Wednesday, October 5, 2011

कृष्णा च्या चारोळ्या..भाग २

तुला मनातले कसे सांगाव,
कुणालाही न समजत तुलाच ते कालाव....
चारोळीतील माझ्या  मर्म,
फक्त  तूच... जाणाव....
@कृष्णा

सखे सांग मला ,
असा  काय केला  मी  गुन्हा ,
तूच ठरविलेस मला गुन्हेगार. .
अजूनही करतोय तोच विचार...
@ कृष्णा

गुलाबी स्वप्नात आले
एक गुलाबी फुल....
हाथ लावायला उठताच
त्याने दिली मला झूल...
कृष्णा

जांभूळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजतो....
इथे तर आई भवानीचा
उदो उदोकार गाजतो....
कृष्णा

सखे तू नाहीस ग भांडत
तुझे शब्दच भांडतात
एक एक समोर येवून
चारोळीतून गार्हाण मांडतात
कृष्णा

सखे करतोय मला बेधुंध
हा रातराणीचा सुगन्ध
फेर धरतात चंद्र चांदणी
नभ उतरून आले अंगणी
कृष्णा

0 comments:

Post a Comment