Monday, October 17, 2011

कालचा पण एक दिवस होता

कालचा पण एक दिवस होता
आजचा एक क्षण देखील आहे
संपत चाललेल्या अश्रूंना आता
वाली कुठलासा कण देखील आहे

मात्रा सगळ्या सरताना अलगद
संपत्या एका रात्रीची कथा
समेवर येत्या माझ्या तानेला
बोचऱ्या आलापीची वेडी व्यथा

रचले नवे मनोरे काही
काही हवेल्या ही उभारल्या आहेत
इवल्याशा यशाच्या आशेने
आकांक्षा फ़ारच पुढारल्या आहेत

तडीपार विवेकाला केला आता
भावनेचेच इथे सारे राज्य आहे
गुणाकार आयुष्याचा मांडून ठेवला
आणि सुखच इथे भाज्य आहे

घट्ट "काल" धरला होता
उद्या नवा मी बघते आहे
ठिसूळ काचांच्या पायावरती
मजले बांधू धजते आहे

सावरलेले मन माझे हळवे
अन फ़ास त्याच्या जोडीचे
एक हसावी एक रडावी पापणी
विरोधाभास तसेच त्या तोडीचे

संहिता

0 comments:

Post a Comment