Wednesday, October 5, 2011

रेश्मा च्या चारोळ्या...

तू आणि मी
मी आणि तू
आता काही वेगळे नाही
एकाच धाग्याने गुंफल्यावर
रेशु

तुला भेटणार आहे
तुझे दुख ऐकणार आहे
इतकं विशाल हृदय आहे माझ
समुद्र सुद्धा त्यावेळी गोठणार आहे
रेशु

मलाही आता एकदातरी
तुला पुन्हा भेटायच आहे
माझ चुकलेल गणित नव्यानं
तुझ्यासामार मांडायचं आहे
रेशु

तू फक्त साथ दे
असा तू म्हणत होतास
पण मी सोबत असताना
तू कुठ गडप होतास
रेशु

0 comments:

Post a Comment