Showing posts with label छायाचित्र चारोळ्या... Show all posts
Showing posts with label छायाचित्र चारोळ्या... Show all posts

Tuesday, October 18, 2011

छायाचित्र चारोळ्या: राघू आणि मैना...

फांदीवर बसलेत
जोडीने राघू आणि मैना
आय लव म्हणता
राघूची उडाली दैना
कृष्णा

कान कर ना इकडे ..
हळूच तुला विचारते ..
खर खर सांग ..
मी तुला किती बर आवडते ..
मंजुषा

किती आवडतेस तू मला
हे कस सांगू तरी तुला....
तुझा विश्वास नाही बसणार
तुझ्यासाठी सोन्याच घरट बांधणार
कृष्णा

इटुकल्या फांदीवर....
पिटुकली माझी मैना....
चिमुकल्या नजरेने पाहता....
मज आता काहीच सुचेना........
सुप्रिया.

आणलेय तुला माझे मैना...
मिरची हिरवी गार ...
दूर जाता तुझ्या पासून..
आठवण येते फार...
@*मंथन*

तुझ्या आठवणीत ग मैने रात्र-रात्र जागाव लागत...
किती छान आहे ग असच तुझ माझ्या जवळ असण....
तू अशी खेटून बसलीस कि......
मग जग हि सुंदर दिसायला लागत.....
सुप्रिया.

रात्र तर आठवण तुझी.
घुमतेय माझ्या मनात ग...
मैत्रीच्या या वाटेवरती...
ना जाने काय मनात ग...
@*मंथन*

देवा नि बनवली आपली जोडी
पण दुनिया वाले काढतात आपली खोडी
स्वतहाच्या स्वार्ता साठी आपले नाते तोडी
तुझी मला आणि माझी तुला लागली आहे गोडी
पण माणसाना कधी समजणार नाही आपली प्रेमाची जोडी
*विपुल*

ईश्य...आमच्या दोघांचे ..
चाललंय गुटूर गु ..
नजर फिरवा ना तिकडे ..
नका असे पाहू ...
मंजुषा

मैना...ए ऐक ना, मला ना आज तुला
काही तरी सांगायचे आहे
मला ना काही तरी होत आहे ..
राघू...सांग ना काय होत आहे ते...
मैना...अरे मला ना तुला काही तरी सांगायचे आहे
राघू...सांग ना ग काय आहे ते
मैना - काही नाही रे i love यौ...
*प्रेम*

जीवनाच्या या प्रवाहात
घट्ट साथ तुझी माझी
किती आली वादळे तरी
त्यात सोबत तुझी माझी..
कृष्णा

भेट वेळ रोजची ठरलेली...
तरी अजून काय ठरणार आहे..
बोलायचं पटकन प वेडं मन
त्याचाही म्य्हुर्ता पाहणार आहे...
{{ अर्पिता..}}

आपल्या दोघांच गुपित
आपल्यातच ठेवायचं...
:
:
रोज सांजच्या
वेळी इथच भेटायचं
:- सुरेश..

Saturday, October 15, 2011

छायाचित्र चारोळ्या: चिमणी अन तिचे पिल्लू


चिमणे झुंज तुझी माझी
अशीच चालू राहणार
तू उडून गेल्यावर मग हा
चिमणा कोणाशी भांडणार?
कृष्णा

किती जतन केले आहे......
तुझे माझे नाते जपायला.......
तुझा माझा सहवास हवा....
आपले घरटे रचायला.....
हि मजा काय वेगळीच आहे....
तुझ्या चोचीतून दाणे टिपायला.....
सुप्रिया.

तुझ्या माझ्या नात्यात
एक मजाच आहे निराळी
एक घास तू आणावा
अन मी तो अलगद टिपावा
कृष्णा

असंच राहू दे नाते अपुले...
त्या नात्यात सदैव प्रेम वसुदे.....
येवोत मग हजारो वादळे.....
त्या वादळात फक्त साथ तुझी असूदे......
सुप्रिया.

जात आहे दुर तुला सोडुन
विसरू नकोस मला
मी आहे तुझा,परत
एक दा मागे वळुन पाहतो
तुला मी च तुझा मीच तुझा.
*विपुल*

प्रेमानेच विणलंय नात आपलं
त्याला आहे दोघांनीही जपलं
किती आली अन गेली वादळ
तरी प्रेमानच त्याला आहे पेललं
कृष्णा

आईचे पिल्लाशी असेच असते अवीट नाते ..
वणवण फिरून पिल्लासाठी आणते शिते ..
स्वत: उपाशी राहते आणि पिल्लाला भरवते ..
वर्षानुवर्षे आपल्या आईनेही हेच केलेले असते ..
मंजुषा

घास आणते पिलांसाठी ...
अशी कशी वेडी हि आई ...
चोची मध्ये सामावलेले...
जगातील सुख दिसून येई..
@*मंथन*'

किती दुरून तिने पिलासाठी
एक घास आहे आणला
भरवता भरवता तिचा
जीव आहे टांगणीला लागला
कृष्णा

चोचीमध्ये घास बाळा...
आहे तुझ्यासाठी....
फिरून आली रानोमाळ बाळा...
वेडी हि माय तुझ्यासाठी...
@*मंथन*'

जड अंतःकरणाने आई ..
आज तुझा निरोप घेतो ..
माझ्यासाठी तू पाहिलेली स्वप्ने ..
पुरी करूनच येतो ..
मंजुषा

तुझ्यासाठीच आणलाय
घास फिरून रानोमाळ
बघ किती लोटला हा काळ
आता लवकर मोठा हो बाळ
कृष्णा

देणारे देत जातील
खाणारे खूप खातील
असेच घास भरवले
आम्ही राजकारण्यांना
काही काळ सरल्यानंतर
लाथ मारतात जनतेला
हे पाखरू हि असेच करेल
एक दिवस आईला सोडून पळेल.......
रणजीत....दुपारी २.३६ १५/१०/११

सदैव धडपडते पिल्लांसाठी हि आई....
उन-पाऊस-वारा ह्याची तिला तमा नाही....
अजाण असतात ती पिल्ले सारी.....
पंख फुटता भुर्रकन उडून जाई.......
सुप्रिया.

एक-एक धागा शोधून घरटे त्यांनी रचले.....
मायेच्या प्रेमाने होते हो विणले.....
उन-पाऊस-वारयातही त्यांनी ते जपले....
त्या पक्षांचे घरटे हळूच हो मी टिपले....
सुप्रिया.

पिल्लांसाठी सहन करते उन-पाऊस-वारा...
धडपडून आणते त्यांच्यासाठी चारा...
करीत नाही कधी अपेक्षा फार....
मोठा झाल्यावर हा ना करेल थारा....
कृष्णा.

Thursday, October 13, 2011

छायाचित्र चारोळ्या: मेहंदी..

रंगलीय हि मेहंदी हातावर
पण घाव करतेय काळजावर
तुझी मेहेंदी अशीच खुलू दे...
रंगात सदैव मला भुलू दे
कृष्णा

ते हाथच काय,जे हिनीत नाही,
तळवेच काय जे,ओल्या मेंदी वासित नाही,
ती नखंच काय,जी रंगीत नाही,
ती स्त्रीच काय,जी शृंगारीत नाही......
सुप्रिया.

रंगलेली मेहंदी दाखविताना
तू किती खुलली होतीस.....
तुझा हात माझ्या हाती आहे
हे पण क्षणभर भुलली होतीस
कृष्णा

रेम केलंय मी तुझ्यावर त्या तुझ्या निर्मळ मनावरती...
बांधली आहे गाठ तुझी-माझी या भू-तलावरती .....
शपथ घेतली आता लावेन तुझ्याच नावाची मेहंदी.....
सुप्रिया.

Tuesday, October 11, 2011

छायाचित्र चारोळ्या: कोजागिरीचा चंद्र..

कोजागिरीचा चंद्र मज....
दिसे तुझाच ग साज....
हळव्या आपल्या प्रीतीचा....
तोच खरा साक्षीदार आज....
@*मंथन*

कोजागिरीचा चंद्र मला...
रात्र भर जागवतो...
त्याच्या प्रतिबिंबात मला....
तुझेच रूप दाखवतो...
@*मंथन*

कोजागीरचा चंद्र अन तुझ रूप
जणू मज एकच भासत
अन उकळत्या दुधामध्ये
तुझच प्रतिबिंब दाटत
//दाशु// 10:54 am 11/10/2011

कोजागिरीचा चंद्र सगळे
दुधात पाहतात...
मला नाही जमत ते..
तुला मी बस
माझ्यात पाहतो....
*संजय**...

कोजागिरीचा चंद्र आपले
रूप खुलवतो,
तुझ्या सोबत मी माझे
आयुष्य फुलवतो,
@ सुरेश....

कोजागिरीचा चंद्र जणू तुझाच एक भास....
आजची हि रात्र सजणार आहे तुझ्यासाठी खास.....
त्या चंद्राच्या छटेमधला तुझा तो सहवास.....
उगवणार आहे चंद्र जणू माझ्यासाठीच आज....
सुप्रिया.

सखे तुझी सोबत म्हणजे
रोजच चंद्र कोजागिरीचा
तुझ्या विना मात्र..माझी
नित्याचीच अमावस्या
कृष्णा

Sunday, October 9, 2011

छायाचित्र चारोळ्या: सुर्यास्त, समुद्र किनारा अन दोघी आपण..

हे बघ तुझ्या माझ्या
मैत्रीची साक्ष देत आहे
मावळता सूर्य उफळनाऱ्या लाटा
मोन पाळत असल्या तरी
भेटण्याची आस दाखवत आहे....
रणजीत...रात्री१.००)०९/१०/११

असेच राहतील का गं..
हे दिवस सुगीचे...
संध्याकाळ चा हा किनारा
अन क्षण हे सोबतीचे...
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.०८

तो बघ सुर्य....
जो चाललाय मावळतीच्या दिशेने...
तुझी माझी मैत्री आहे...
त्याच्या प्रत्येक किरणाच्या आशेने..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.१४

एक एक लाट
किनार्‍याला येऊन भिडते आहे
किनार्‍यावर बसलेल्या जोडप्यांना घेऊन
साय़ंकाळ त्यांच्या प्रेमासहित बूडते आहे
रेशु ०९ /१०/२०११ रात्री १.१९

सागरच्या लाटा कश्या...
आपल्या पावलांना स्पर्शुन जातात...
जाता जाता त्या आपल्याला...
जिवनाचे गुणधर्म सांगुन जातात..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.२१

भरति आलि कि सागराचे पाणि
हळू हळू वाढते
वाळूवरति लिहिलेल्या तुझ्या नावाला
ति सहजा सहजि खोडते
रेशु ०९ /१०/२०११ रात्री १.२२

बालपणीची हि दोस्ती...
अशीच फ़ुलत राहू दे....
संध्याकाळच्या सुर्यास्ता सोबत...
रोज बहरत राहू दे...
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.२८

तुझ्या माझ्याया मैत्रीत
मी तू हि अशीच
हरवून जाऊ
त्या करीता या
सूर्य सागराला साक्षीला ठेवू...
रणजीत...रात्री१.३६)०९/१०/११

सुर्याला बघ कसे...
सागराने टाकले गिलून...
तेव्हाच वाटतय सागराला...
आलयं पोटात मळमळून..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.४८

निळा खवळलेला समूद्र...
अन सोबत दोघी आपण...
सुर्यास्ताला निघालेला सुर्य...
या क्षणाच्या साक्षीदार दोघी आपण..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.५७

हा तर खेळ रोजचाच
चाले या दुविधा रोजच्याच
निरोप तुला देण्या आला सूर्य
दुख: ते ना सोसले त्या सागरला
त्याने हि हंबरडा फोडला.........
रणजीत.....०८/१०/११. (रात्री ०२.०६)

छायाचित्र चारोळ्या: खेळ बालपणीचा..

बालपणी खेळ तो...
खेळ भातूकली चा....
खेळता खेळता सरून जाई...
काळ तो बालपणी चा..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.३५

मी मोठा झालो की..
तुला ठेवेन खूप सुखात....
तूझ्या साठीच बांधेन माडी...
या मावळत्या सुर्याच्या प्रकाशात..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.४२

स्वप्नांच्या वाटेवर
शीतल गारवा
दोघे गुंफुनी हात
गाऊ मधुर मारवा
रेशु ०९ /१०/२०११ रात्री १.४३

आपल्या छोट्याश्या घराला...
सुर्याची असेल खिडकी...
दिवसातुन एकद तरी...
मारेल तो इकडे फ़िरकी..
©*मंथन*™.. ०९/१०/२०११ रात्रौ ०१.४६

या कातर सायंकाली
मन हेलावून जाते
थरथरत्या स्पर्शाने
तन रोमांचित होते !
रेशु ०९ /१०/२०११ रात्री १.४6

हा खेळच भुरळ
पाडे प्रत्येकाला
स्वप्ने दाखवी प्रत्येक क्षणाला
चल पुन्हा तयारी करू
स्वप्न पाहण्याला.......
रणजीत.....०८/१०/११. (रात्री १.४६)

मनाची तनाला
नेहमीच असते साथ
सांग नाही सोडणार
हाती घेतलेला हात !
रेशु ०९ /१०/२०११ रात्री १.५१

तुझी माझी साथ
अशीच राहू दे
हा तर खेळ झाला
पण आयुष्यभर असाच
हात हातात राहू दे......
रणजीत.....०८/१०/११. (रात्री १.५६)

आज या खेळात .
मला हि पहायचे आहे
कोण कसे बांधता आहेत माडी
नसेल येत तर बांधता तरी
पाहायचे आहे कोण कशी घरची वाट धरी
रणजीत.....०८/१०/११. (रात्री ०२.०६)

त्या क्षितीजाच्या अलीकडे,
तू कुठेतरी असशील !
मला दिसत नसलास तरी,
तू मात्र माझाच राहशील !!
रेशु ०९/१०/२०११ रात्री २.२०

मी तुझा तो कसा होणार
क्षितीज माझे हे
तुला कसे सापडणार
कारण मी माझाच जगणार.....
रणजीत...रात्री २.२६)०९/१०/११

कुठॆतरी ह्र्दयात इतिहास सारा आठवशील
तो आठवण्यापुरता तरी तु…
नक्कीच माझा राहशील
पण तुझी शपथ पुन्हा प्रेम करणार नाही….
रेशु ०९/१०/२०११ रात्री २.२७

तुझा इतिहास तो आज
वर्तमान आहे माझा
शपथा त्या का घ्यायच्या
असे प्रेम ना पचेल तुला....
रणजीत...रात्री २.४०)०९/१०/११

शपथ जरी घेतली
तरी ओढ संपणार नाही
आता बस कर हा शब्दांचा तमाशा
नाहीतर माझे अश्रू थांबणार नाही
रेशु ०९/१०/२०११ रात्री २.४९

दुख: किती ते तुझ्या मना
मला हि पाहायचे
ओढ ती अशी कशी
शपथ तर तू घे पण शब्द ना
मांडलेस तर मरण ते मजला यायचे...
रणजीत...रात्री २.५३)०९/१०/११

शपथा जरी खोट्या झाल्या
तरी मरण येणार नाही
केलेल्या पापाची शिक्षा दिल्याशिवाय
वरती देवही घेणार नाही
रेशु ०९/१०/२०११ रात्री ३.००

पापी मी का तू
हे न उमजेल देवाला
हा तर शब्द खेळ
यात हि तू स्वर्गा नरका सकट
देवाला हि आणले भागीदारीला
रणजीत...रात्री ०३.०३.)०९/१०/११

शब्द नाही आहेत हे सगळे
पाप पुण्याचा होऊ दे सरळ सामना
देव देव्हाऱ्यात राहतो
दुनियेची त्यास काय कल्पना
रेशु ०९/१०/२०११ रात्री ३.१५

तुझे हे असले शब्दच
जगणार्याला हि कायमचे झोपवतील
एक काय पण सारेच देव
न्याय निवडा करयाला
तुझ्या माझ्या समोर येतील.........
रणजीत...रात्री ०३.२६)०९/१०/११

फक्त शब्दच तर
माझ अस्तित्व आहे
त्यासाठी सगळ्यांचा जीव घेईन मी
मग करू दे देवाला काय तो न्याय निवडा
रेशु ०९/१०/२०११ रात्री ३.४२

तुझ्या शब्दानेच मारले
माझ्या या भोळ्या हृदयाला
लाखो वार करुनी
आणकीन जीव घेनाची धमकी हि खूप देतेस
देवाला हि वेटीस धरतेस.......
रणजीत...रात्री ०३.४६)०९/१०/११

छायाचित्र चारोळ्या: मावळता सुर्य.. अन समुद्र किनारा

क्षितिजा पलीकडे तिथे,
कुणीतरी निघून जात होत...
हातातला हात सोडून,
एकटक नजर सोबत घेऊन......
वाईट....नाही नाही!
... वाटतंय ते रिकामपण.....
पोकळी भरून निघण महत्वाच.......
तिथे आठवण पण त्याचीच...
आणि आठवणीत पण तोच......
त्याची जागा कुणी भरून काढेल का???????
कदाचित अशेच विचार येत असावेत सागराच्या मनात....
सूर्यासाठी...सायंकाळी.....
रेशु ०९/१०/२०११ रात्री २.००

तुला मी कसे सोडून जाऊ
क्षितीज ना माझे इतके मोठे
कि तुला सोडून जारे
पण तू नजरे बरोबर शब्दाने हि वार करशी
जसे काळजात कट्यार खुपसशी.....
रणजीत...रात्री २.५६)०९/१०/११

हे ते पहा सूर्य उगवतो आहे
कदाचित त्याला हि घाई झाली असावी
शब्दांचा खेळ हा पाहणायची
आम्ही थकलो नसून
जागेच आहोत तुझ्यासाठी
हे सांगायचे आहे मला हि
०९/१०/११. (पहाटे ६.२६)

Monday, October 3, 2011

छायाचित्र चारोळ्या : कागदाची होडी.

कागदाच्या होडीला..
कळते का हो वाऱ्याची भाषा...
ना वल्हव ना काही तरी...
वाऱ्याच्या भरोश्यावर धरते आपली दिशा..
@*मंथन*

आपल्या प्रेमाची नाव देखील,
मी अशीच पाण्यात सोडलेली ,
का कुणास ठाऊक,
खळाळत्या पाण्यात देखील ती अर्ध्यावरती राहिलेली..
- सोंगाड्या ...

पाण्यात सोडलेली ती प्रेमाची नाव...
त्याला नाही सापडला किनाऱ्याचा ठाव....
पूर आला अन बुडून गेला सारा गाव....
दोष कुणाला देऊ झाला हृदयालाच घाव....
सुप्रिया.

कागदाच्या होडी साठी....
पावसाची आतुरतेने वाट पहायची ..
आणि पाउस सुरु झाला कि...
तुझ्या माझ्या होडींची शर्यत रंगायची...
@*मंथन*

तुझ्या माझ्या होडींच्या शर्यतीत,
मीच बाजी मारायचो ..
पण, तुझ्याचसाठी म्हणून,
मीच मुद्दामहून हरायचो ...!
- सोंगाड्या ..

आठवतंय का होड्यांच्या शर्यतीत
नेहमी मीच बाजी मारायची
तुझी अजून सवय नाही गेली
हारून हि उगाच नडायची...
*कृष्णा**

त्या होडीच्या शर्यतीत,
हरण्यातदेखील माझा एक स्वार्थ होता..
तुझ्या माझ्या मैत्रीचा,
गूढ असा अर्थ होता ..!
- सोंगाड्या ..

फाटली ती कागदाची होडी...
झालो आता आपण मोठे...
बालपणाची साथ आपली...
मोठे होता होता जडले हे प्रेमाचे नाते..
@*मंथन*

होडी ती कागदाची,
कधी तरी बुडणारच होती,
अन बुडण्या आधीच,
आपल्या मनात अंकूरली होती प्रीती..
*आशु**

फाटून गेली ती कागदाची होडी......
ना राहिले अपुले प्रेम ना ती गोडी......
खेळ-खेळूनी तो राहिला अर्द्यावरी......
अजून वाट पाहत बसले तुझी त्याच किनाऱ्यावरी........
सुप्रिया.

कागदाच्या होडीत बसून.....
आपण सागर विहार करायचो...
मध्येच जाऊन बुडाली कि...
मुळू मुळू रडायचो....
@*मंथन*

आठवतंय तुला आपण असच सागर विहार करताना......
अचानक भरती आली त्या शांत सागराला......
पोहता तुला हि येत नव्हते न मला.......
तोल माझा गेला पाण्यात मग
तुही सरसावलास मला वाचवायला......
सुप्रिया.

Friday, September 30, 2011

छायाचित्र चारोळ्या..- उमलणारे गुलाब..

उमलतोय मी..
या जगाला फ़ुलविण्या साठी..
पाकळी पाकळीत भरलाय...
गुलकंद तुमच्या साठी..
©*मंथन*™..

कळी उमलतेय फुल होण्यासाठी
फुल सजतंय हार होण्यासाठी
हार बनतोय.....देवाच्या पायी
श्रद्धेने विलीन होण्यासाठी...
*कृष्णा**

पाकळी माझी मऊ मऊ...
केसात तुझ्या शोभेल का...?
क्षणभरासाठी स्पर्श तुझा...
माझ्या पाकळ्यांना लाभेल का..?
@*मंथन*™..

छायाचित्र: सोंगाडया - श्री

Thursday, September 15, 2011

पारिजातक

रातराणी होऊन मी..
फुलते रात्र भर..
सूर्य देवाच्या स्वागताला...
पहाटे पसरते अंगणभर..
@ *मंथन*

सखे तुझ्याचसाठी पारिजातकाने हा सडा टाकीला .
तुझ्या कोमल शरीराला इजा होऊ नये म्हणून..
पहाटे पहाटे तुझ्या स्पर्शाने ..
त्याला पुन्हा नव्या उमेदीने फुलता यावे म्हणून..
@* मंथन*

सखे तुझ्याचसाठी,
पारिजातकाने हा सडा टाकीला॥
तू आली अन त्याचा सुगंधहि,
तुझ्याच साठी वाहिला ॥
- सोंगाड्या


सखे तू येणार म्हणून आहेस म्हणून
बघ हा पारिजातक किती बहरला
पहाटे तुझ्या स्वागतासाठी अंगणात
सुगन्ध फक्त तुझ्यासाठीच दरवळला...
*कृष्णा*


पारिजातकाचा सडा हा सखे ..
पाउल ठेव जपून जरा..
टोचेल ग फुल ...
तुझ्या कोमल पायाला..
@* मंथन*


मी असं इथे वाट बघत उभा....
जणू स्तब्ध ह्या डोंगर कडा
जपून टाक नाजूक पाऊल सखे...
इथे पारिजातकाने टाकलाय सडा...
*कृष्णा*