Showing posts with label मंजुषा. Show all posts
Showing posts with label मंजुषा. Show all posts

Saturday, March 3, 2012

फेसबुक खोड्या

कुछ हटके ...
मित्रांनो मजेत घ्या बर ..नाहीतर म्हणाल म्हतारीलाच लागलाय चळ..

जुनीच पोस्ट आहे पण पुन्हा ताजी करू यात ..तरुण मित्रांसाठी ...एन्जॉय ...

फेसबुक खोड्या
.
1)ऑनलाईन च्याटवर जोपर्यंत ..
चेहरा तुझा दिसतो ..
ल्यापटोपचा स्क्रीन माझा .
तोपर्यंत चालूच असतो .
मंजुषा .

2)डोळ्याच्या कोनातून ..
हळूच तुला बघते ..
तुही बघत असशील म्हणून ..
पटकन डोळे मिटते ..
मंजुषा

3)तुझ्या वालवरचे स्टेटस ..
वाचून मी घेते ..
त्यावर कॉमेंट म्हणून ..
मी माझे स्टेटस टाकते ..
मंजुषा

4)वालवर तुझ्या सारखी ..
चकरा मारते ..
तुलाच भेटल्याचे समाधान ..
मानून घेते ..
मंजुषा

5)गुप्तहेरासारखी बारीक नजर ..
साऱ्यांवर ठेवते ..
चुकतंय कोणी दिसलं ..
तर कान पीरगळते ..
मंजुषा

6)कधी चारोळ्या ,कधी कविता ..
कधी प्रबोधन ,कधी आत्मचिंतन ..
फेसबुकच्या या विश्वात ..
मुक्तपणे करते भ्रमण ..
मंजुषा
१० /११ /११

Tuesday, October 18, 2011

छायाचित्र चारोळ्या: राघू आणि मैना...

फांदीवर बसलेत
जोडीने राघू आणि मैना
आय लव म्हणता
राघूची उडाली दैना
कृष्णा

कान कर ना इकडे ..
हळूच तुला विचारते ..
खर खर सांग ..
मी तुला किती बर आवडते ..
मंजुषा

किती आवडतेस तू मला
हे कस सांगू तरी तुला....
तुझा विश्वास नाही बसणार
तुझ्यासाठी सोन्याच घरट बांधणार
कृष्णा

इटुकल्या फांदीवर....
पिटुकली माझी मैना....
चिमुकल्या नजरेने पाहता....
मज आता काहीच सुचेना........
सुप्रिया.

आणलेय तुला माझे मैना...
मिरची हिरवी गार ...
दूर जाता तुझ्या पासून..
आठवण येते फार...
@*मंथन*

तुझ्या आठवणीत ग मैने रात्र-रात्र जागाव लागत...
किती छान आहे ग असच तुझ माझ्या जवळ असण....
तू अशी खेटून बसलीस कि......
मग जग हि सुंदर दिसायला लागत.....
सुप्रिया.

रात्र तर आठवण तुझी.
घुमतेय माझ्या मनात ग...
मैत्रीच्या या वाटेवरती...
ना जाने काय मनात ग...
@*मंथन*

देवा नि बनवली आपली जोडी
पण दुनिया वाले काढतात आपली खोडी
स्वतहाच्या स्वार्ता साठी आपले नाते तोडी
तुझी मला आणि माझी तुला लागली आहे गोडी
पण माणसाना कधी समजणार नाही आपली प्रेमाची जोडी
*विपुल*

ईश्य...आमच्या दोघांचे ..
चाललंय गुटूर गु ..
नजर फिरवा ना तिकडे ..
नका असे पाहू ...
मंजुषा

मैना...ए ऐक ना, मला ना आज तुला
काही तरी सांगायचे आहे
मला ना काही तरी होत आहे ..
राघू...सांग ना काय होत आहे ते...
मैना...अरे मला ना तुला काही तरी सांगायचे आहे
राघू...सांग ना ग काय आहे ते
मैना - काही नाही रे i love यौ...
*प्रेम*

जीवनाच्या या प्रवाहात
घट्ट साथ तुझी माझी
किती आली वादळे तरी
त्यात सोबत तुझी माझी..
कृष्णा

भेट वेळ रोजची ठरलेली...
तरी अजून काय ठरणार आहे..
बोलायचं पटकन प वेडं मन
त्याचाही म्य्हुर्ता पाहणार आहे...
{{ अर्पिता..}}

आपल्या दोघांच गुपित
आपल्यातच ठेवायचं...
:
:
रोज सांजच्या
वेळी इथच भेटायचं
:- सुरेश..

Saturday, October 15, 2011

छायाचित्र चारोळ्या: चिमणी अन तिचे पिल्लू


चिमणे झुंज तुझी माझी
अशीच चालू राहणार
तू उडून गेल्यावर मग हा
चिमणा कोणाशी भांडणार?
कृष्णा

किती जतन केले आहे......
तुझे माझे नाते जपायला.......
तुझा माझा सहवास हवा....
आपले घरटे रचायला.....
हि मजा काय वेगळीच आहे....
तुझ्या चोचीतून दाणे टिपायला.....
सुप्रिया.

तुझ्या माझ्या नात्यात
एक मजाच आहे निराळी
एक घास तू आणावा
अन मी तो अलगद टिपावा
कृष्णा

असंच राहू दे नाते अपुले...
त्या नात्यात सदैव प्रेम वसुदे.....
येवोत मग हजारो वादळे.....
त्या वादळात फक्त साथ तुझी असूदे......
सुप्रिया.

जात आहे दुर तुला सोडुन
विसरू नकोस मला
मी आहे तुझा,परत
एक दा मागे वळुन पाहतो
तुला मी च तुझा मीच तुझा.
*विपुल*

प्रेमानेच विणलंय नात आपलं
त्याला आहे दोघांनीही जपलं
किती आली अन गेली वादळ
तरी प्रेमानच त्याला आहे पेललं
कृष्णा

आईचे पिल्लाशी असेच असते अवीट नाते ..
वणवण फिरून पिल्लासाठी आणते शिते ..
स्वत: उपाशी राहते आणि पिल्लाला भरवते ..
वर्षानुवर्षे आपल्या आईनेही हेच केलेले असते ..
मंजुषा

घास आणते पिलांसाठी ...
अशी कशी वेडी हि आई ...
चोची मध्ये सामावलेले...
जगातील सुख दिसून येई..
@*मंथन*'

किती दुरून तिने पिलासाठी
एक घास आहे आणला
भरवता भरवता तिचा
जीव आहे टांगणीला लागला
कृष्णा

चोचीमध्ये घास बाळा...
आहे तुझ्यासाठी....
फिरून आली रानोमाळ बाळा...
वेडी हि माय तुझ्यासाठी...
@*मंथन*'

जड अंतःकरणाने आई ..
आज तुझा निरोप घेतो ..
माझ्यासाठी तू पाहिलेली स्वप्ने ..
पुरी करूनच येतो ..
मंजुषा

तुझ्यासाठीच आणलाय
घास फिरून रानोमाळ
बघ किती लोटला हा काळ
आता लवकर मोठा हो बाळ
कृष्णा

देणारे देत जातील
खाणारे खूप खातील
असेच घास भरवले
आम्ही राजकारण्यांना
काही काळ सरल्यानंतर
लाथ मारतात जनतेला
हे पाखरू हि असेच करेल
एक दिवस आईला सोडून पळेल.......
रणजीत....दुपारी २.३६ १५/१०/११

सदैव धडपडते पिल्लांसाठी हि आई....
उन-पाऊस-वारा ह्याची तिला तमा नाही....
अजाण असतात ती पिल्ले सारी.....
पंख फुटता भुर्रकन उडून जाई.......
सुप्रिया.

एक-एक धागा शोधून घरटे त्यांनी रचले.....
मायेच्या प्रेमाने होते हो विणले.....
उन-पाऊस-वारयातही त्यांनी ते जपले....
त्या पक्षांचे घरटे हळूच हो मी टिपले....
सुप्रिया.

पिल्लांसाठी सहन करते उन-पाऊस-वारा...
धडपडून आणते त्यांच्यासाठी चारा...
करीत नाही कधी अपेक्षा फार....
मोठा झाल्यावर हा ना करेल थारा....
कृष्णा.

Tuesday, October 11, 2011

एकटी

नाही येणार परत कितीही बोलावलेस तरी ..
त्रास होतोय न तुला मी दिसले जरी ..
जाते निघून आता तुझ्या आयुष्यातून .
सुखी रहा तू मला वजा करून ..
नाही सहन होत मला तुझ हे वागण ...
सारखी उपेक्षा करणं आणि टोचून बोलण...
राहीन मी एकटीच तुझ्याशिवाय ..
तुही शिक राहायला माझ्याशिवाय ..
कायम तुझीच ,
मंजुषा १०/१०/२०११

Friday, October 7, 2011

उपरी .

कवितेच्या शाळेत प्रवेश घेतला .
किती म्हणून सांगू आनंद झाला ..
नवीन कवींशी ओळख होणार .
शब्दांची प्रचंड भूक आता भागणार ..
अरेरे पण हे काय झाले .
माहोल बघून इथला मी निराश झाले .
ठराविक टाळकीच एकत्र येतात ..
एकमेकांशी झिम्मा फुगडी घालतात ..
तू किती छान ..मी किती छान एव्हडेच करतात ..
नवीन लोकांकडे दुर्लक्ष करतात ..
कितीही मेहनत केली तरी उपरेच ठरतो ..
गंभीर आरोपांना सामोरे जातो ..
कधी कधी वाटते दूर जावे .
शाळेतून नाव आपले काढून घ्यावे ..
नाही ना पण असे करता येत ..
कारण माझ एक माणूस इथेच राहत ..
शब्दांचा त्याच्या मला लागला आहे ध्यास ..
बनले आहेत ते माझा श्वास ..
उपरी जरी ठरले तरी येतच जाईन..
शब्दांना त्याच्या वेचतच जाईन ..
मंजुषा २२ /९ /२०११ .

Wednesday, October 5, 2011

छायाचित्र चारोळ्या - तेवणारा दिवा...


दिव्यात पेटणारी वाट...
दिव्याच्या प्रेमात तेवते...
दिवा पण तिच्या साठी...
अंधारात राहून झुलतो...
©*मंथन*™..
 
तुझ्या प्रेमा खातर
तर हे सारे घडते
तुझ्यासाठीच मन
माझे असे एकटेच तेवते
रणजीत
 
पाहून  दिव्यातली तेजोमय वात, 
कविता फुलली मनात,  
होऊ दे प्रकाशमय आसमंत सारा, 
येणार्य दीपावलीच्या शुभेचा देउया जरा" 
*गीतांजली*  
 
अंधाराच्या रातीला...
चल भेदून टाकू....
ज्योती सोबत दिवा...
आण्याबान्या लागला टाकू...
©*मंथन*™
 
मी दिवा ...तू ज्योती...
तू प्रकाश तर मी वाती
उजळू दे आसमंतात
आपली प्रेमाची नाती....
कृष्णा
 
फक्त तुझ्यासाठी तेवत होती ..
डोळ्यात निरांजने आणि ज्योती..
तूच गेला सोडून मग ..
कोणासाठी लावू त्यात वाती..
मंजुषा ..
 
अंधार फार झाला
दिवा जपून ठेवा
असतील हृदयी, पनत्या जरी खुप
दिवाळी येतेय, आपणास शेभेछा खुप खुप..
*दाशु**
 
अंधारया राती उजेड
असू दया हाती
या देशात जगण्या- मारण्याची
केली आहे आम्हीच आमची गोती.....
रणजीत
 
अंधकारमय जगात माझ्या
तू प्रेमाचा दिवा बनून आलीस
प्रकाशून गेलाय असमत सारा
उजळवून निघाल्यात चारी दिशा
कृष्णा **
 
अंधकारमय जीवन तूच उजळ्शील
असतील नसतील ती तेज
माझ्या झोळीत घालशील
आई भवानी आशीर्वाद दे
तुझ्या लेकराला यशस्वी तूच करशील
रणजीत
 
हा अंधार तो काय अंधार
तू जवळ नसल्यामुळे आजन्म अंधार
उजळवून जातील चारी दिशा
जेंव्हा तू माझ्या आयष्यात येशील
रणजीत..
 
गेल्या स्मृतीच्या अंधारात
दिप प्रज्वलित केलाय मी
कुठूनशी तुझी झुळूक
आयुष्यात जपून ठेवलीय मी
रेशु
 
एक तूच होतीस...
मला प्रकाश देणारी....
नाहीतर या दुनियेत ...
अंधारच होता माझ्या...
*संजय**..
 
अंधारया राती, 
जळतात आठवणीच्या या वाती. 
उजळली सारी दुनिया, 
पण विरहाचा अंधारच राहिला कायम माझ्या माथी...
*कृष्णा*

वात बनून तुझ्यासाठी सतत तेवत राहणारी.....
तुला प्रकाश मिळावा म्हणून सदैव जळत राहणारी....
त्याच प्रकाशातून मार्ग काढून निघून गेलास....
सांग ना माझी काय चूक होती..
कि वात विझण्याआधीच तू मला सोडून गेलास....
सुप्रिया.
 
 दिव्यातली वात.....
आहे तुझीच साथ.....
तेवत राहा अशीच माझ्या अंगणात....
अंधाऱ्या रात्री करू नकोस हा कधी घात.....
सुप्रिया.
 
तू जळत असतेस..
तेव्हा मी पण वितळत असतो...
अजाणते पणी आपण...
मेणबत्तीचे गुणधर्म पाळत असतो...
@*मंथन*
 
तू दु:खा मध्ये जळत होतास....
मी विरहामध्ये तळमळत होते...
मी तर होऊन मेणबत्ती...
स्वत: चेच अस्तित्व संपवत होते....
सुप्रिया.
 
 

मंजुषा ताई च्या चारोळ्या.

आत्मिक नात्यांचे मोल ..
सामान्यांना काय कळणार ..
दूर झाले असले तरी ..
अखेर एकमेकांनाच मिळणार ...
मंजुषा

एकनिष्ठ आहे तुझी सखी ..
कधीच नाही चळणार...
वचने तुला दिलेली ..
नेहमीच पाळणार..
मंजुषा

रोखून माझ्याकडे असे ...
काय रे बघतोस ...
कि नजरेनेच नुसते ..
पिवून टाकतोस ...
मंजुषा

तुला काय वाटल ..
तुझ्या जाण्याने जग माझ संपल .
तुझ्याशिवायही राहाण .
मी केव्हाच शिकलं..
मंजुषा

खूप मोठी चूक केलीस ..
मला सोडून जाण्याची ..
वाटच बंद करून टाकलीय ..
मी तुझ्या परतीची ..
मंजुषा

तूच तर होतास ..
माझ्या कवितेची प्रेरणा ..
तुझ्या पश्चात शोधावा लागतो ..
नित्य नवा बहाणा ..
मंजुषा

आहेस का रे तुही सुखी ..
माझ्यापासून दूर जावून ..
माणसांच्या या अफाट गर्दीत ..
मला एकटीला लोटून ..
मंजुषा

कवीनेच त्यागले ..
तर कवितेने काय करायचे ..
श्वासांना (शब्दांना ) तिच्या ..
कोठे शोधायचे ????????
मंजुषा

Monday, October 3, 2011

मृगजळ ..

मृगजळ ..
तुला काय वाटले मला कळत नाही ..
माझ्यात तू किती गुंतलाय .
काहीच उपयोग नाही कारण ..
मळवट माझा आधीच भरलाय ..
मृगजळाच्या मागे धावू नकोस ..
सुखाचा जीव दु:खात घालू नकोस..
हाती तुला काहीच नाही लागणार ..
दु:ख आणि वेदना फक्त मिळणार ..
माझ्यापासून दूरच राहा ..
योग्य जोडीदारीण शोधून सुखी व्हा ..
मंजुषा ..२ /१० /२०११

Saturday, September 24, 2011

स्वप्नभंग ..


स्वप्नभंग ..
स्वप्नाच्या दुनियेत ..
सुंदर चित्र रेखाटल ..
चंचल मनाचे वारू ..
जोरात सुसाटल ..
मदनाने मला..
भलतंच पिसाटल ..
प्रीतीने तुझ्या ..
पूरत झपाटल ..
अचानक ....कोपऱ्यावरच कुत्र ..
जोरात केकाटल ..
दचकून जोरात जागी झाले ..
डोळे माझे खाडकन उघडले ..
स्वप्नांना माझ्या..
मी जाळून टाकले ..
नाव तुझे रे त्यातून ..
मीही गाळून टाकले ..
प्रीतीच्या माझी ..
झाली राखरांगोळी ..
अळी......मिळी.....गुपचिळी ..
मंजुषा . २३ / ९ /२०११

Tuesday, September 20, 2011

मुक्त चिंतन

मुक्त चिंतन
काय झाले आहे मला ..
काहीच कळत नाही ..
काय शोधत आहे ..
काहीच सुचत नाही ..
एकांताची मला भीती वाटते ..
विचारांचे मोहोळ दाटून येते .
कळा आतल्या जीवाच्या ..
कोणाला सांगणार .
सांगितल्या तरी त्या ..
इतरांना काय समजणार ..
त्या मोहक शब्दांना टाळायचे किती ठरवते .
पण हि चुकार नजर पुन्हा तिकडेच वळते ..
चंचल मनाला या कसे आवरू ..
माझेच मला मी कसे सावरू ...
वेड्यासारखी माणसांच्या गर्दीत फिरत असते ..
स्वताच स्वताला शोधत असते .
उपाय काहीच सुचत नाही ..
कोंडी काही सुटत नाही .
मंजुषा २० /९ /२०११

Thursday, September 15, 2011

मृगजळ

मृगजळ
तुला काय वाटले ..
मला कळत नव्हते ..
तुझे भ्रमरासारखे धावणे .
अन मला मुद्दाम जळवणे..
किती प्रेम करतोस माझ्यावर .
सांगायची आवश्यकता नाही ...
म्हणून तर तुझा तिरस्कारही ..
मनावर कधी घेतला नाही .
काय देवू तुला बदल्यात ..
माझ्याकडे माझे काहीच नाही ..
मृगजळाच्या मागे धावू नकोस .
सुखाचा जीव दुखात घालू नको ..
फसवणे मला कधीच जमले नाही ..
म्हणून तर तुला जवळ येवू दिले नाही ..
विसरून जा मला कायमची .
एव्हडीच तुला विनंती कळकळीची ..
मंजुषा . १५ /९ /२०११

तू

तू
माझ्या ध्यासात तू ..
माझ्या शब्दात तू ..
माझ्या श्वासात तू ..
माझ्या डोळ्यात तू ..
... तू आणि फक्त तूच ..
माझ्या कल्पनेच्या साम्राज्याताला ..
अनभिषिक्त सम्राट आहेस तू ...
रंग तरी कुठे आहे आपला वेगळा ..
मी तुझी खुळी आणि तू माझा खुळा..
मंजुषा १५ /९ /२०११