हणून दोषी हेच काही उलगडत नव्हत. आयुष्यात अश्या किचकट अभूतपूर्व परिस्थितीला सामोरे जावे लागेल असं त्याने कधी उभ्या जन्मात तर सोडा पण 'आडव्या' स्वप्नात ही विचार केला नव्हता. सर्वच विधिलिखित असते हे मान्य, पण अचानक एवढ्या मोठा पेचप्रसंग आयुष्यात यावा अन त्यात देवाने मानसिक रित्या हतबल आणि भावनिक रित्या मृत करून टाकावे हेच त्याला पटत नव्हते. 'हे अस का झाल?' , 'मग झालंच तर माझ्याबरोबरच का झाल?', 'आता मी काय करू?', 'मी हा निर्णय एकटा घ्यायच्या लायकीचा आहे?', 'निर्णय चुकला तर?' - असे भरपूर प्रश्नबाण हृदयावर वार करत होते. पण निरसनासाठी कुठला प्रश्न पहिले विचारत घ्यावा हा प्रश्न सुटत नव्हता. मेंदू मूक वाटत होता. श्वास बधीर झाला होता.आकाशातल्या अंधाराबरोबर जणू त्याच्या उघड्या सताड डोळ्यासमोरच्या दु:खकाळोखाची स्पर्धाच चालू होती..!!

एव्हाना कुत्र्यांचा आरडओरडा उतरणीला आला होता.जग नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशीच्या दैनदिनिच्या युध्दासाठी सज्ज होण्यासाठी निद्रा राणीबरोबर आराम करत होते.चांदण्या आभाळाचे पांघरून घेवून अधून मधून एक-दोन डुलक्या मारून वामकुक्षीचा आस्वाद घेत होत्या.दारूची संपलेली बाटलीही टेबलावर शांतपणे पहुडली होती.एवढावेळ साथ देणारी न ओढलेली सिगरेटही त्याच्या हृदया प्रमाणेच पण एका ठराविक मर्यादेपर्यंत जाळून त्याच्या बोटापर्यंत आली होती. एक हलकासा चटका त्याच्या बोटांना लागला तोच तो भानावर आला. अंधुकशी, हलकीशी वेदनामय किंकाळी देत त्याने थोटूक भिरकावून दिल. अर्धवट उघड्या डोळ्यांनी आजूबाजूचा वेळेचा अन परिस्थितीचा कानोसा घेतला. काहीतरी माचीस वगैरे शोधत काळोखात अंधाराचा अंदाज घेत उठण्याचा प्रयत्न करू लागला. एक आकृती त्याच्याजवळ लगबगीने त्याला सावरायला येताना त्याच्या दिशेने सरकताना त्याला दिसली.

तो लोकेश होता..!!

शाहिदचा हात पटकन आपल्या मानेमागे खेचत लोकेशने त्याला उभे केले. आणि खडसावत बोलला.
'@#%&..चल पुरे आता..जेवून घेवू..थोडा आराम कर आता..जास्त झाली आहे तुला '

शाहिदला काय झाले आहे नक्की? उद्या विचारतो..अस मनाशी ठरवत लोकेशने शाहिदला खाली रूमवर आणले.

x x x x x x x x x x

चित्रात, स्वप्नात, चित्रपटात, गोष्टीत, कवितेत अगदी उघड्या डोळ्यांच्या बाहुपाशात दिसणारी भावी जोडीदाराची संकल्पना 'मधु' या व्यक्तिमत्त्वाशी अचूक जुळली याचा अतोनात आनंद शाहिदला गगनात मावेनासा झाला. अगदी पहिल्या भेटीत जेव्हा हस्तांदोलन करताना मधु जेव्हा त्याच्यासमोर आली तेव्हा त्याच्या हृदयाचा एक ठोका तर चुकलाच..!! ''वो जो भी होगी जब भी मेरे सामने आयेगी ना, तो दिल मे गिटार बजेगी देखना..'' अस जेव्हा तो आपल्या स्वप्नाळू दुनियेत विरून लोकेशला सांगायचा त्याची पूर्ती आज झाल्यासारखी त्याला वाटत होती.तिचा आज ऑफिस मधला पहिलाच दिवस होता . ओळखीपाळखीचा कार्यक्रम चालू होता . तिने समोर येवून एक'प्रोफेशनल' स्मितहास्य दिल. शाहिद सुखावून गेला. त्याला ते प्रोफेशनल' स्मितहास्य पण फार अगदी मनमोहक वाटल तो मधूच्या पहिल्याच नजरभेटीत घायाळ झाला होता.त्या भिरभिरेपणात त्या सोंदर्यवतीचा हात त्याच्या हातात पाच मिनिटे असंच अटकून आहे अन तो नाजूकपणे विळख्यातून सुटण्याची धडपड करत आहे याची त्याला शुद्धच नव्हती. लोकेश बाजूला आपल्या पाळीची वाट पाहत होता. त्यानेही शाहीदला नकळत कोपरा मारून जागे करण्याचा प्रयत्न केला. पण तेही व्यर्थ..!! शेवटी पहिल्या भेटीतच बुजगावणे झालेल्या शाहीदला पूर्व अवस्थेत आणण्यासाठी एका मंजुळ आवाजाची वातावरणात 'इंट्री' झाली होती.

''मी मधु.. मधु कामतेकर'' ..
''अ?..हो..हो.... मी शाहिद.. शाहिद खान....''
''Nice to meet you'' - परत मंजुळ आवाज
मधुनेच अप्रत्यक्षरीत्या 'झाली की ओळख आता तरी हात सोडा' असा भाव डोळ्यात आणत सांगितले.
''Ohh Sorry...'' तिचा हात अजून आपण बावळट सारख धरून ठेवलाय याची जाणीव त्याला झाली आणि लगेच हात सैल झाले. ती पुढे सरकली. शाहिद मान खाजवत ओशाळून खाली बघू लागला. आजूबाजूला काही दबके हास्यफवारे फुटलेत हे त्याच्या कानाने टिपले पण खाली बघत असल्याने पुढे जावून पण खास मागे वळून मधूने खास शाहिदला दिलेला प्रेमळ अन कुतुहूल पूर्ण 'लुक' मात्र त्याच्या नजरेतून चुकलंच..!!

''ती बघत होती तुझ्याकडे..'' - कैन्टीन मध्ये लोकेश चा मिस्कीलपूर्ण खडा..!!
''नाही रे नसेल..खर काय?'' - शाहिदला उत्तर हवेच होते..
''................................'' -लोकेशच मंद हास्य..
''सांग रे..खर काय?..'' - शाहिदची बेचैनी आकाशापर्यंत पहोचली.
''जेवा गप्प....तू काय मोठा राजा आहेस?....का बघेल तुला ती?'' - लोकेश अजूनही थट्टेच्याच मूड मध्ये
'असू दे.. चल जेव..आपल्याला काय?..' शाहिद ने विषय संपवला..

.....
........
मधु..मधु यशवंत कामतेकर..
वय -..२५ वर्ष २ महिने १४ तास आणि २७ मिनिटे
उंची- ५ फुट ६ इंच.
वर्ण - गोरा.
अजूनही अविवाहित..!!
डिझायनिंग विभागात कारकून..

त्या पहिल्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत शाहिदने नकळत इथ्यंभूत माहिती काढलीदेखील..!! अर्थात त्या गोष्टीचा अंदाज कोणालाच आला नाही म्हणा. पण एका छुप्या एकतर्फी प्रेम कहाणीची सुरवात मात्र ऑफिसमध्ये सुरू झाली होती.....

x x x x x x x x x x

प्रेम..!! या शब्दाच खर अस्तित्व काय?. जात काय ?. नक्की व्याख्या काय ?.. कोणीच सांगू शकत नाही. पण प्रेमात माणूस आपल्या अस्तित्वापलिकड़े स्वप्न बघू लागतो . अशक्य गोष्टीही शक्य वाटू लागतात . मग ते कधीही आणि कोणावरही झालेल असो ..!! त्याचे सर्व दोष एकतर अचानक आवडू लागतात नाहीतर किमान त्या सर्व उणीवाशी तडजोड करण्याची भावना आणि ताकद आपल्यात येते . समोरचा जसा असेल तसा स्वीकार करण्याची मानसिकता तयार होते . आणि एकंदरीत आपल्या आवडीचा जीव त्याच्या असणाऱ्या सर्व चांगल्या वाईट सवयीबरोबर कसा मनात रुततो काही कळतच नाही ….

शाहिदलाही असंच काहीतरी झाल होत ..!!. संपूर्ण तन-मन-श्वासात 'मधु' नावाचा एक जहाल विषाणू फार वेगात संक्रमित होत होता. खंबीर मनाला प्रेमाची बुरशी लागत होती.

तसं दोघांच्या स्वभावाचा-व्यक्तिमत्वाचा एकत्रित विचार करून जर अनुमान काढला तर जशी क्षितिजाची दोन टोके..!! मधु तशी कमी बोलणारी..मितभाषी..जवळ जवळ कंटाळवाणीच. आणि शाहिद हसरा-बोलका- बडबड्या दिलखुश माणूस. मधु तशी सोज्जवळ..पण वक्तशीर. कोणाच्या जास्त अध्यात मध्यात नसणारी. दिवसभर काम एके काम आणि मर्यादित बोलण हसण आणि मग घर. अगदी जेवताना सुद्धा सर्वात जास्त मिसळायची नाही. त्रयास्थसारखी घोळक्यात असून पण एकटीच. याउलट शाहिद तसा कामात ठीक ठाक पण उनाडक्या..कामाचा जास्त बाऊ न करणारा.. ह्याला चिडव, त्याची खेच अस मजेशीर जीवन जगत पूर्ण ऑफिसच वातावरण ही मजेशीर ठेवणारा..करणारा.. सर्व जण त्याला पसंद करत..आणि या साहेबांची गाडी मात्र वेगळ्याच स्टेशनवर थांबली होती. आणि त्यामुळे त्याने मधुच्या नीरस जीवनात मैत्री आणि प्रेमाचा रंग ओतण्याचा चंग बांधला.

''काय मधु?.. काय आणलाय डब्यात?.''. - आतापर्यंतच दुसर संभाषण..

मधु ने न बोलता डबा पुढे केला.. आता कारल्याची भाजी होती.

तसा शाहिदला राग यायला हवा होता. सर्वजण एकत्र बसले होते. आणि मधूने 'हव तर घे' अश्या स्वरुपात डबा पुढे केला होता.

''अग मधु, या ऑफिसमध्ये बोलायचे पैसे कापत नाहीत पगारातून.. बोलण फुकट आहे..बोलत जा बिनधास्त..''

क्षणभर सर्वजण शांत. एकतर मधु जास्त बोलत नाही..तिच वैयक्तिक आयुष्य. त्यात हा टोमणा. ओळख ना पाळख..काय रिस्पोंस देईल देव जाणे..!!

''हा हा हा हा .....'' ती चक्क हसली..मधु कामतेकर..चक्क मनमोकळेपणाने हसली.. सर्वजण खूप खुश झाले..

''अरे बापरे, तू हसतेस पण..?...'' - शाहिद चा टोमणा नंबर दोन..

''हा हा हा हा.. हो मग..!!'' - मधूला तो हलकासा विनोद खूप आवडला होता बहुतेक..!!

''नशीब आमच...बर उत्तर नाही दिलंस तू?... भाजीच नाव काय आत डब्यात चिकटवलय काय?.. मला तर कळलीच नाही कुठली भाजी ही?..''

''अरे वेड्या..कारल्याची भाजी ती..घे मस्त आहे..'' - इति मधु..( पहिल्याच बोलण्यात थेट 'वेडा' म्हणते..?..सर्वजण क्षणभर कुतुहुलाने चूप.. )

आपण अचानक शाहिदला वेडा बोललोय हे मधु लाही उमगल.. ती ओशाळली..

''ओह्ह. सॉरी हा..चुकून..'' - मधु ओशाळली होती..

''राहू दे ग..माझ टोपण नाव आहे ते..'' - शाहिदकडे सर्व गोष्टीवर उत्तरे होती..

हसत मिसळत डबा खाण्याचा कार्यक्रम संपला. यावेळी मधु ही मनपूर्वक सामील झाली होती. यावेळी मात्र लपत लपत शाहिद आणि मधुच डोळ्याने झालेलं संभाषण सर्व मंडळीकडून हुकल होत...!!

आता सर्व सुरळीत चालू होत.

सर्वच स्वभाववैशिष्टे भिन्न असून पण हळू हळू शाहिद मधु कडे खेचला जावू लागला होता. तिच कमी बोलण, कमी हसण पण त्याला आवडायला लागल होत. मध्ये मध्ये फुकटच काहीतरी काम काढून मधुशी संवाद करायचा. तिला बोलत करायचा. हसवायचा. तसं मधूलाही शाहिद विषयी एक आकर्षण होतंच. तिलाही त्याच्याबरोबर वेळ घालवण आवडायचं. हळू हळू मधूही शाहिदच्या स्वभावशी समरूप होवू लागली. ऑफिस मध्ये कामासोबत इतर सर्व गप्पा टप्पात मधु सुद्धा सहभागी होवू लागली होती. जेवण करताना शाहिद च्या विनोद कौशल्यावर दाद देण्यात एका मंजुळ आवाजाची भर पडत चालली होती. पण या सर्वा समोरच्या मैत्रीला प्रेम म्हणता येईल का? मधूला मी असं काही 'विशेष' आवडत असेल का? - शाहिदच्या मनात अधेमध्ये शंकेची पाल चुकचुके. पण निदान आपल्या प्रयत्नाने, वागण्या बोलल्याने मधूच्या वागण्यात बदल झालंय ना...पुरे..बाकी प्रेम वगैरे विचारता येईलच की नंतर..

बदल..!! अगदी सोपेपणात विचार केला तर दोन उपशब्दाच संकुल..म्हणजे बल आणि दल..एखाद्या दलात स्वत:ला सामावून घेण्यासाठी बलपूर्वक केलेला प्रयास. मग ते बल तुम्ही लावा किंवा कोणी दुसऱ्याने. पण व्याख्या अशीच ठरते..नाही?..असे प्रसंग आपल्या जीवनात अनेकदा येतात..मग ते जीवनाविषयी असो, स्वत:च्या परिस्तिथी विषयी किंवा सभोवतालच्या समाजाच्या आपल्या विषयीच्या गरजेविषयी.. पण बदल हे होतंच असतात..होतातच.. फारतर त्याला सुधारित नाव म्हणून अनुकूलन म्हणू आपण फारतर..

मधूचा स्वभाव मनमोकळा झाला होता. नेहमी तिची नजर शाहिदला शोधत असायची. जेवताना धमाल उडत होती. आजकाल संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर पण दोघा-तिघांनी त्यांना एकत्र फिरताना पाहिलं होत. शाहिद अचानक कामात वक्तशीर झाला होता. त्याचे सिगरेटचे प्रमाण फार कमी झाले होते.

आणि अचानक एके दिवशी शाहिद ने एका संध्याकाळी मधूला प्रोपोझ केलाच...!!!

x x x x x x x x x x x

दिवसभर श्वेतवर्ण दिसणारे फेसाळलेले समुद्राचे पाणी सूर्याचे लालसर रंग वापरून त्याच्या अफाट शक्तीला रोखणाऱ्या मळक्या कट्ट्याला आदळत होते..कमी जास्त उंचीच्या लाटा कोणालाही न जुमानता, कोणालाही न विचारता आपल्या कौशल्याचा खेळ किनाऱ्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याना दाखवत होत्या..अधून कुतुहुलाचे पडणारे कटाक्ष बहुतेक त्यांना सुखावत असावेत..!!!! रस्तावरच्या फेरीवाल्यांना , भिखारयाच्या 'सुरेल' गाण्यांना तिथून अंगठाभर दिसणाऱ्या हाजीअलीच्या आवारातून दिलेली अजान व्यत्यय आणत होती..!! कमी वेळ असणारी पण आस्तिक म्हणवणारी काही दुरूनच ओठांना बोटे चाटत पुढे जात होती, थोडा जास्त वेळ असलेली आणि आस्तिक ही म्हणवून घेणारी जरास थांबून जमल्यास एक दोन ओळ्या पुटपुटून, नाहीतर डोळे बंद करून, हसून-रडून -चिंतीत काहीतरी करत आणि परत पूर्ववत होत पुढे पावले टाकत होती..जास्तच वेळ असलेली आणि अस्तीकतेची व्याख्या दिसणारी भल्या मोठ्या अंगाच्या सागराच्या उदरातून कोरलेल्या चिंचोळ्या पायवाटेतून दर्गा दर्शनाला पळत होती...तिथून परतणारी माणसे काही 'सिक कबाब' दाबत होती तर काही रांगेतल्या पहिल्या 'भिकारयाकडून' बंदे सुटे करून पुढच्या सर्व 'भिकाऱ्यांना' ( भिकारी कंसात लिहिणे भागच होते..!! नाही?..) वाटत जात होते...( त्यापेक्षा त्यालाच पैसे देवून 'सबलोक बाट लो रे' असं जमल असते...असो...देवाला दिसणार कसे?...)

अरुणदेवाची 'शिफ्ट' आता संपण्यातच जमा होती. दिवसभर ऊन-घाम-जीवन वाटून दमलेला भास्कर आता 'अरबीत' डुंबण्यात सज्ज होत होता..त्याचा कारभाराचा हलकाच कार्यभार सांभाळण्यासाठी रस्त्यावरच्या नीट मोजमाप करून खोचलेल्या खांबाच्या शिरातली ठिपके(बल्ब) आता हसू लागले होते..वाहनाची वर्दळ वाढू लागली होती..दमलेली पाखरे घोळक्यात आपापल्या घरी परतताना दिसत होती..'जोडप्यांचा' ऋतू चालू झाला होता..फेरीवालाच्या आवाजाला आता जोर चढला होता. दिवसभर आयुष्याशी कुस्ती खेळणारी आणि रोड क्रॉस करून हाजी ला प्रणाम करणारी सर्व डोकी आता त्याला विसरून पुढच्या वळणावरच्या 'क्रॉसरोड' समोर पाणी पुरी,रगडा साठी रांग लावत होती..चंद्र राखणीसाठी तयारी करत, इथून तिथून 'इंट्री' मारत पोझिशन ठरवत होता..

या बदलत्या वातावरणाला भिक ना घालता एक संथ पण अखंड धूर हाजीला कट्ट्यावर दिसत होता आणि त्या धुरामागाचा चेहरा मात्र आस्तिक-वेळ -नास्तिक-काहीही या सर्व कल्पना ना सुरुंग लावत हाजीकडे एकटक बघत होता..कोणाचीतरी वाट पाहत..

एकामागून एक 'वूदंग गरम' मात्र थोड्या थोड्या अंतराने समुद्राचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत होती..उरलेल्या जळक्या राखेच्या आधारावर...!!!!!

'' काय रे साल्या, उतरली का तुझी ?'' लोकेश ने मागून पाठीवर थाप मारली . एव्हाना शाहिदची सिगरेट संपली होती .
'' मी ठीक आहे आता '' - शाहिद ने स्पष्ट केले .
'' मग इथे का बोलावलस ?.. अरे हो तुला गम्मत माहितीये ?.. आज मधु पण आली नव्हती ..आम्हाला वाटल ..'' - लोकेश ने डोळा माराला ..
'' मी दिवसभर मधु बरोबरच होतो ..इथेच..'' - शाहिद ने समुद्राकडे बघत अजून एक गौप्यस्फोट केला..
''अरे वाह्ह.. मग?..काय विशेष?..प्रोपोझ वगैरे केलास की काय?''
''कालच संध्याकाळीच केला होता..''- शाहिदचा अजून एक गौप्यस्फोट
''च्यायला..मग नाही बोलली होती वाटत..अच्छा म्हणून एवढा प्यालास काय?....काय झाल?..काय कारण?.. जात, धर्म, पैसा, की अजून काही?..अरे मित्रा आयुष्यात बदल हे करून घ्यायचेच असतात. आयुष्य जे आपणास जे दाखवत जाते ना, त्या हिशोबाने बदलत जायचं असत.. हे सगळ तिला तू समजावलं असशिलच... आता नाही ऐकत तर काय करणार..?..जावू दे रे..... अजून कोणीतरी चांगली भेटेल रे...... बर झाल लवकरच कळाल उत्तर तुला.. चल निघू.. होता है, दुनिया है..बस अपने आप को दुनिया के रंग मे ढालते चलो और आगे बढो..चल ''- लोकेश त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता..
''ती मला हो बोललीये..'' - शाहिदची नजर बोलताना अजूनही समुद्राकडेच...
''मला समजलं नाही..'' लोकेश बुचकळ्यात पडला..'' म्हणजे ती हो बोलली आणि तुला टेन्शन आहे..चक्क पिण्याएवढ?..या जगातला तू पहिला माणूस असशील ज्याला मुलीने होकार देवूनसुद्धा एवढ टेन्शन येवून त्याने दारू प्यावी..!!

एव्हाना शाहिद ने दुसरी सिगरेट पेटवली होती.

''बोल बे'' - लोकेश किंचित चिडला..
''हम्म..ऐक तर..''

''मधु कामतेकर..यशवंत आणि कोमल कामतेकर यांची एकुलत एक अपत्य. कुटुंब मुळचे लंडनला स्थायिक. लहानपणापासून अगदी ऐशो आरामात वाढलेली. अभ्यासात, खेळात निपुण. बापाचा पसरलेला बिझनेस. फक्त तोंडाने बोलाव की ती वस्तू घरात हजर. शाळेत पण सर्वांना आवडत अस ते मुल. लहानपणापासून जाम बडबड, खेळकर अगदी माझ्यासारख..१० वर्षापूर्वी तिचे आई वडील वारले तेव्हा पासून ती अशी गप्प गप्प राहते. भारतात तिची मावशी राहते ती तिला इथे घेवून आली. तेव्हापासून इथेच आहे.....''

''पण मग यात वाईट काय आहे?.. थोडे बदल तर जीवनात होतातच की रे..थोडी फार तडजोड करावी लागतेच रे..आणि आता तर ती पण हसमुख झालीये'' - लोकेश समजूत घालत होता.. आता शाहिद कडून घेतलेली अर्धी सिगरेट लोकेशच्या ओठात होती.

''१० वर्षापूर्वी तिचे आई वडील का मेले माहित आहे?''
''नाही. काही अपघात?..''
'' त्या आधी मधू कामतेकर.......'' शाहिद ने सिनेमैटेक पोझ घेतला.
''काय?..'' - लोकेश अजूनही बुचकळ्यात.
'' त्या आधी मधू कामतेकर हा एक मुलगा होता..'' - आता पहिल्यांदा शाहिदने लोकेशकडे पाहीले.
''What?.. तू काय बोलतोय तुला तरी कळतंय का?...काळाची उतरली नाही वाटत..!!.'' - लोकेश ला स्वत:च्या कानावर किंवा शाहिद च्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता.
''हो'' - शाहिद ने थंडपणे सांगितले.
''You mean Sex Change?.. लिंगबदल?..'' - लोकेश ला मुद्दा स्पष्ट करावासा वाटला.
''Yup..''
''चल घरी जावू..बस झाल प्रेम..चल उठ..''

शाहिद अजूनही उठला नव्हता..अजून भरपूर सांगायचे होते त्याला..त्याने नजरेनेच लोकेश ला थांब म्हणून सांगितले.

''चार वर्षानंतर मुलगा जन्माला आला त्यामुळे कामतेकर परिवार फार खुश होते. खूप जल्लोषाने मधूच जगात स्वागत झाल.आणि त्यानंतर संगोपनातही काही कसर राहिली नव्हती. त्याचे लाड,मागण्या सर्वच हाताच्या फोडासारख्या जपल्या जायच्या. पैशाची कमतरता नव्हतीच. सर्व सुरळीत चालू होते. पण जसं जसं एकुलत एक अपत्य मोठ ह्यायला लागल तेव्हा एक फार मोठी त्रुटी दिसू लागली होती. मधूचा आवाज तसा लहानपासुनच बायकी. ठीक आहे असेही दोष असतात म्हणून आई बाबांनी पहिले पहिले दुर्लक्षित केले. पण शाळेत जावू लागल्यानंतर त्यांना 'मधु' मध्ये छोटे छोटे पण अमुलाग्र बदल दिसायला लागले होते. बदल म्हणण्यापेक्षा त्रुटीच म्हणा. त्याला मुलींचे कपडे घालायला आवडायचे, त्यांच्यासारख नटण, मुरडण, वगैरे वगैरे. शाळेतपण तो जास्त मुलींमध्ये मिसळलेला असायचा. लहान असताना विरंगुळा समजून या सर्व गोष्टी दुर्लक्षित होत होत्या. पण नंतर मात्र हा बदल त्याच्या बोलण्या-चालण्यात जाणवू लागला होता. आता आई बाबानाही ही गोष्ट नजरेत यायला लागली होती. पण मधू लहान असल्याने दमदाटी आणि हलकी फुलकी मारहाण करून त्याला सुधारवण्याचा प्रयत्न केला जात होता. पण सर्वच विफल..!! शाळेतून काढून त्याला फक्त मुलांच्या शाळेत टाकण्यात आले. पण त्याच्या सवयी काही बदलत नव्हत्या. एव्हाना मधूलाही त्रास ह्वायला लागला होता. शाळेत मुलांकडून चिडवल जाण, मग त्यात दुबळ ठरून मार खाण, कोणी लवकर मैत्री न करणं या सामाजिक अव्हेलनांना तो शिकार होवू लागला होता. तो मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या विकृत आणि आजारी पडू लागला होता. एक-दोनदा अजाणपणे तो आई बाबानाही ''मी एकटा का?, मला सर्व जण चिडवतात का?, माझ्याशी कोणी मैत्री का करत नाही? '' वगैरे विचारे तर त्यावर आई बाबाही निरुत्तर असायचे. तेही उडवा उडवीची उत्तरे देवून त्यालाच दमदाटी करत. त्यानाही तसा त्रास होत होता. एकुलता एक मुलगा अन तोही असं निघावा- त्यांना भार सहन होत नव्हता. मधू समलिंगी तर नाही ना?..असं ही एक वाईट विचार त्यांच्या मनात येवून गेला. शेवटी खूप विचार करून त्यांनी एका मोठ्या डॉक्टरशी संपर्क करण्याचा निर्णय घेतला. मधूची पूर्ण शाब्दिक, शारीरिक आणि मानसिक तपासणी झाली. आणि अहवालात मांडण्यात आलेले निष्कर्ष फार किचकट आणि धक्कादायक होते...''

बोलता बोलता शाहिद थोडासा थांबला. त्याने लोकेशला नजरेने खुण करून सिगरेट पेटवायला सांगितले.
मग?..पुढे?.. - लोकेश.

'' कसं असत लोकेश, आतापर्यंत आपण मानवाचे दोनच मुख्यता: विभागात मोजणी करत आलो आहोत - स्त्री आणि पुरुष. त्या नंतर इतर उपविभाग निघाले ही गोष्ट वेगळी पण तितकीच खरी आहे . पण बहुतांशी विभाग दोनच. या विभागात गणना करताना मुख्यता: थोडाश्या परीक्षा/निरीक्षणे असतात. जसं सोनोग्राफी द्वारे लिंगनिश्चिती किंवा जन्माला आल्यावर या व्यक्तीचे शरीर रचनात्मक आणि जनुकीय घटक. पण अजून एक गोष्ट जी या सर्वा इतकीच महत्वाची असूनही विचारत घेतली जात नाही ती म्हणजे त्या व्यक्तीची स्वत:च्या लिंगाबद्दल असणारी जाणीव - याला GENDER IDENTITY पण म्हणतात. मधू मध्ये हाच प्रोब्लम होता.

मधू दिसण्यात मुलगा होता. तरी त्याच्यात पुरुष नावाच्या लिंगाविषयी मानसिक जाणीव नव्हती. त्याला स्त्री या लिंगाशी जास्त आकर्षण होते, जाणीव होती. लहानपणापासून या जाणिवेकडे झालेली दुर्लक्षपणा त्याला अजून त्यात ओढत गेला. त्याला मुलींचे कपडे घालणे, त्यांच्यातच मिसळणे आवडू लागले. शाळा बदल्यानंतर त्याचा हाच स्वभाव त्याचा एकटेपणाचे कारण बनू लागला. तो स्वत:ला मुलांमध्ये SECURE समझू शकत नव्हता..- अहवाल बघून आई वडिलांची तर दातखीळच बसली.. काय करावे कळत नव्हते.. पण विज्ञानात यालाही एक उत्तर होते..

डॉक्टर पुढे म्हणाले की जर असंच मधू ला ठेवलं तर तो मोठा होवून अशी एक विकृती बनेल ज्याला नेहमी असं मानसिक त्रास होईल की आपला आत्मा जणू चुकीच्या शरीरात बंदिस्त झाला आहे आणि हा समज त्याला एकतर जगू देणार नाही किंवा तेवढी मानसिकता मग मधू मध्ये तयार करावी लागेल जी सोपी गोष्ट नाही. पण यावर दुसरा उपाय म्हणजे लिंगबदल करून घेणे. हे कायदेशीर आहे आणि त्याच्या आरोग्यासाठी पण बर. किमान त्याला समाजात भिन्नलिंगी म्हणून तरी जगात येईल..

मधूच्या आईवडिलांनी क्रांतिकारक निर्णय घेतला. त्यांनी मधू च लिंगबदल करायचं ठरवलं. पण त्यांना ते स्वत:लाच मानसिकरीत्या झेलता आल नाही. मधू असल्याने नाव बदलाव लागल नाही. पण मुलाची मुलगी झाली. समाजाने ते स्वीकारलं नाही. इज्जतीचे वाभाडे निघाले. कामतेकर परिवाराला वाळीत टाकण्यात आले. त्यांचा कारभार, नाती गोती यावर फरक पडायला लागला. वडील त्या धक्क्याने वारले. मग मागोमाग थोड्या दिवसाने आई पण. मधू आता पूर्णपणे अनाथ झाली. तिची आत्या तिला भारतात घेवून आली. तिच शिक्षण वगैरे मग इथेच झाल. ..- पुढच जवळ पास तुला माहीतच आहे. '' - शाहिद ने एक मोठा श्वास घेतला. एक छोटासा अश्रू नकळत समुद्रात पडला होता.

''काही नाही रे, दुसरी कोणीतरी भेटेल तुला. देवाचे आभार मान की तुला हे सर्व आधीच माहित पडल..आणि त्या मधूचाही विचार आता सोडून दे '' - लोकेश समजूत घालत होता.

शाहिद हसला. अगदी मंद.पण अगदी दिलखुलास ...मनापासून. लोकेशला चूकचुकल्यासारखे झाले.

''काय झाल?''
''मी मधू बरोबरच लग्न करणार आहे..'' - शाहिद. आता समोरचा समुद्रही लोकेशसारखाच चकित झाला होता.
''काय?.. Are You OK?.. You mean you and Madhu..?...'' - लोकेश ला विश्वास बसतनव्हता
''हो.''
''पण का?' I mean you deserve much better than her yaar...""

''तसं नाही रे. हे बघ माणूस आयुष्यात सर्वच हव तसं मिळवू शकत नाही. किंबहुना त्याला सर्व मिळालेले त्याच्या आवडीचे असतेच असेही नाही. त्यात बदल होत राहतात. काहीवेळा काळ बदलतो अन काहीवेळा आपण. एखाद्या मुलीला प्रेम करताना लग्न करतना आपण फारतर आजपर्यंत काय काय गृहीत धरतो?..जात , धर्म , करियर, शिक्षण आणि अश्याच छोट्या मोठ्ठ्या तडजोडी नाहीत का ?.. त्यात आपण काही बदल अपेक्षित धरतो काही समोरचा. तर काही अपेक्षा काळाकडून असतात. बरोबर ना?..

आणि नाहीतरी मधूला वाटल असत तर मला काय कोणालाच हे सत्य कधीही कळाल नसत. तशी गरजच नव्हती. ती आता एक परिपूर्ण स्त्री आहे. खंबीर आहे. शरीराने आणि मनानेही. सामाजिक पातळीवर तिचा झालेला छळ- अस्वीकार, भोगी आलेल्या अवहेलना, आमरण साथ देत आलेले एकटेपण, भावनांचा गदारोळ आणि वैयक्तिक आयुष्याची अस्वस्थ वाटचाल या सर्वातून स्वत:ला सावरून ती या निर्दयी जगासमोर जगात आहेच ना..?.. या गोष्टीत कोणी तरी तिला समजून घेईल अशीच तिची छोटीशी इच्छा..!! त्या अजान पोरीला याचीही कल्पना आहे की तीने हे सर्व मला सांगितलं खर पण जर मी पण अविश्वासू निघालो तर परत तेच सर्व दु:ख डोंगर तिला पुन्हा दिसतील. पण नाही..ती ला मी आवडतो . खूप प्रेम करते ती माझ्यावर. माझही तितकंच प्रेम आहे तिच्यावर. कालच तिने मला सर्व सांगितलं. खूप वाईट वाटल मला. म्हणून तर ती दारू आणि धिंगाणा. पण आज पूर्णवेळ इथेच बसून विचार केला. अगदी सरळ आणि प्रात्यकक्षिकतेने ..

मला माहितीये की फक्त मधुच हे गुपित असंच टिकवून ठेवून- माझ्यापुरतच मर्यादित ठेवून पण पण मी तिची मदत करू शकतो. पण मन ऐकत नाही. मी खर प्रेम केलंय तिच्यावर. माणूस बदलत जाणाऱ्या किंवा सर्व गोष्टीमुळे आपल्यात आलेल्या बदलांना अनुकूलन म्हणतो, प्रगती म्हणतो, क्रांती म्हणतो. पूर्वीपासून चालत आलेल्या आणि मनाला न पटणाऱ्या अघोरी रूढी परंपरातून आणि प्रथाथून आपण कधीच बाहेर आलो आहोत . ते तर मानवाने बनवलेले आहेत. हा तर नैसर्गिक बदल रे. याला आपण का स्वीकारू नये?..''

- शाहिदच्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती. आयुष्यात पहिल्यांदाच त्याने स्वत:ला आणि त्याला लोकेशने त्याला एवढा गंभीर पाहिलं होत. तेही असं क्रांतिकारी निर्णय घेताना ..!!

''हे गुपित आपल्या दोघातच राहिल असं मला विश्वास आहे ..- शाहिद ने भुवया वर करून लोकेशला शंकायुक्त विचारलं..
'' बस क्या..'' - लोकेशने होकारार्थी मान हलवली.

दोन मित्र लगेच मजा मस्करी करत खांद्यात खांदा घालून निघाले होते. रात्र जन्माला येत होती..

x x x x x x x x x x

आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा शाहिद ने जेवताना भर ऑफिस मध्येच मधूला लग्नाची मागणी घातली तेव्हा ती गडबडून गेली होती. हसावं की रडावं तिला कळत नव्हते. तिला अतोनात आनंद झाला होता. लाजून लाजून ती लाल झाली होती. सर्वीकडे टाळ्या चा आवाज, जल्लोष होत होता.लाजत लाजत अचानक रडायला लागली अन शाहिदला धावत येवून घट्ट मिठीत विसावली.ती का रडतेय?.. अस थोड्या लोकांना चुकचुकलच.. तेवढ्यात लोकेश बोलला.

'' लग्नात उशीर होतोय. विरह सहन होत नाहीये बहुतेक..म्हणून वाईट वाटतंय ना..?..होय ना वहिनी?..'' - अन परत एक हास्यतुषार..

चटकन मधू लाजत शाहिद पासून दूर पळाली. अन दूर उभ राहून हसायला लागली. अगदी निखळ..सोज्जवळ.. जर कालचा समुद्र जर ते हसू पाहत असता तर शाहिदने त्याला नक्की सांगितलं असत....

''बघ रे, तुझ्या रुंदीशी स्पर्धा करायला माझ्या बायकोच- मधुच हसूच पुरेस आहे..लावतो का पैज?.."




तनवीर सिद्दिकी.

Friday, October 28, 2011

प्रेम करु नका कधी

प्रेम करु नका कधी,
असे सर्वजण म्हणतात गं_
पण कोणी किती काही करा,
प्रेम ते आपोआप होत गं_

त्या त्या वेळेला त्या त्या क्षणी,
बरोबर योगायोग जुळतात गं_
ते सुंदर नाजुक क्षण मग_
अविस्मरणीय होवुन जातात गं_

म्हटलयं ना कोणीतरी या आयुष्यात,
प्रत्येक जण प्रेमात पडतो ग_
कारण प्रत्येकाच्या मनात एक,
हृद्यमर्दम दडलेला असतो ग_

मिलिँद_

Tuesday, October 25, 2011

"आवाज"



मित्रांनो "आवाज" या शब्दावरुन आज सर्वत्र कसा गदारोळ माजला आहे हे तुम्हाला माहीतच आहे. या शब्दाने मानवाचे कीतीतरी रुप स्पष्ट होतात. उदा. कुणाचा वरच्या पट्टीतला आवाज, कुणाचा भेकड आवाज, कुणाचा एकदम मंजूळ आवाज. पण अशाच आवाजांच्या प्रकारामुळे आपल्या या जगात काही थोर व्यक्ती ओळखळ्या जातात. मंजूळ आवाजाची स्वरसम्राद्नी "लता मंगेशकर", "रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते है" असे आपले तुम्हा आम्हा सर्वांचे आवडीचे बिग बी "अमिताभ बच्चन". पण खरच आवाज या शब्दात मला विलक्षण नवल वाटले. मी तुम्हाला शिवकालीन उगात घेऊन जातो. मावळ्यांच्या एका घोषणेने तेव्हा सर्व मर्द मराठ्य़ां मध्ये एक संचार जागायचा "जय भवानी जय शिवाजी"या आवाजाने अख्खा प्रांत दुमदुमुन जायचा, या आवाजाने शत्रुची नुसती पळताभुई व्हायची म्हणून आज आपल्याला सुजलाम सुफ़लाम असा "महाराष्ट्र" पाहायला मिळ्तोय...

कालांतराने या शब्दाने एक पकड घ्यावयास सुरवात केली. आपला देश स्वतंत्र करण्यासाठी सर्व क्रांतीकारांनी ब्रिटीशांना "भारत छोडो" चा आवाज दिला. त्यांच्या सभेला शेकडो लोग उपस्थित राहु लागले, कारण त्यांच्या आवाजात एक धमक होती, एक आग होती. त्यामुळे सर्व जनतेत एक क्रांतीची लाट उसळली. त्यांचा आवाज ब्रिटीश कालीन सत्तेलाही दाबणं अशक्य झालं.. आणि त्यामुळेच आपला देश स्वतंत्र झाला हे सर्वांना न्द्यात असेलच.........

मित्रांनो आता आपल्या घरातलेच उदाहरण घ्या ना सर्व विवाहीत पुरुषांना आपल्या पत्नीचा आवाज ऎकला नाहीतर दिवस काढता येत नाही. "अहो ऎकलयं कां..?" या आवाजातचं सर्व विवाहीत पुरुषांना पुढे काही तरी आहे हे माहीत होते. :) अहो हसु नका, हे आपण मानलं नाही तरी ते पुर्ण सत्य आहे. अहो मोबाईलचं जाळं इतकं पसरलं आहे की समोरचा आवाज ऎकून आपल्याला समजते काही तरी घोळ आहे. प्रेयशीचा आवाज मोबाईल वरुन ऎकायला प्रियकराचे कान आतुरलेले असतात अन तो आवाज ऎकला नाही तर त्याचं मन नुसतं कावरं बावरं होऊन जातं. अन फ़ोन वाजला " "हैलो जानू" हा शब्द जरी कानावर पडला ना पडला तर तो अख्खा अरबी समुद्र पोहुन तिच्यापाशी जाईल हे सगळं "स्वप्नवत" बाकी असे कुणी करणार नाही हे सांगायला नको तुम्हाला. पण त्या प्रेयशीच्या आवाजात काहीतरी जादु असेलच आणि नक्किच असेल...

आज या आवाजाला कायद्याने मर्यादा घातल्या आहेत. अहो आज मि एका रस्त्यावर एक फ़ळक वाचला. घरातील लोकांचा संभाषणाचा आवाज ५० डेसिबल, सभेचा आवाज ६० डेसिबल, वाहनांचा आवाज ३० डेसिबल, अरे हे काय आहे. कुणीतरी विचारा यांना तुम्ही तरी हे नियम पाळता का ऽ‌‍ऽऽऽ..? म्हणजे आता घरांमध्ये बायको ५० डेसिबल पेक्षा जास्त आवाजात नवरयाशी भांडली तर नवरा तीला कायद्याचे उल्लंघन केले म्हणून तुरुंगात टाकेल ..? प्रियकराला आपल्या प्रेयशीला इशारा देण्यासाठी आपल्या बाईकच्या होर्न चा आवाज ३० डेसिबल पर्यंत सेट करावा लागेल नाहीतर प्रेयशीचा बाप त्याच्या वर खटला भरेल, उगाय काहीतरी नियम काढायचे अन ते जनतेवर लादायचे, अरे शाहिरांचे शिवकालिन पोवाडे आपण कमी आवाजात ऎकले तर त्या शाहिरांचा किती अपमान होईल अन तेच आवाजाची मर्यादा न ठेवता ऎका अन पाहा अंगात कशी वीज संचारते, लता दिदींचा आवाज रात्री तारयांच्या मंद प्रकाशात आपल्या प्रेयशी सोबत ऎकला तर आजुबाजुच वातावरण कसे रोमांचक होऊन जाते.. अहो पण हे या टग्यांना कोण सांगणार कि "आवाज" या शब्दावर तुमचा राग का? कारण त्यांना गिरणी कामगारांच्या आवाजाचा, पिडित कुटुंबाच्या आवाजाचा, आणि महागाईत गुरफ़टून मरत चाललेल्या सामान्या जनतेच्या आवाजाचा त्रास त्यांच्या सहनशिळतेच्या पलिकडे गेला आहे. म्हणून त्यांनी हे चोचले चालवले आहेत पण मित्रांनो माझा एकच सल्ला आहे कुठेही अनुचीत प्रकार दिसला की आपल्या अंतर मनाचा आवाज नक्की ऎका आणि जोरात म्हणाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
!!अरे आवाज कुणाचा!!

स्पष्टीकरण:
मित्र मैत्रिणींनो आजवर कुणीही आवाजावर काही लिहिले नव्हते, पण माझ्या मित्राच्या ब्लोग व्दारे "आवाजा विषयीचे" माझे मत मी थोडक्यात मांडले आहे. याच्यातुन बोध एवढाच की कृपया आपला आवाज कसा ही असो त्याला दाबुन नका ठेऊ, खुला करा त्याला अन तो फ़क्त लोकांच्या भल्यासाठी बस्स...
!!जय हिंद जय महाराष्ट्र, जय शिवाजी!!
धन्यवाद
रुपेश सुर्वे (गोवंडी, मुंबई) १९/०१०/२०११

Saturday, October 22, 2011

संजय च्या चारोळ्या भाग ३ ..

तुझं ते निखळ हसणं तुझी ती मादक नजर
खुणावीत होती मला आणि माझ्या मनाला
येत होते आठवण मला तुझी हर एक क्षणाला...
*संजय**..

स्पर्श तुझा होता मला रोमांच उभा राहतो मनात
नजर मिळते नजरेला मन माझे भरून येते..
खेळच ग तो आपल्या दोघांचा...मनाचा...
*संजय**..

तुझं हात हातात घेताना
अजून कोणी तरी होतं तिथ
काय माहीत लोकांचं त्यात काय जात
चांदण्या पण लाजलेल्या तुझ्या माझ्या मिलनाला
लपून छपून त्या पण मनातल्या मनात हसलेल्या..
.*संजय**.

शब्द होते पण काव्य होत नव्हते
स्वर होते पण ताल जुळत नव्हते
तू आलीस बदलले माझे मन सुधा
खोटारडा असलो तरी तुझाच आहे...*संजय**..

तू भास नाहीस माझे सत्य आहेस
मनात असलेले तुझेच शब्द आहेत
तुझं प्रेम माझ्या शब्दातून दिसत आहे..
तुझ्याशिवाय माझे शब्द निघतच नाहीत...
*संजय**..

तू समोर असतेस
काव्य सुचते मला
तू नसलीस तर शब्द
पण रुसतात माझे..
*संजय**.

.कोजागिरीचा चंद्र सगळे
दुधात पाहतात...
मला नाही जमत ते..
तुला मी बस माझ्यात पाहतो....
*संजय**..

सूर तुझ्या पैंजणाचे
कानाला मदहोश करत होते...
स्वःतालाच काय पण
मला जगाला विसरायला लावत होते..*संजय**.

काल थांबलो मी तिथेच..
पण सुनामी तिथे आलेली ..
वाहणाऱ्या तुझ्या अश्रूत
मला वाहून गेलेली.....*संजय**..

तू लाऊन घेतली सवय ...
मला ते कधीच जमले नाही...
डोळ्यांचे पाणी कधी
बघ ना माझ्या हलले नाही...
शब्द परके झाले तुझे असे काही ..
ओठ माझे लवभरही हलले नाही ...*संजय**..

फुल पण आजकाल
प्रेम करायला शिकवतात..
मुर्झुन पण एका नव्या उमेदीनं...
उभं राहायला शिकवतात...*संजय**..

मनाच्या गहाराईत थोडेसे
झाकून थोडेसे पहायचेस..
मनाची चलबिचल माझ्या
दिसली असती तुला...*संजय**..

तू लोट्लेस दार मनाचे...
पण मन माझे तिथे नव्हते...
चोरून नेले कोणी तरी ते...
तुझ्याकडे तर ते नव्हते ?...*संजय**..

राख पण उरत नाही..
प्रेम कोणाचे जळल्यावर...
लोक आता दहावा पण होऊ देत नाहीत..
आज सरणावर चढलाय्वर..*संजय**..

तीर असा काही घुसला काळजात...
हु कि चू पण नाही करू शकलो...
थेंब असे गाळले रक्ताचे ...
कि बस नाव तुझेच लिहू शकलो ...*संजय**..

कसं रुसून चालेल पाऊसावर ...
माझ्या प्रेमाचं तो प्रतीक आहे...
तू जर नसलीस जवळ कधी...
सोबत तोच करतो माझी...*संजय**..

किंमत नाही केलेस माझी
मी तुझ्या जवळ असताना
आठवण येईल तुला पण ...
मी तुझा नसताना....*संजय**.

मनातून मागीतलीस तर
माफी पण मिळते...
माफीचे नाटक कधी
नाही येत कामाला....*संजय**..

उजाड रानात पण
सोबत तुझी हिरवळ देते ...
याच हिरवळीवर ....
प्रेम तुझे माझे फुलते...*संजय**..

श्वास तुझे अडले ...
माझे श्वास मी देईन...
अपेक्षा नसताना पण...
खूप काही करून जाईन...*संजय**.

.प्रेम हे मृगजळ पण असते...
प्रेम हे एक स्वप्न पण असते..
ज्याला मिळते तो जगतो...
बाकीचे नुसतेच जगतात...*संजय**..

कश्याला म्हणू मी सुख...
तू जवळ नसन्याला ?
कि अखंड या दुनियेत
माझ्या एकट्या असणायला ...*संजय**..

जीव जडला तिच्यावरी...
यात माझे काय चुकले..
दोघे अपुरे एकदुसर्यापरी..
प्रेमापुढे सगळेच झुकले ...*संजय**..

जन्म आणि श्वास सोबत असतात...
कवी आणि शब्द सोबत असतात...
बस जाणीव नसते त्यांना...
एकदुसार्याच्या अस्तित्वाची...*संजय**...

उन्हामध्ये उभी राहिलेस ..
पहा सावली तुझ्या सोबत आहे...
साथ अशीच असते प्रेमाची...
कळून पण न कळणारी...*संजय**..

एकदा उमटलेल्या पाऊलावर..
परत पाऊल टाकण्यात काही अर्थ नसतो...
हर्दयावर उमटलेल्या खुणा
अश्या नाही पुसता येत...*संजय**.

.सवय झाली तुला आता ...
वेळ देऊन वेळेवर न येनायची....
आता मी पण करत असतो copy
तुझ्यासारख्या बहाण्याची....*संजय**..

काही नाती अशी असतात...
तोडले तरी तुटत नाहीत...
प्राण कंठाशी आले तरी..
श्वास मात्र सुटत नाहीत..*संजय**...

दूर तुझ्यापासून जाताना ...
अश्रू माझे गळत होते..
तुला देलेले वचन कदाचित...
ते आजपण पाळत होते...*संजय**...

वाटी जळतात जसं माझ
मन जळत....
तेलही जळत, तूपही जळत
शेवटी काय उरतं...एक वाट तुझी ..* संजय**...

 जीवन सुरु झाले तुझ्यापासून..
शेवट त्याचा पण तूच आहे...
परतीची वाट बंद केल्यावर....
जीवन नावाला फक्त शिल्लक आहे...*संजय**...

भ्रम असतो मनाचा
मनातच ठेवावा लागतो...
काही जन आता
तुझ्याशिवाय पण जगतील..*संजय**..

तुझं लटक रागावणं पण...
मनाला उभारी देऊन जातं...
माझ्यावरील प्रेमाची
परिणीती देऊन जातं...* संजय

भेटीच्या अगोदरच तू
विरहाचे दुख देऊन गेलीस....
पोहता येत नव्हते मला म्हणून...
दुखाच्या समुद्रात ढकलून गेलीस..*संजय**..

असतात अश्रू पण काही मगरीची...
त्याला आपण ओळखायला हवे...
शब्द शब्द नाही राहिले माझे...
विष बनून स्वःताच पीत आहे...*संजय**...

जितका जपलो नात्याला ....
ती माझ्यापासून दूर गेली...
किंमत माझीच उलट शुन्य झाली...
त्यांचं अरेरावी पुढे .....*संजय**..

नुसती सवय जुळून काय उपयोग ..
मन पण जुळायला हवेत....
तुझं माझ प्रेम बघून...
शेजारी पण जळायला हवेत...*संजय**..

जीवन हे सुंदर असते
त्याला शिक्षा का समजावी...
प्रेम करावे त्याच्यावर....
जशी मरणावर पण प्रीत असावी..*संजय**..

जरा लेखणी ठेव बाजूला..
थोडसं जगायला पण हवं...
त्या तिकडे पलीकडे एक
वेगळं जग आहे....
स्वप्नाळू ...तुझ्यासाठी..
सजलेलं ...पाहशील ....* संजय**..

मरण हे नसते प्रत्येक
गोष्टीला उत्तर ...
निसर्गही त्याचे ऋतू
म्हणूनच बदलत असतो..*संजय **

असे खेळ खेळायला
देवालाच जमत आहे...
नाही होत विस्मरण तुझे.
हे का देवाला कळत नाही..*संजय**..

तिला पाहिलेलं कधी स्वप्नात ..
आज मी तिला डोळ्यासमोर पाहिलं....
भर दिवसा एका चांदणीला
या धरतीवर मी पाहिलं...* संजय**..

पण कोणी का रडव तुझ्यासाठी ....
बस
जगावं आणि मरावं बस तुझ्यासाठी ..... ...
* संजय**..


मी तिला म्हणालो....मी नाही बोलणार आता तुझ्याशी...
ना ही कधी फोन करणार ....
गालातल्या गालात हसली...
अन म्हणाली ...बरं झाले सुंटीवाचून खोकला गेला ....
* संजू**....

टाळी नाही ग वाजत...
कधी एका हाताने....
दूर करून स्वताच ....
वेळेचा बहाणा करणं....
* संजू **.



नात्यात आपल्या सुनामी पण येईल ...
असं मला पण वाटल नव्हते ....
ती आली अन बघ न .....
सगळ्यांना घेऊन गेली...
अगदी निरपराधांना पण....* संजू**..

एक हात माझा....तुझा हात हातात घेण्यासाठी....
एक माझं मन.....तुझं मन समजून घेण्यासाठी......
माझे बाहूपाश ...तुला कवेत घेण्यासाठी....
सांग ना ग मग ...हा तुझं रुसवा कश्यासाठी....* संजय**...

असं फेकून दिलेस ....
जशी चहातील आहे माशी..
अशी ग तू कशी....
केलीस माझ्या प्रेमाची ऐशीतैशी..
*संजय**..

ज्यावेळी मी तुझा विचार करत होतो....
मी माझ्या डोळ्यातला एक थेंब सागरात टाकला...
आणि मी शपथ घेतली कि मी तुझा तोपर्यंत,
असेन जोपर्यंत तो थेंब मला सापडत नाही...*संजू**..

हात ठेव आपल्या हृदयावर...
माझी धडकन ऐकू ऐईल तुला...
मग सांग ना ग राणी तरी ....
का आहे असा हा अबोला ....
सखे सोड ना अबोला ...* संजू**......

एक स्वप्न तुझं मी पाहिलेलं.....
एक आशा डोळ्यात मी पाहिलेलं.....
एक हात तुझा माझ्या हातात...
सांग ना ग कधी मिळेल हे सगळं...* संजय**....

मन दाटले होते ........पण शब्द फुटत नव्हते ....
नभ पण भरले होते काळ्या ढगांनी.......
पण पाणी असे बरसत नव्हते....
सांग ना ग का ? प्रेम नव्हते का तुझे माझ्यावर.....सांग ना....
* संजय**..

पावसात तुझ माझ्यासोबत असणं ..
हेच माझ्यासाठी खूप काही होतं...
त्यात तुझं चुंबन देणं म्हणजे तर....
नक्षत्राच एक सुरेख लेणं होतं..* संजय**....

सुरुवात का होत नाही दिवसाची तुला बोलल्याशिवाय .सांग न
फुल का फुलत नाही तुझ्या वेणीत लागल्याशिवाय .सांग न
सुगंध का दरवळत नाही तुझी चाहूल लाग्ल्याशिवाय ...सांग ना
सांगशील मला * संजय **..

येतात शब्द ओठावरती पण हात माझे हलत नाहीत...
एका तुझ्या आठवणीत अश्रू पण ढळत नाहीत......
कशी लिहिणार मी कविता पान माझे ओले झाले....
एक तुझ्या आठवणीत मन चिंब चिंब झाले *संजय**...

एक तिच्या अस्तित्वाची छत्री
आज माझ्या हाती होती......
आठवणींचा पाऊस झेलत मला,
पुढे घेऊन चालत होती......* संजय**...

किती सुंदर असत ना..कोणी तरी आपल्यावर प्रेम करणं ...
किती सुंदर असतं ना ...कोणाच्या तरी स्वप्नात हरवून जाण...
किती सुंदर असतं ना ...कोणी तरी आपल्या दुखावर फुंकर मारण..
खरेच किती सुंदर असतं ना ..* संजय **...

कधी तरी येतेस ...कधी तरी जातेस..
मन बैचेन असते अगदी...मनाला हुरहूर का लावून जातेस......
का ग अशी का करतेस सांगशील का ?..
...* संजय **....

रक्ताचा तो सडा निसर्गाने पण पहिला....
त्याच्या डोळ्यातून पण मग अश्रूंचा पूर वाहिला........
दुख करता करता त्याचे बोलायचे राहून गेले....
आणि सरकार म्हणते सगळे पुरावे वाहून गेले......
.....* संजय **.....

नाती हे असेच असतात ..बस असून नसल्यासारखी ........
खूप जवळ वाटतात पण असतात खूप खूप पारखी....
पण एकाच नातं असं असत...अगदी निर्भेळ .....सुंदर
तुझं नि माझं ...आपल्या मैत्रीचं ....खरे न ग .........* संजय**.....

एक स्वप्न डोळ्यातच बसवले मी...
मनातच मनाला हसवले मी .....
वेदना या मनाला ही उमटली किती....
डोळे तुझे सुजलेले बघितले मी...* संजय

कधी कधी ना मला
चाकोरीबाहेर पण जायला आवडतं..
नाहीस माझी तू पण तुझं
बनायला पण आवडतं .....*संजय**..



सुप्रिया च्या चारोळ्या भाग २..




















गेलेले ते दिवस.....
नाही येत परत....
तुझ्या त्या सहवासात मन होते रमत....
गेले ते दिवस पण आठवण नाही सरत....
सुप्रिया.
08.10.2011

शब्दांची रास.......
तुझा तो सहवास....
तू नसताना हि मग तुझा तो भास.....
घेऊन जायचा मला तुझ्या शब्दांच्या राज्यात हमखास.......
सुप्रिया.
10.10.2011

तुझ्या शब्दांत गुरफटून जाणारी....
तुझ्या मिठीत विरघळून जाणारी ....
तुला माझ्या मनात साठवून ठेवणारी.....
तुझ्या आठवणीना सदैव कवटाळून बसणारी....
सुप्रिया.
10.10.2011

कोजागिरीचा चंद्र जणू तुझाच एक भास....
आजची हि रात्र सजणार आहे तुझ्यासाठी खास.....
त्या चंद्राच्या छटेमधला तुझा तो सहवास.....
उगवणार आहे चंद्र जणू माझ्यासाठीच आज....
सुप्रिया.
11.10.2011

गम्मत-गम्मत म्हणून मला एकटक पाहत राहायचं.....
मग मी हि तुला माझ्या नजरेत साठवायचं.....
वेळेचे भान हरवून मग जायचं....
मी निघाले कि लगेच तू रागवायचं.....
सुप्रिया.
12.10.2011

सख्या काल तुझी आठवण झाली पावसात एकटच भिजताना.....
किती वेडे होऊन जायचो आपण एकत्र पावसाचा आनंद लुटताना....
क्षणीक होता रे आनंद तो पावसाचा थेंब अंगावर झेलताना....
खरच काल पण कुणालाही कळलं नसेल रे मी पावसात रडताना.....
सुप्रिया.
14.10.2011


चारोळीतील एक ओळ तुझ्याचसाठी खास...
एकदातरी प्रेमाने पाहावे माझ्याकडे हि एकच आस.....
म्हणतोस तू....माझ्या आठवणी तर आहेत फक्त एक भास.....
माझ्या या प्रश्न-मंजुषेमध्ये नेहमीच तूच का होतोस रे पास...???
सुप्रिया.
14.10.2011

Thursday, October 20, 2011

आई ची माया...

उन वारा पाऊस किती आली हि संकट
झेललीस तू जरी पडलो मी एकट

गुरफटलो मी अखंड त्यात
आहे तूच सदैव मला सावरल

पिलासाठी माते कष्टान तूच परतवल
आम्हासाठी माते सार आयुष तू झिजवल

आई उबदार तुझ्या पदरात
खरच सार विश्व आहे समावल

झालो कितीही मोठा लहान तुझ्यासाठी आई
सांग काय करू ... कसा होऊ मी उतराई

कृष्णा

मराठी लिहिण्यासाठी....

Tuesday, October 18, 2011

छायाचित्र चारोळ्या: राघू आणि मैना...

फांदीवर बसलेत
जोडीने राघू आणि मैना
आय लव म्हणता
राघूची उडाली दैना
कृष्णा

कान कर ना इकडे ..
हळूच तुला विचारते ..
खर खर सांग ..
मी तुला किती बर आवडते ..
मंजुषा

किती आवडतेस तू मला
हे कस सांगू तरी तुला....
तुझा विश्वास नाही बसणार
तुझ्यासाठी सोन्याच घरट बांधणार
कृष्णा

इटुकल्या फांदीवर....
पिटुकली माझी मैना....
चिमुकल्या नजरेने पाहता....
मज आता काहीच सुचेना........
सुप्रिया.

आणलेय तुला माझे मैना...
मिरची हिरवी गार ...
दूर जाता तुझ्या पासून..
आठवण येते फार...
@*मंथन*

तुझ्या आठवणीत ग मैने रात्र-रात्र जागाव लागत...
किती छान आहे ग असच तुझ माझ्या जवळ असण....
तू अशी खेटून बसलीस कि......
मग जग हि सुंदर दिसायला लागत.....
सुप्रिया.

रात्र तर आठवण तुझी.
घुमतेय माझ्या मनात ग...
मैत्रीच्या या वाटेवरती...
ना जाने काय मनात ग...
@*मंथन*

देवा नि बनवली आपली जोडी
पण दुनिया वाले काढतात आपली खोडी
स्वतहाच्या स्वार्ता साठी आपले नाते तोडी
तुझी मला आणि माझी तुला लागली आहे गोडी
पण माणसाना कधी समजणार नाही आपली प्रेमाची जोडी
*विपुल*

ईश्य...आमच्या दोघांचे ..
चाललंय गुटूर गु ..
नजर फिरवा ना तिकडे ..
नका असे पाहू ...
मंजुषा

मैना...ए ऐक ना, मला ना आज तुला
काही तरी सांगायचे आहे
मला ना काही तरी होत आहे ..
राघू...सांग ना काय होत आहे ते...
मैना...अरे मला ना तुला काही तरी सांगायचे आहे
राघू...सांग ना ग काय आहे ते
मैना - काही नाही रे i love यौ...
*प्रेम*

जीवनाच्या या प्रवाहात
घट्ट साथ तुझी माझी
किती आली वादळे तरी
त्यात सोबत तुझी माझी..
कृष्णा

भेट वेळ रोजची ठरलेली...
तरी अजून काय ठरणार आहे..
बोलायचं पटकन प वेडं मन
त्याचाही म्य्हुर्ता पाहणार आहे...
{{ अर्पिता..}}

आपल्या दोघांच गुपित
आपल्यातच ठेवायचं...
:
:
रोज सांजच्या
वेळी इथच भेटायचं
:- सुरेश..

Monday, October 17, 2011

माझ वागणं थोडं


माझ वागणं थोडं
विशिप्त वाटायला लागलाय
घरचे म्हणतात
बाळ प्रेमात तर नाही ना पडलाय ...

एकट रहावसं वाटतंय
स्वप्नात जगावंसं वागतंय
शब्दात रमावास वाटतंय
पण नाही हा खरच सांगते
प्रेमात नाही पडले मी
वासत्वातील प्रेमाची दूर्दशा पाहून
क्षणभर थबकलेय मी
प्रेमाचा अर्थ समजायचा प्रयत्न करतेय मी
काय असता प्रेमात नक्की
ते उमगण्याचा प्रयत्न करतेय मी
पण खरच मित्रानो
प्रेमात नाही पडलेय मी
प्रेमात नाही पडलेय मी

....थोडेसे मनाशीच खोटे बोलतेय मी

रेशु १७/१०/२०११ रात्री ११.००

कालचा पाऊस मला काही औरच वाटत होता !!!

कालचा पाऊस मला काही औरच वाटत होता !!!
असं वाटला मला काहीतरी
सांगण्याचा प्रयत्न करत होता ...

का माझे अश्रू लपविण्यासाठी
तो माझ्यासाठी बरसत होता ?
कालचा पाऊस मला काही औरच वाटत होता !!!

का तोही माझ्यासारखा
कुणाच्या आठवणीत अश्रू ढाळत होता ?
कालचा पाऊस मला काही औरच वाटत होता !!!

का ८ महिने आपल्यापासून दूर जाणार
यासाठी ठसाठसा रडत होता ?
कालचा पाऊस मला काही औरच वाटत होता !!!
रेशु 17/10/2011

*चिमटा*

खरच माझंही असेच झालंय
या वाळत पडलेल्या दोरी सारख...

कुणीही याव अन काळ्जाच
चिमट काढून जाव..

मी मनापासून प्रेम कराव
अन कोणी ढोंग करून लुटाव

कुणाला काही समजू नये
म्हणून सगळ्यापासून दूर पाळाव

मी एकटाच वाळाव उन्हात
अन कुणासाठी एकटच तळाव
कृष्णा

छायाचित्र : सोंगाड्या - श्री..

प्रेम केल होत...मी हि

मी हि प्रेम केल होत
कधी एकदा कुणावर

निभावलं पण होत..
माझ्या परीने

स्वप्न मी हि होती
पहिली कधी कुणासाठी

प्रेमान तुझा हाथ
हाथी घेण्यासाठी

मागशील तू ते
तुला देणार होतो..

मागशील काय
ते पाहणार होतो..

नव्हत नियतीच्या मनात
डाव मोडला क्षणात

भेट होण्याआधीच सर्व
काही संपल होत...

भिल्लासारख नसलं तरी...
मी हि कधी प्रेम केल होत...
मी हि कधी प्रेम केल होत...
कृष्णा

ग्राफिटी: शहाण्याला शब्दाचा मार...


कालचा पण एक दिवस होता

कालचा पण एक दिवस होता
आजचा एक क्षण देखील आहे
संपत चाललेल्या अश्रूंना आता
वाली कुठलासा कण देखील आहे

मात्रा सगळ्या सरताना अलगद
संपत्या एका रात्रीची कथा
समेवर येत्या माझ्या तानेला
बोचऱ्या आलापीची वेडी व्यथा

रचले नवे मनोरे काही
काही हवेल्या ही उभारल्या आहेत
इवल्याशा यशाच्या आशेने
आकांक्षा फ़ारच पुढारल्या आहेत

तडीपार विवेकाला केला आता
भावनेचेच इथे सारे राज्य आहे
गुणाकार आयुष्याचा मांडून ठेवला
आणि सुखच इथे भाज्य आहे

घट्ट "काल" धरला होता
उद्या नवा मी बघते आहे
ठिसूळ काचांच्या पायावरती
मजले बांधू धजते आहे

सावरलेले मन माझे हळवे
अन फ़ास त्याच्या जोडीचे
एक हसावी एक रडावी पापणी
विरोधाभास तसेच त्या तोडीचे

संहिता

Saturday, October 15, 2011

छायाचित्र चारोळ्या: चिमणी अन तिचे पिल्लू


चिमणे झुंज तुझी माझी
अशीच चालू राहणार
तू उडून गेल्यावर मग हा
चिमणा कोणाशी भांडणार?
कृष्णा

किती जतन केले आहे......
तुझे माझे नाते जपायला.......
तुझा माझा सहवास हवा....
आपले घरटे रचायला.....
हि मजा काय वेगळीच आहे....
तुझ्या चोचीतून दाणे टिपायला.....
सुप्रिया.

तुझ्या माझ्या नात्यात
एक मजाच आहे निराळी
एक घास तू आणावा
अन मी तो अलगद टिपावा
कृष्णा

असंच राहू दे नाते अपुले...
त्या नात्यात सदैव प्रेम वसुदे.....
येवोत मग हजारो वादळे.....
त्या वादळात फक्त साथ तुझी असूदे......
सुप्रिया.

जात आहे दुर तुला सोडुन
विसरू नकोस मला
मी आहे तुझा,परत
एक दा मागे वळुन पाहतो
तुला मी च तुझा मीच तुझा.
*विपुल*

प्रेमानेच विणलंय नात आपलं
त्याला आहे दोघांनीही जपलं
किती आली अन गेली वादळ
तरी प्रेमानच त्याला आहे पेललं
कृष्णा

आईचे पिल्लाशी असेच असते अवीट नाते ..
वणवण फिरून पिल्लासाठी आणते शिते ..
स्वत: उपाशी राहते आणि पिल्लाला भरवते ..
वर्षानुवर्षे आपल्या आईनेही हेच केलेले असते ..
मंजुषा

घास आणते पिलांसाठी ...
अशी कशी वेडी हि आई ...
चोची मध्ये सामावलेले...
जगातील सुख दिसून येई..
@*मंथन*'

किती दुरून तिने पिलासाठी
एक घास आहे आणला
भरवता भरवता तिचा
जीव आहे टांगणीला लागला
कृष्णा

चोचीमध्ये घास बाळा...
आहे तुझ्यासाठी....
फिरून आली रानोमाळ बाळा...
वेडी हि माय तुझ्यासाठी...
@*मंथन*'

जड अंतःकरणाने आई ..
आज तुझा निरोप घेतो ..
माझ्यासाठी तू पाहिलेली स्वप्ने ..
पुरी करूनच येतो ..
मंजुषा

तुझ्यासाठीच आणलाय
घास फिरून रानोमाळ
बघ किती लोटला हा काळ
आता लवकर मोठा हो बाळ
कृष्णा

देणारे देत जातील
खाणारे खूप खातील
असेच घास भरवले
आम्ही राजकारण्यांना
काही काळ सरल्यानंतर
लाथ मारतात जनतेला
हे पाखरू हि असेच करेल
एक दिवस आईला सोडून पळेल.......
रणजीत....दुपारी २.३६ १५/१०/११

सदैव धडपडते पिल्लांसाठी हि आई....
उन-पाऊस-वारा ह्याची तिला तमा नाही....
अजाण असतात ती पिल्ले सारी.....
पंख फुटता भुर्रकन उडून जाई.......
सुप्रिया.

एक-एक धागा शोधून घरटे त्यांनी रचले.....
मायेच्या प्रेमाने होते हो विणले.....
उन-पाऊस-वारयातही त्यांनी ते जपले....
त्या पक्षांचे घरटे हळूच हो मी टिपले....
सुप्रिया.

पिल्लांसाठी सहन करते उन-पाऊस-वारा...
धडपडून आणते त्यांच्यासाठी चारा...
करीत नाही कधी अपेक्षा फार....
मोठा झाल्यावर हा ना करेल थारा....
कृष्णा.

आई.....

माय वेडी तिची माया वेडी
वेड तीच प्रेम....
कधीच न कुणी करू शकेल
तिच्या सारख प्रेम....
झुरते झुर्र झुर्र
मरते मर्र मर्र
वेड तीच प्रेम....
कधीच न कुणी करू शकेल
तिच्या सारख प्रेम....
पिलांसाठी फिरते वण वण
दाण्यासाठी करते भण भण
वेड तीच प्रेम....
कधीच न कुणी करू शकेल
तिच्या सारख प्रेम....
पंख फुटता भुर्रकन उडून जाई.......
सदैव धडपडते पिल्लांसाठी हि आई....
म्हणूनच म्हणतो
वेड तीच प्रेम....
कधीच न कुणी करू शकेल
तिच्या सारख प्रेम....
--कपिल

Thursday, October 13, 2011

प्रदीप काकांच्या चारोळ्या

तुझ्या शब्दात कधी गुरफटून न जाता...
शब्दातून सुंदर शब्दच फुलविणारी मी...
तुझ्या अर्थपूर्ण शब्दांनी आज गुरफटले...
राहिले नाही भान खर तेच बोलून गेले मी...
-- प्रदीप केळकर...

तुझ्या शब्दात कधी गुरफटून न जाता...
शब्दातून सुंदर शब्दच फुलविणारी मी...
तुझ्या अर्थपूर्ण शब्दांनी आज गुरफटले...
राहिले नाही भान खर तेच बोलून गेले मी...
-- प्रदीप केळकर...

करुनी प्रिती बेडी पडली लग्नाची...
फुलली प्रित स्पर्शातूनी सुखावली...
डाव साधला नियतीने लागली नजर...
अबोल जाहली प्रिती मने ही दुखावली...
-- प्रदीप केळकर...

वाढविले बीज तुझे माझ्या पोटी...
दिला जन्म मी मोठ्या स्वकष्टाने...
शिकवूनी उभा केला त्यास जिद्दीने...
पित्याचेही प्रेम दिले पूर्ण जाणीवेने..
-- प्रदीप केळकर...

दिसत होते तुझ्यातील गुण लग्नाआधी...
भाळलो होतो ना तुझ्या त्या सुंदर रूपावर...
संपलं आकर्षण लागले दिसू एकेक अवगुण...
विटली मने कसा ग संसार करू तुझ्या रूपावर...
-- प्रदीप केळकर...

जन्मदात्रीची घेईल काळजी तो विश्वेश्वर...
संतोषली माय जाई पुत्र शिकण्या परदेशी...
नियतीचा हा खेळ अजब धन्य झाले जीवन...
करण्या सेवा मातेची येईल तो पुत्र मायदेशी...
-- प्रदीप केळकर...

छायाचित्र चारोळ्या: मेहंदी..

रंगलीय हि मेहंदी हातावर
पण घाव करतेय काळजावर
तुझी मेहेंदी अशीच खुलू दे...
रंगात सदैव मला भुलू दे
कृष्णा

ते हाथच काय,जे हिनीत नाही,
तळवेच काय जे,ओल्या मेंदी वासित नाही,
ती नखंच काय,जी रंगीत नाही,
ती स्त्रीच काय,जी शृंगारीत नाही......
सुप्रिया.

रंगलेली मेहंदी दाखविताना
तू किती खुलली होतीस.....
तुझा हात माझ्या हाती आहे
हे पण क्षणभर भुलली होतीस
कृष्णा

रेम केलंय मी तुझ्यावर त्या तुझ्या निर्मळ मनावरती...
बांधली आहे गाठ तुझी-माझी या भू-तलावरती .....
शपथ घेतली आता लावेन तुझ्याच नावाची मेहंदी.....
सुप्रिया.

Tuesday, October 11, 2011

छायाचित्र चारोळ्या: कोजागिरीचा चंद्र..

कोजागिरीचा चंद्र मज....
दिसे तुझाच ग साज....
हळव्या आपल्या प्रीतीचा....
तोच खरा साक्षीदार आज....
@*मंथन*

कोजागिरीचा चंद्र मला...
रात्र भर जागवतो...
त्याच्या प्रतिबिंबात मला....
तुझेच रूप दाखवतो...
@*मंथन*

कोजागीरचा चंद्र अन तुझ रूप
जणू मज एकच भासत
अन उकळत्या दुधामध्ये
तुझच प्रतिबिंब दाटत
//दाशु// 10:54 am 11/10/2011

कोजागिरीचा चंद्र सगळे
दुधात पाहतात...
मला नाही जमत ते..
तुला मी बस
माझ्यात पाहतो....
*संजय**...

कोजागिरीचा चंद्र आपले
रूप खुलवतो,
तुझ्या सोबत मी माझे
आयुष्य फुलवतो,
@ सुरेश....

कोजागिरीचा चंद्र जणू तुझाच एक भास....
आजची हि रात्र सजणार आहे तुझ्यासाठी खास.....
त्या चंद्राच्या छटेमधला तुझा तो सहवास.....
उगवणार आहे चंद्र जणू माझ्यासाठीच आज....
सुप्रिया.

सखे तुझी सोबत म्हणजे
रोजच चंद्र कोजागिरीचा
तुझ्या विना मात्र..माझी
नित्याचीच अमावस्या
कृष्णा

एकटी

नाही येणार परत कितीही बोलावलेस तरी ..
त्रास होतोय न तुला मी दिसले जरी ..
जाते निघून आता तुझ्या आयुष्यातून .
सुखी रहा तू मला वजा करून ..
नाही सहन होत मला तुझ हे वागण ...
सारखी उपेक्षा करणं आणि टोचून बोलण...
राहीन मी एकटीच तुझ्याशिवाय ..
तुही शिक राहायला माझ्याशिवाय ..
कायम तुझीच ,
मंजुषा १०/१०/२०११

मजेदार चारोळ्या: चारोळीला चारोळीने उत्तर - भाग २

असतात काही झुडपे
चार महिन्याच्या पावसात जगणारी
असतात काही माणसे माझ्यासारखी
आयुष्यभर नुसत्या आठवणीत जगणारी
रेशु ०९/१०/२०११ रात्री १०.३०

    
नुसत्या आठवणीत जगून
काही मिळत नाही
जीवनात ठेवले आहे काय
एका प्रेमाशिवाय....

तुझ्यासाठी आठवणी तरी आहे
माझ आयुषच जणू एक मृगजळ आहे
भास आहे केवळ तेथे कोणीतरी असण्याचा
कंटाळा आलाय आता सारखा भासात फसण्याचा
लक्ष्मीकांत

सोडा मृगजळाच्या मागे धावणे
स्वतःतला कस्तुरीमृग शोधा
जीवन हे क्षणभंगुर नुसते
भंगाशिवाय मिळणार काय दुसरे..
*प्रेम*

मला मृगजळाच्या मागे नाही
सोबत धावायचं आहे
भंगलेलं ते स्वप्नं
परत एकदा जोडायचं आहे
रेशु ०९/१०/२०११ रात्री ११.०४

जोडणारे स्वप्न पाहत
आयुष्य निघून जातं
मृगजळ शेवटी मृगजळच राहत
नसते कोणाचे ...कोणाशिवाय ..
*प्रेम*

मान्य आहे मला
मृगजळ मागे धावणं योग्य नाही
पण डोळ्यात माझ्या सामावलेलं
स्वप्नही एवढा छोटं नाही .......
रेशु ०९/१०/२०११ रात्री ११.१५

डोळ्यांची स्वप्न आजकाल
चष्म्यासारखी बदलतात
आज एकासोबत तर
उद्या दुसर्यासोबत फिरतात..
*प्रेम*

स्वप्न असुदे डोळ्यात तुझ्या
पूर्ण करण्याचा हट्ट नको
प्रयत्न असू दे तसा
पण स्वप्नात जगण्याची सवय नको
लक्ष्मीकांत

हसू नका असे ,सत्य आहे
सत्याचा सामना करा
खरे प्रेम शोधा स्वतात
मग पारखून प्रेमाचा स्वीकार करा ..
*प्रेम*

सत्य हे कटू असते...
त्याला हसुन करू गोड...
सत्यातली सत्यता घे जाणून...
कधी कधी त्यालाही असत्याची जोड..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ११.२७

प्रेम आणि असत्य
कधीच सोबत असू शकत नाही
मग शेवट काय होणार त्याचा
अगदी ठरलेला...
*प्रेम*

हा हा हल्ली असत्यालाच
१००% सत्य दर्शवतात
प्रेमाचे काय घेवून बसलात
गल्ली बोळात प्रेमाचे खोटे चाळे चालतात
रणजीत..११.३६रात्री ०९/१०/११/

वेड्या असत्य आणि प्रेम यांच
अतूट अस नात
असत्याचा हात धरला तरच
आजच प्रेम टिकत
लक्ष्मीकांत

प्रेम आणि चाळे म्हणजे
मन आणि वासना
कोणी काय करायचे
ज्याचे त्याने ठरवावे....
*प्रेम*

सगळे असाच विचार का करता तुम्ही ???
कुणाचाच का प्रेमावर विश्वास नाही राहिला
खरा प्रेम करून तर बघा आधी
तुमच्या सत्य असत्यात प्रेमाचा पण जीव घुसमटला
रेशु ०९/१०/२०११ रात्री ११.४०

प्रेम म्हणजे आजकाल
फळाप्रमाणे झाले आहे...
ऋतूप्रमाणे ते पण
नेहमी बदलत जाते ..
*प्रेम*

आजची परिस्थितीच अशी
खरे खोटे काय समजत नाही
जिकडे तिकडे अनैतिक चाळे सगळे
खरे प्रेम मिळणार तरी कोठे....
रणजीत..११.४३रात्री ०९/१०/११

आजकाल तर असत्य असलेलेच
प्रेम टिकू शकते
कारण खऱ्या प्रेमाची
कोणालाही जाण नसते !!!!
*आशीष*

प्रेम...? आईने केलेले ते..?
की बाबांच्या धाकामागे लपलेले...
प्रेयशी ने केलेले प्रियकरावर...
पण ते ही समाजाच्या जाळ्यात गुरफटलेले..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ११.४७

प्रेम, प्रेम आज उरलाय कुठे??
प्रेमाचा आणि त्यागाचा संबंध आता राहायलाय कुठे?
उठतोय सुटतोय तो प्रेम करतोय
घरचे नाही म्हटले तर प्रेमाला सोडून देतोय..
लक्ष्मीकांत

असेल खरे प्रेम तर
समाजाशीपण लढता येते.
पण समाजाच्या नावाखाली
प्रेमाचा बाजार सगळा.
वापरले अने फेकून दिले..
*प्रेम*

प्रेम म्हणजे प्रेम असत
सत्य असत्या असं त्यात काहीच नसतं
त्या अनैतिक चाल्यांमध्ये सुद्धा
त्या दोघांच एकमेकांवर प्रेम असत
रेशु ०९/१०/२०११ रात्री ११.५०

नुसता बाजारूपणा
प्रेमाच्या नावाखाली
स्वतःतर बरबाद
पण दुसर्याला हि कलंकित करे
रणजीत..११.५३रात्री ०९/१०/११/

प्रेम म्हणून चाळ्यांना
प्रेमाचे नाव नको देऊस
असत्यावर आधारलेले
प्रेम ते कसले...
*प्रेम*

खरे प्रेम तेच जे...
मनात वसलेले असते...
नियमांना तोडून जे...
निरंतर टीकून राहते..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ११.५६

आजकाल प्रेमाची संकल्पनाच बदललीये
भावनांची जागा आज चाळ्यांनी घेतलीये
विश्वास होता एके काळी
आता लाजेचीही झालीये होळी.
लक्ष्मीकांत

तुझं माझं प्रेम...
आपल्या मैत्रीतच वसलेलं...
तु हाक मारलीस अन...
मी अचुक ऎकलेलं
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ११.५९

हाक नव्हती ती तुझ्यासाठी..
तो एक तुझा भास होता...
हवेतून आला कानापार्येंत
आणि विरून गेला....PP
*प्रेम*

तुला भारीच सवय...
मना मध्ये बोलायची..
मी समोर असलो..
माझी पण व्हायची गोची..
©*मंथन*™.. १०/१०/२०११ रात्रौ १२.०५

जाते आहेस तर जा
पुन्हा या प्रेमाच्या बाजारात नको येउस
अशाने आयुष नाही घडायचे
यात च मी माझे अमुल्य क्षण गमावले
*** आशिष ***
मनाची भाषा कळायला पण
मन असावं लागतं
मोकळ्या मनानं बोललीस
तर कळले असते मला..PP
*प्रेम*

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
रेशु ०९/१०/२०११ रात्री १२.०५

अर्थ मनात असतो
नाही शोधलास कधी तू
नाही बोललीस तरी
डोळ्यांची भाषा कळते मला...PP
*प्रेम*

न बोलण्याने गुंता कधी सुटत नाही
भावना व्यक्त होण्याच्या थांबत नाही
शब्दांची साथ नसेल कदाचित
संवेदना खुलल्याविना राहत नाही
लक्ष्मीकांत

तुझ्या येण्याची चाहूल...
देऊन जातो हा वारा वाहणारा...
अन तुला भेटायचे म्हणून...
तो उडालेला माझा गोंधळ सारा...
©*मंथन*™.. १०/१०/२०११ रात्रौ १२.१३

गोंधळ तुझा उडाला
तिला ते सवयीचे होते
फुलपाखरुच होते ते
उडाले या डालीवरून
दुसर्या डालीवर....PP
*प्रेम*

 तुझ्या सोबतच्या पाऊलखुणा
शोधतच राहीन मी
अजूनही आस आहे तुझ्या पावलांच्या परतीच्या वाटेवर
माझ्या किनार्यावर परतणाऱ्या प्रत्येक लाटेवर
रेशु ०९/१०/२०११ रात्री १२.२०

लाटा येतात लाटा जातात
लहान आणि मोठ्या पण
प्रत्येक वेळी नवनवीन
रुतलेल्या खुणा तुझ्या
वाहून गेल्या लाटेसंगे ..PP
*प्रेम*

येईन पुन्हा मी तुझ्या किनार्यावर
पण हवी आहेस मला तू, पुन्हा त्याच वळणावर
भेटलो होतो त्यावेळी आपण तसे
हातात हात नसूनही एकरूप होतो जसे.
लक्ष्मीकांत

मी वाहवत गेलो खूप दूर
तुझ्यामुळे
तू राहिलास किनार्यावर
तर मी दुसर्या किनार्यावर...
न भेटणाऱ्या ....
*प्रेम*

किनार्याच्या लाटा काय रे
येतात आणि जातात तरी
माझ्या मनातून तू जात नाहीस
शब्दातून तू जरी गेलास तरी
रेशु ०९/१०/२०११ रात्री १२.३०

मन असते काय ग
कोणावरही जडतं
शब्द सुटतात तीरासारखे
घुसतात काळजात अगदी
खोलवर....कधीही न संपणारे ..
*प्रेम*

जेव्हा मी वही पेन घेऊन बसते
तेव्हा मला शब्दच नाही सुचतात
पण रोज रात्री तुमच्या सोबत या मैफिलीत
चारोळ्यांचा थरवर थर रचतात
रेशु ०९/१०/२०११ रात्री १२.४१

वही आणि पेनाचेपण बघ ना
असेच असते एक भरत जाते
तर दुसरे संपत जाते....
बस थर निर्माण होतात आठवणींची तुझ्या......
*प्रेम*

शब्दांच्या साठी साठी वही पेनची गरज काय
शब्दांचे आकाश आहे खुले
शब्दांचे सारे तारे येथे
भावनांच्या साथीने होतील त्यांची फुले
लक्ष्मीकांत

खुल्या आकाशातच प्रेम
तुझे खुललेले
आज कळी उद्या फुल झालेले
अन तुटून मुर्झुन गेलेले...प्रेमाशिवाय....
*प्रेम*

सवयच विकृताना जे चांगले चालले ते
उध्वस्त करण्यासाठीच आयुष घालवले त्यांनी
दुसर्यावर टीका करण्यात चांगले काय जमले नाही
म्हणून असे उदोग चालवले
*रणजीत*

या सगळ्या भाऊगर्दीत
माझं प्रेम हरवून गेलं
सांगायचं होतं तिला काही तरी
सांगायचं राहून गेलं ..
*प्रेम*

Sunday, October 9, 2011

छायाचित्र चारोळ्या: सुर्यास्त, समुद्र किनारा अन दोघी आपण..

हे बघ तुझ्या माझ्या
मैत्रीची साक्ष देत आहे
मावळता सूर्य उफळनाऱ्या लाटा
मोन पाळत असल्या तरी
भेटण्याची आस दाखवत आहे....
रणजीत...रात्री१.००)०९/१०/११

असेच राहतील का गं..
हे दिवस सुगीचे...
संध्याकाळ चा हा किनारा
अन क्षण हे सोबतीचे...
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.०८

तो बघ सुर्य....
जो चाललाय मावळतीच्या दिशेने...
तुझी माझी मैत्री आहे...
त्याच्या प्रत्येक किरणाच्या आशेने..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.१४

एक एक लाट
किनार्‍याला येऊन भिडते आहे
किनार्‍यावर बसलेल्या जोडप्यांना घेऊन
साय़ंकाळ त्यांच्या प्रेमासहित बूडते आहे
रेशु ०९ /१०/२०११ रात्री १.१९

सागरच्या लाटा कश्या...
आपल्या पावलांना स्पर्शुन जातात...
जाता जाता त्या आपल्याला...
जिवनाचे गुणधर्म सांगुन जातात..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.२१

भरति आलि कि सागराचे पाणि
हळू हळू वाढते
वाळूवरति लिहिलेल्या तुझ्या नावाला
ति सहजा सहजि खोडते
रेशु ०९ /१०/२०११ रात्री १.२२

बालपणीची हि दोस्ती...
अशीच फ़ुलत राहू दे....
संध्याकाळच्या सुर्यास्ता सोबत...
रोज बहरत राहू दे...
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.२८

तुझ्या माझ्याया मैत्रीत
मी तू हि अशीच
हरवून जाऊ
त्या करीता या
सूर्य सागराला साक्षीला ठेवू...
रणजीत...रात्री१.३६)०९/१०/११

सुर्याला बघ कसे...
सागराने टाकले गिलून...
तेव्हाच वाटतय सागराला...
आलयं पोटात मळमळून..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.४८

निळा खवळलेला समूद्र...
अन सोबत दोघी आपण...
सुर्यास्ताला निघालेला सुर्य...
या क्षणाच्या साक्षीदार दोघी आपण..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.५७

हा तर खेळ रोजचाच
चाले या दुविधा रोजच्याच
निरोप तुला देण्या आला सूर्य
दुख: ते ना सोसले त्या सागरला
त्याने हि हंबरडा फोडला.........
रणजीत.....०८/१०/११. (रात्री ०२.०६)

छायाचित्र चारोळ्या: खेळ बालपणीचा..

बालपणी खेळ तो...
खेळ भातूकली चा....
खेळता खेळता सरून जाई...
काळ तो बालपणी चा..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.३५

मी मोठा झालो की..
तुला ठेवेन खूप सुखात....
तूझ्या साठीच बांधेन माडी...
या मावळत्या सुर्याच्या प्रकाशात..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.४२

स्वप्नांच्या वाटेवर
शीतल गारवा
दोघे गुंफुनी हात
गाऊ मधुर मारवा
रेशु ०९ /१०/२०११ रात्री १.४३

आपल्या छोट्याश्या घराला...
सुर्याची असेल खिडकी...
दिवसातुन एकद तरी...
मारेल तो इकडे फ़िरकी..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.४६

या कातर सायंकाली
मन हेलावून जाते
थरथरत्या स्पर्शाने
तन रोमांचित होते !
रेशु ०९ /१०/२०११ रात्री १.४6

हा खेळच भुरळ
पाडे प्रत्येकाला
स्वप्ने दाखवी प्रत्येक क्षणाला
चल पुन्हा तयारी करू
स्वप्न पाहण्याला.......
रणजीत.....०८/१०/११. (रात्री १.४६)

मनाची तनाला
नेहमीच असते साथ
सांग नाही सोडणार
हाती घेतलेला हात !
रेशु ०९ /१०/२०११ रात्री १.५१

तुझी माझी साथ
अशीच राहू दे
हा तर खेळ झाला
पण आयुष्यभर असाच
हात हातात राहू दे......
रणजीत.....०८/१०/११. (रात्री १.५६)

आज या खेळात .
मला हि पहायचे आहे
कोण कसे बांधता आहेत माडी
नसेल येत तर बांधता तरी
पाहायचे आहे कोण कशी घरची वाट धरी
रणजीत.....०८/१०/११. (रात्री ०२.०६)

त्या क्षितीजाच्या अलीकडे,
तू कुठेतरी असशील !
मला दिसत नसलास तरी,
तू मात्र माझाच राहशील !!
रेशु ०९/१०/२०११ रात्री २.२०

मी तुझा तो कसा होणार
क्षितीज माझे हे
तुला कसे सापडणार
कारण मी माझाच जगणार.....
रणजीत...रात्री २.२६)०९/१०/११

कुठॆतरी ह्र्दयात इतिहास सारा आठवशील
तो आठवण्यापुरता तरी तु…
नक्कीच माझा राहशील
पण तुझी शपथ पुन्हा प्रेम करणार नाही….
रेशु ०९/१०/२०११ रात्री २.२७

तुझा इतिहास तो आज
वर्तमान आहे माझा
शपथा त्या का घ्यायच्या
असे प्रेम ना पचेल तुला....
रणजीत...रात्री २.४०)०९/१०/११

शपथ जरी घेतली
तरी ओढ संपणार नाही
आता बस कर हा शब्दांचा तमाशा
नाहीतर माझे अश्रू थांबणार नाही
रेशु ०९/१०/२०११ रात्री २.४९

दुख: किती ते तुझ्या मना
मला हि पाहायचे
ओढ ती अशी कशी
शपथ तर तू घे पण शब्द ना
मांडलेस तर मरण ते मजला यायचे...
रणजीत...रात्री २.५३)०९/१०/११

शपथा जरी खोट्या झाल्या
तरी मरण येणार नाही
केलेल्या पापाची शिक्षा दिल्याशिवाय
वरती देवही घेणार नाही
रेशु ०९/१०/२०११ रात्री ३.००

पापी मी का तू
हे न उमजेल देवाला
हा तर शब्द खेळ
यात हि तू स्वर्गा नरका सकट
देवाला हि आणले भागीदारीला
रणजीत...रात्री ०३.०३.)०९/१०/११

शब्द नाही आहेत हे सगळे
पाप पुण्याचा होऊ दे सरळ सामना
देव देव्हाऱ्यात राहतो
दुनियेची त्यास काय कल्पना
रेशु ०९/१०/२०११ रात्री ३.१५

तुझे हे असले शब्दच
जगणार्याला हि कायमचे झोपवतील
एक काय पण सारेच देव
न्याय निवडा करयाला
तुझ्या माझ्या समोर येतील.........
रणजीत...रात्री ०३.२६)०९/१०/११

फक्त शब्दच तर
माझ अस्तित्व आहे
त्यासाठी सगळ्यांचा जीव घेईन मी
मग करू दे देवाला काय तो न्याय निवडा
रेशु ०९/१०/२०११ रात्री ३.४२

तुझ्या शब्दानेच मारले
माझ्या या भोळ्या हृदयाला
लाखो वार करुनी
आणकीन जीव घेनाची धमकी हि खूप देतेस
देवाला हि वेटीस धरतेस.......
रणजीत...रात्री ०३.४६)०९/१०/११

मजेदार चारोळ्या: चारोळीला चारोळीने उत्तर..

तू जाऊच शकत नाही
माझ्यापासून दूर
शब्न्दात माझ्या असा गुरफात्लास कि
आता तुला ते सोपं नाही ..सोपं नाही ..सोपं नाही ..
रेशु ०९/१०/२०११ रात्री ३.१५

जावे तर सगळ्यांनाच लागे
हा तर खेळ नियतीचा
क्षणिकच तू अन मी
यात गुरफटणार तरी मी कसा
रणजीत...रात्री ०३.०६)०९/१०/११

नात तुझं माझं,
एका क्षणभराचा !
अन त्याच क्षणात
लाख जन्म जगणाऱ्या अमृती जीवनाचं !!
रेशु ०९/१०/२०११ रात्री 3.३२

नात तर सांगते
अन दुसर्याच क्षणाला
मला हरवण्याचा गोष्टी तुझ्या
अमृत ते हि विषासमान वाटे ....
रणजीत...रात्री ०३.३६)०९/१०/११

तुला विष वाटो व अमृत
मला जिंकण्याचं वेध लागलाय आता
जसा मेलेल्या
आत्म्याला जगण्याचा आकर्षणाचा !!
रेशु ०९/१०/२०११ रात्री ३.४८

हडळीसारखे वागणे तुझे
जिंकण्यासाठी आंधळीच झालीस तू
हे ना कळे तुला जिंकली जरी तू
हरण्याचे दुख: ना आजतागायत मला
तुझ्या चेहऱ्यावरच्या हास्यात आनद तो मजला....
रणजीत...रात्री ३.५६)०९/१०/११

या मांडलेल्या खेळाच्या बाजारात
तू बोलतोस तुझी जीत आहे
खर तर तू तुझ्या मनाला विचार
जिंकून काहीतरी नक्की हरलायस तू
रेशु ०९/१०/२०११ रात्री ४.०५

आज थांबलो आहे जिंकून हरण्यासाठी
पुन्हा नाही थांबणार शब्दांचा खेळमांडण्यासाठी
अस्तित्वासाठीच जगडतो आहे आजही
म्हणून तर मृगजळसारखे जगणे मला नाही जमणार.....
रणजीत...पहाटे ०४.२१)०९/१०/११

तुझ्यात स्वत:ला,
बघत होते मी.
तुझ्यात मन माझे,
शोधत होते मी.
आता तुझ्या जिंकण्यात
स्वताला हि हरवले मी
रेषु ०९/१०/२०११ रात्री ४.२५

असे माझ्यात तुझे
बघणे ते कसे म्हण्याचे
अंता पर्यंत वाट पाहायाची
अन शेवटी तूच हरलास
असे दाखवून जयायचे....
रणजीत...पहाटे ०४.३०)०९/१०/११

दिलेली भेट प्रेमाची असते, तागडीत तिला तोलू नये
खोक्यावारल्या खोडलेल्या किमतीचा अंदाज कधी करू नये
जेव्हा जगन हा एक भार असतो तेव्हा शब्दांचाच आधार असतो
म्हणून तू आणि मी जिंकलो आहोत का हरलो ते कृपया सिद्ध करू नये
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ४.३७

थांब थोड बोलायचे आहे
असे म्हणून कोणी आईकून
घेत नसे कोणाचे
जीवनात हार जीत महत्वाचे नाही रे
हसत जगत असताना चार शब्द प्रेमाने बोला रे
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ४.४०)

मुलगा चार शब्दांच आयुष कधीच नसत
सा-या शब्दात आयुष्य घुत्मल्त
हवी असते एखादी गोष्ट जेव्हा
आयुष्यच आपल्याशी दगा करत
लक्ष्मीकांत

अरे मना.. तू अजुन बेचेंन का?..
प्रेमाच्या जखमा अजुन भरल्या नाहीत..
तरी त्याची ओढ का????
काटेरी एकाकी रस्त्यावरून चालताना...
फुलांच्या पायघद्यांची स्वप्न का??????
आयुष्याची मिळालेली वाट एकटीने,
चालायची अस समजून सुद्धा...
कोणाचा सोबतीची आस का????? -
आयुष्यात हरलेय पूर्णपणे,
तरी जिंकायची आस का ???????????
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ४.४९

मी नाही हरलो
नाही माझे प्रयत्न हरणार
माझ्या बरोबर
तुम्हाला हि जिंकावेच लागणार
रणजीत.....१५/०८/११/ (रात्री १२.१०)

हरू नकोस इतक्यात
जगण आयुष्या पेक्षा मोठ आहे
थांबू नकोस आता
खड्ड्यांची हि सुरुवात आहे
लक्ष्मीकांत

भूतकाळात कासवाला कमी लेखले
आळसाने सस्याला हरवले..
पण,आज कासव जिंकले नाही
कारण,ससा वाटेत ’झोपला’ नाही..
अरे,ससा आता कधीच हरणार नाही
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ४.५५

भूतकाळातील चुका तू सुधरशील
हे खरे जरी एकदा तू हरले
पुन्हा हट्ट करू नको जिंकण्याचा
काय सांगावे कासवामुळेच हे धाडस तुला आले...
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.००)

हुश्शश्श्श्स, झाले शांत सगळे
गेले सारे रातकिडे
जगणे संपल्यावर कळले
मृगजळा मागे धावणे व्यर्थ आहे
लक्ष्मीकांत

ना जिंकण्यासाठी ना हरण्यासाठी
शब्द देऊनच शब्द घेतो आहे
शब्दच्या देवाण घेवानेच तरलो आहे
घड्याळाकडे लक्ष ना कोणाचे
तू मी शब्दांचा खेळ खेळतो आहे
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.०६)

धाडस मला भूतकाळातील चुकानेच आले
पण जिंकण्यासाठी cheating नाही केली खेळात
आजही परत मी जिंकता जिंकता हरले
कशी नशीबाने परत थट्टा माझी मांडली या काळात
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ५.१४

तुझ्या धाडसाला सलाम माझा
पण अनाधिकृतपणे खेळ ना खेळलो मी कधी
तू तर हरवण्यासाठी खेळतेस आणि मी जिंकवन्यासाठीच
म्हणून तर तुझी थट्टा तूच करतेस.......
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.२२)

हातात हात देती, तू चालशी पुढे अन्
अर्ध्यावरुन मागे वळतात लोक येथे
सोडून एक‌‍ट्याला पळतात लोक येथे
दुसर्यांना हरवण्यासाठी डाव मांडतात लोक येथे
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ५.३३

हात आपण सोडतो, नावे लोकांना ठेवतो
डाव हरण्या जिंकण्यासाठी कधीच नसतो
तुलना करून आपणच त्यामागच समाधान जाळतो
लक्ष्मीकांत

हात देऊन मागे खेचणे ना जमले मला
आता पर्यंत मदतीचा हात देतो आहे लोकांना
तेच लोक हरण्या जिंकण्याची भाषा करतात
चार चोघात मलाच परके करून
स्वतःच माझ्या पाठीत खंजर खुपसतात..
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.३६)

आपल्यासाठी परके कोणीच नसते
आपणच आपल्यासाठी परके बनतो
चार चौघांच्या प्रतिष्ठे पायी
आपणच आपलेपण गमावतो.
लक्ष्मीकांत

आता सगळं संपलय,
उठलाय खेळाचा बाजार
जडलाय मनाला
एकटेपणाचा भयंकर आजार
डोळ्यात माझ्या डोलतेय
आता माळ आसवांची
पाहतेय मी वाट एक
नवी सकाळ उजाडण्याची
पण आता घाई नाही करणार
नवा बाजार मांड्ण्याची
आणि आता वाट पाहणार
नाही कुणाच्या - साथीची
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ५.५०

वाट पहाणे हेच तर जीवन आहे
साथ घेण्यापेक्षा देण्याला महत्व आहे
झाल असत जर सगळ वेळे आधी
म्हटल असत मग आता जगण्यात काय मजा आहे .
लक्ष्मीकांत

आता खर असं वाटतेय कि
मी जिंकुनही हरले तू हरुनही जिंकला
मला खुप गर्व होता माझ्या शब्दांवर
आता तेच शब्द फ़क्त हसुन पाहत आहेत माझ्यावर
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ६.००

खूप खेळ खेळलो चारोळ्यांचा
वाटे कधी ना थांबो हा खेळ चारोळ्यांचा
पण तू अशी साथ ना कधी देणार
ना मला हौस जिंकण्याची
मला तर हौस दुसर्यांना सुखी पाहण्याची
म्हणूनच तुला जिंकवण्या करीता
केलेल्या चारोळ्या पुन्हा खोडतो मी....
तुझ्याच चारोळ्या जास्त तुलाच दर्शवतो मी....
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ५.५६)

शब्द आहेत ते
कधी न रुसणार कुणावर
मायेने गोंजारा त्यांना
नेतील ते एका सुंदर वळणावर
लक्ष्मीकांत

शब्दही उरले नाहीत आज सांत्वनाला !
अर्थ कधीच नव्हता त्या माझ्या शब्दांना !
एकदाच ये एकदाच माझ्यासाठी ,
यायचे न मी तुला पुन्हा कधी विनवायला !!!!!! !
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ६.१२

इतक्यात तू कशी हरली
बाजार तो कसला
मानतेस हा तर खेळ शब्दांचा
दुख: सोबत एकटेपणा आले तुझ्या वाट्याला
आम्ही असता तुझ्या सोबतीला
हसतात हसतच आले असतील ती आसवे
उगाच त्यांना दुखाचे नाव नको देऊ
आस ती डोळ्यात असवी नव्याची
पण साथ तुझी मी अजून सोडली नाही
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ६.१४)

हे ते पहा सूर्य उगवतो आहे
कदाचित त्याला हि घाई झाली असावी
शब्दांचा खेळ हा पाहणायची
आम्ही थकलो नसून
जागेच आहोत तुझ्यासाठी
हे सांगायचे आहे मला हि
०९/१०/११. (पहाटे ६.२६)

अखेर तू मला सोडून गेलास ,
भन्नाट वादळी वा-याप्रमाणे.
मी तुझ्या प्रेमात वेडी झाले ,
पण ते प्रेम तु पायदळी तुडवून गेलास ,
दिलास नकार मजला आणी,
परका करून गेलास .
जिंकून सवॅकाही
इथेच मला कायमचा हरवून गेलास
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ६.३०

हि घाई तर तुलाच
मला सोडून जाण्याची
वादळा समोर नतमस्तक होण्याची
आले प्रसंगात साथ न देताच
मला खोटे ठरवण्याची
जिंकणार तरी तू कशी
तुही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मी....
०९/१०/११. (पहाटे ६.३६)


तू जिंकण्यासाठी स्वतःला हरवत गेले मी ..
स्वतःचे अश्रू विसरून तुला हसवत गेले मी ...
वाटलं होता थांबवशील मजला ..
नकळत स्वतःला एकट टाकून गेले मी ..
रेशु ०९/१०/२०११ पहाटे ०६.४३


मी ना आस धरली जिंकण्याची
पण एक बरे तू हसण्यास लागली
आता हरून देखील जिंकलीस
मग तू एकटी कशी म्ह्नायायची.......
रणजीत.....०९/१०/११. (पहाटे ६.४६)