Friday, October 7, 2011

दसरा....एक सोनेरी पान....

जागे पनी मला पडले सुंदर असे स्वप्न
दसर्याचा दिवस अन मी होतो उद्विग्न
मनाची माझ्या उटली होती घालमेल
द्यायचं होत मला सोन्याचे पान
प्रीतीची करून द्यायची होती जाण
सतावत होती एकच मला चिंता
हे जमेल का मला काय म्हणेल ती
केला मी विचार..अन ठरवलं एकदाच
जमेल न जमेल असा विचार कारण काय हिताचं
कावरा बावरा झालो....फक्त विचार करून..
ठरवलंच होत तसं अन वागलोही तसाच
बघून इकडे तिकडे घुसलो मी घरात...
श्वास माझा चालत होता जोरात
होती ती उभी मैत्रिणीसोबत घरात
नजरानजर होताच निशब्ध ती
मग मात्र नाही राहावल...
काही बोलायच्या आत होत
तीन स्वतःला सावरल..
न बोलताच होत आपट्याचे
सोनेरी पान तिन सरकावल..
मीही तिला दिलं....तीनही मला
माझिया मनीच्या ओळी लिहिल्या
मी होत्या.. त्या सोनेरी पानावर
अजूनही तिचा प्रसन्न चेहरा
खरच बिंबलाय माझ्या मनावर
-कृष्णा

0 comments:

Post a Comment