Saturday, October 15, 2011

छायाचित्र चारोळ्या: चिमणी अन तिचे पिल्लू


चिमणे झुंज तुझी माझी
अशीच चालू राहणार
तू उडून गेल्यावर मग हा
चिमणा कोणाशी भांडणार?
कृष्णा

किती जतन केले आहे......
तुझे माझे नाते जपायला.......
तुझा माझा सहवास हवा....
आपले घरटे रचायला.....
हि मजा काय वेगळीच आहे....
तुझ्या चोचीतून दाणे टिपायला.....
सुप्रिया.

तुझ्या माझ्या नात्यात
एक मजाच आहे निराळी
एक घास तू आणावा
अन मी तो अलगद टिपावा
कृष्णा

असंच राहू दे नाते अपुले...
त्या नात्यात सदैव प्रेम वसुदे.....
येवोत मग हजारो वादळे.....
त्या वादळात फक्त साथ तुझी असूदे......
सुप्रिया.

जात आहे दुर तुला सोडुन
विसरू नकोस मला
मी आहे तुझा,परत
एक दा मागे वळुन पाहतो
तुला मी च तुझा मीच तुझा.
*विपुल*

प्रेमानेच विणलंय नात आपलं
त्याला आहे दोघांनीही जपलं
किती आली अन गेली वादळ
तरी प्रेमानच त्याला आहे पेललं
कृष्णा

आईचे पिल्लाशी असेच असते अवीट नाते ..
वणवण फिरून पिल्लासाठी आणते शिते ..
स्वत: उपाशी राहते आणि पिल्लाला भरवते ..
वर्षानुवर्षे आपल्या आईनेही हेच केलेले असते ..
मंजुषा

घास आणते पिलांसाठी ...
अशी कशी वेडी हि आई ...
चोची मध्ये सामावलेले...
जगातील सुख दिसून येई..
@*मंथन*'

किती दुरून तिने पिलासाठी
एक घास आहे आणला
भरवता भरवता तिचा
जीव आहे टांगणीला लागला
कृष्णा

चोचीमध्ये घास बाळा...
आहे तुझ्यासाठी....
फिरून आली रानोमाळ बाळा...
वेडी हि माय तुझ्यासाठी...
@*मंथन*'

जड अंतःकरणाने आई ..
आज तुझा निरोप घेतो ..
माझ्यासाठी तू पाहिलेली स्वप्ने ..
पुरी करूनच येतो ..
मंजुषा

तुझ्यासाठीच आणलाय
घास फिरून रानोमाळ
बघ किती लोटला हा काळ
आता लवकर मोठा हो बाळ
कृष्णा

देणारे देत जातील
खाणारे खूप खातील
असेच घास भरवले
आम्ही राजकारण्यांना
काही काळ सरल्यानंतर
लाथ मारतात जनतेला
हे पाखरू हि असेच करेल
एक दिवस आईला सोडून पळेल.......
रणजीत....दुपारी २.३६ १५/१०/११

सदैव धडपडते पिल्लांसाठी हि आई....
उन-पाऊस-वारा ह्याची तिला तमा नाही....
अजाण असतात ती पिल्ले सारी.....
पंख फुटता भुर्रकन उडून जाई.......
सुप्रिया.

एक-एक धागा शोधून घरटे त्यांनी रचले.....
मायेच्या प्रेमाने होते हो विणले.....
उन-पाऊस-वारयातही त्यांनी ते जपले....
त्या पक्षांचे घरटे हळूच हो मी टिपले....
सुप्रिया.

पिल्लांसाठी सहन करते उन-पाऊस-वारा...
धडपडून आणते त्यांच्यासाठी चारा...
करीत नाही कधी अपेक्षा फार....
मोठा झाल्यावर हा ना करेल थारा....
कृष्णा.

0 comments:

Post a Comment