Wednesday, October 5, 2011

संजय च्या चारोळ्या..भाग २

भावना काय असतात ग ...
शब्द असतात अंतरीचे ...
काही मला समजलेल्या ...
काही तू समजून घेतलेल्या ..
*संजय**..

नवरा उतावळा होता
गुडघ्याला पण बाशिंग होतं..
पण मन चंचल तुझं...
नाही समजू शकले त्याला ....*संजय**..

कोरे पुस्तक पण आता
खूप काही मांडून जात....
न वाचताच बरेच काही सांगून जात..
लिह तू दोन शब्द सखे
सखे आता माझ्यासाठी...
सुरु होईल वाट पण तुझ्या प्रीतीची..*संजय**...

नातं नव्हते तुझे माझे काही...
पण मला तुला भेटायचे होते...
एक निखळ मैत्रीण कशी असेन ...
तू नाही तुझे मन पहायचे होते...*संजय**

दूर तुझ्यापासून जाताना ...
अश्रू माझे गळत होते..
तुला देलेले वचन कदाचित...
ते आजपण पाळत होते...*संजय**...

काही नाती अशी असतात...
तोडले तरी तुटत नाहीत...
प्राण कंठाशी आले तरी..
श्वास मात्र सुटत नाहीत..*संजय**...

प्रत्येक वेळी विष पिऊन ..
कंठ निळा होत नाही...
निळे पडले शरीर माझे...
प्राण त्यात उरले नाही...*संजय**..

वाटी जळतात जसं माझ
मन जळत....
तेलही जळत, तूपही जळत
शेवटी काय उरतं...एक वाट तुझी ..* संजय**...

सवय झाली तुला आता ...
वेळ देऊन वेळेवर न येनायची....
आता मी पण करत असतो copy
तुझ्यासारख्या बहाण्याची....*संजय**..

कश्याला म्हणू मी सुख...
तू जवळ नसन्याला ?
कि अखंड या दुनियेत
माझ्या एकट्या असणायला ...*संजय**..

कश्याला म्हणू मी सुख...
तू जवळ नसन्याला ?
कि अखंड या दुनियेत
माझ्या एकट्या असणायला ...*संजय**..

जन्म आणि श्वास सोबत असतात...
कवी आणि शब्द सोबत असतात...
बस जाणीव नसते त्यांना...
एकदुसार्याच्या अस्तित्वाची...*संजय**..


जीव जडला तिच्यावरी...
यात माझे काय चुकले..
दोघे अपुरे एकदुसर्यापरी..
प्रेमापुढे सगळेच झुकले ...*संजय**...

उन्हामध्ये उभी राहिलेस ..
पहा सावली तुझ्या सोबत आहे...
साथ अशीच असते प्रेमाची...
कळून पण न कळणारी...*संजय**..

0 comments:

Post a Comment