Showing posts with label विपुल. Show all posts
Showing posts with label विपुल. Show all posts

Tuesday, October 18, 2011

छायाचित्र चारोळ्या: राघू आणि मैना...

फांदीवर बसलेत
जोडीने राघू आणि मैना
आय लव म्हणता
राघूची उडाली दैना
कृष्णा

कान कर ना इकडे ..
हळूच तुला विचारते ..
खर खर सांग ..
मी तुला किती बर आवडते ..
मंजुषा

किती आवडतेस तू मला
हे कस सांगू तरी तुला....
तुझा विश्वास नाही बसणार
तुझ्यासाठी सोन्याच घरट बांधणार
कृष्णा

इटुकल्या फांदीवर....
पिटुकली माझी मैना....
चिमुकल्या नजरेने पाहता....
मज आता काहीच सुचेना........
सुप्रिया.

आणलेय तुला माझे मैना...
मिरची हिरवी गार ...
दूर जाता तुझ्या पासून..
आठवण येते फार...
@*मंथन*

तुझ्या आठवणीत ग मैने रात्र-रात्र जागाव लागत...
किती छान आहे ग असच तुझ माझ्या जवळ असण....
तू अशी खेटून बसलीस कि......
मग जग हि सुंदर दिसायला लागत.....
सुप्रिया.

रात्र तर आठवण तुझी.
घुमतेय माझ्या मनात ग...
मैत्रीच्या या वाटेवरती...
ना जाने काय मनात ग...
@*मंथन*

देवा नि बनवली आपली जोडी
पण दुनिया वाले काढतात आपली खोडी
स्वतहाच्या स्वार्ता साठी आपले नाते तोडी
तुझी मला आणि माझी तुला लागली आहे गोडी
पण माणसाना कधी समजणार नाही आपली प्रेमाची जोडी
*विपुल*

ईश्य...आमच्या दोघांचे ..
चाललंय गुटूर गु ..
नजर फिरवा ना तिकडे ..
नका असे पाहू ...
मंजुषा

मैना...ए ऐक ना, मला ना आज तुला
काही तरी सांगायचे आहे
मला ना काही तरी होत आहे ..
राघू...सांग ना काय होत आहे ते...
मैना...अरे मला ना तुला काही तरी सांगायचे आहे
राघू...सांग ना ग काय आहे ते
मैना - काही नाही रे i love यौ...
*प्रेम*

जीवनाच्या या प्रवाहात
घट्ट साथ तुझी माझी
किती आली वादळे तरी
त्यात सोबत तुझी माझी..
कृष्णा

भेट वेळ रोजची ठरलेली...
तरी अजून काय ठरणार आहे..
बोलायचं पटकन प वेडं मन
त्याचाही म्य्हुर्ता पाहणार आहे...
{{ अर्पिता..}}

आपल्या दोघांच गुपित
आपल्यातच ठेवायचं...
:
:
रोज सांजच्या
वेळी इथच भेटायचं
:- सुरेश..

Saturday, October 15, 2011

छायाचित्र चारोळ्या: चिमणी अन तिचे पिल्लू


चिमणे झुंज तुझी माझी
अशीच चालू राहणार
तू उडून गेल्यावर मग हा
चिमणा कोणाशी भांडणार?
कृष्णा

किती जतन केले आहे......
तुझे माझे नाते जपायला.......
तुझा माझा सहवास हवा....
आपले घरटे रचायला.....
हि मजा काय वेगळीच आहे....
तुझ्या चोचीतून दाणे टिपायला.....
सुप्रिया.

तुझ्या माझ्या नात्यात
एक मजाच आहे निराळी
एक घास तू आणावा
अन मी तो अलगद टिपावा
कृष्णा

असंच राहू दे नाते अपुले...
त्या नात्यात सदैव प्रेम वसुदे.....
येवोत मग हजारो वादळे.....
त्या वादळात फक्त साथ तुझी असूदे......
सुप्रिया.

जात आहे दुर तुला सोडुन
विसरू नकोस मला
मी आहे तुझा,परत
एक दा मागे वळुन पाहतो
तुला मी च तुझा मीच तुझा.
*विपुल*

प्रेमानेच विणलंय नात आपलं
त्याला आहे दोघांनीही जपलं
किती आली अन गेली वादळ
तरी प्रेमानच त्याला आहे पेललं
कृष्णा

आईचे पिल्लाशी असेच असते अवीट नाते ..
वणवण फिरून पिल्लासाठी आणते शिते ..
स्वत: उपाशी राहते आणि पिल्लाला भरवते ..
वर्षानुवर्षे आपल्या आईनेही हेच केलेले असते ..
मंजुषा

घास आणते पिलांसाठी ...
अशी कशी वेडी हि आई ...
चोची मध्ये सामावलेले...
जगातील सुख दिसून येई..
@*मंथन*'

किती दुरून तिने पिलासाठी
एक घास आहे आणला
भरवता भरवता तिचा
जीव आहे टांगणीला लागला
कृष्णा

चोचीमध्ये घास बाळा...
आहे तुझ्यासाठी....
फिरून आली रानोमाळ बाळा...
वेडी हि माय तुझ्यासाठी...
@*मंथन*'

जड अंतःकरणाने आई ..
आज तुझा निरोप घेतो ..
माझ्यासाठी तू पाहिलेली स्वप्ने ..
पुरी करूनच येतो ..
मंजुषा

तुझ्यासाठीच आणलाय
घास फिरून रानोमाळ
बघ किती लोटला हा काळ
आता लवकर मोठा हो बाळ
कृष्णा

देणारे देत जातील
खाणारे खूप खातील
असेच घास भरवले
आम्ही राजकारण्यांना
काही काळ सरल्यानंतर
लाथ मारतात जनतेला
हे पाखरू हि असेच करेल
एक दिवस आईला सोडून पळेल.......
रणजीत....दुपारी २.३६ १५/१०/११

सदैव धडपडते पिल्लांसाठी हि आई....
उन-पाऊस-वारा ह्याची तिला तमा नाही....
अजाण असतात ती पिल्ले सारी.....
पंख फुटता भुर्रकन उडून जाई.......
सुप्रिया.

एक-एक धागा शोधून घरटे त्यांनी रचले.....
मायेच्या प्रेमाने होते हो विणले.....
उन-पाऊस-वारयातही त्यांनी ते जपले....
त्या पक्षांचे घरटे हळूच हो मी टिपले....
सुप्रिया.

पिल्लांसाठी सहन करते उन-पाऊस-वारा...
धडपडून आणते त्यांच्यासाठी चारा...
करीत नाही कधी अपेक्षा फार....
मोठा झाल्यावर हा ना करेल थारा....
कृष्णा.

Wednesday, October 5, 2011

विपुल च्या चारोळ्या भाग २

नाते  जोडताना  कधी  तरी
प्रथम  शपथ  घ्या  त्या  नात्या ची
दुनिये  मधून  जरी  निघून  गेलो 
तरी  साथ  आहे  आपल्या  सात  जन्माची
विपुल


मी कधीच कोणाचा नव्हतो
पण जेव्हा तुला मी बघितले
मी माझा कधीच झालो नाही
वारा जसा फिरतो तसा फिरत राहिलो
आणि तुझी सावली शोधत राहिलो
विपुल .

मी नेहमी च तुझ्या अवती भवती असतो
फरक फक्त एवढाच होता कि तु होतीस
त्या वाटेवरती माझी नजर नाही गेली
विपुल

डोळ्या मधुन किती भाषा बोलणार
जसे डोळे फिरवशील तसे ती
भाषा बदलणार, प्रेमाची भाषा
शिकुन घे आणि मग डोळ्या
मधुन प्रेम व्यक्त कर
विपुल

मी लावले आहे तुझ्या माझ्या दोस्ती चे रोपटे
त्याला तुझ्या मायेची गरज आहे
माया जरी दिली नाही तरी चालेल
पण तुझी छाया त्याच्या वर पडली पाहिजे
विपुल

त्या नात्या ला किमंतच नव्हती
उधारी चे होते ते नाते फसवे होते
आशा होती मनात पण तिला
वाटायचे सांगावे येऊन माझ्या कानात
विपुल

सुन्न हो खन्न हो पण शुन्य होऊ नको
ती येईल तुझ्या साठी परत
रडु नको तिझ्या साठी परत
मी सांगणार नाही तुला परत
आपला राम आणि आपला च भरत
***विपुल...,

कुठे जाशील तु दुरावा करून
परत येईचे आहे तुला इथेच फिरून
मग जाऊ नकोस तु परत
भेटण्या चा बहाणा करून
**विपुल**




Monday, October 3, 2011

विपुल च्या चारोळ्या..

मृत्युवर कोणाचा विजय नाही
गरज नाही कोणाची कोणाला
जवळ असुन कोण कोणाला विचारत नाही
लहान कोणी नाही आणि मोठा पण कोण नाही ह्या जगात
**विपुल**

जीवनात हा थेंब अत्यंत महत्वाचा आहे
कारण कोण ना कोण तरी
कुठे ना कुठे त्याला
दगा फटका बसतोच .
**विपुल**

मी लावले आहे तुझ्या माझ्या दोस्ती चे रोपटे
त्याला तुझ्या मायेची गरज आहे
माया जरी दिली नाही तरी चालेल
पण तुझी छाया त्याच्या वर पडली पाहिजे
*विपुल*

आता तुझ्या शिवाय मन लागत च नाही
कुठे तरी असतो तुझ्या आठवणी मधी
सांगणार तुला कोण तुझ्या साठी
आहे बसला आहे कोण तो तुझ्या साठी झुरत
*विपुल*