Tuesday, October 25, 2011

"आवाज"



मित्रांनो "आवाज" या शब्दावरुन आज सर्वत्र कसा गदारोळ माजला आहे हे तुम्हाला माहीतच आहे. या शब्दाने मानवाचे कीतीतरी रुप स्पष्ट होतात. उदा. कुणाचा वरच्या पट्टीतला आवाज, कुणाचा भेकड आवाज, कुणाचा एकदम मंजूळ आवाज. पण अशाच आवाजांच्या प्रकारामुळे आपल्या या जगात काही थोर व्यक्ती ओळखळ्या जातात. मंजूळ आवाजाची स्वरसम्राद्नी "लता मंगेशकर", "रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते है" असे आपले तुम्हा आम्हा सर्वांचे आवडीचे बिग बी "अमिताभ बच्चन". पण खरच आवाज या शब्दात मला विलक्षण नवल वाटले. मी तुम्हाला शिवकालीन उगात घेऊन जातो. मावळ्यांच्या एका घोषणेने तेव्हा सर्व मर्द मराठ्य़ां मध्ये एक संचार जागायचा "जय भवानी जय शिवाजी"या आवाजाने अख्खा प्रांत दुमदुमुन जायचा, या आवाजाने शत्रुची नुसती पळताभुई व्हायची म्हणून आज आपल्याला सुजलाम सुफ़लाम असा "महाराष्ट्र" पाहायला मिळ्तोय...

कालांतराने या शब्दाने एक पकड घ्यावयास सुरवात केली. आपला देश स्वतंत्र करण्यासाठी सर्व क्रांतीकारांनी ब्रिटीशांना "भारत छोडो" चा आवाज दिला. त्यांच्या सभेला शेकडो लोग उपस्थित राहु लागले, कारण त्यांच्या आवाजात एक धमक होती, एक आग होती. त्यामुळे सर्व जनतेत एक क्रांतीची लाट उसळली. त्यांचा आवाज ब्रिटीश कालीन सत्तेलाही दाबणं अशक्य झालं.. आणि त्यामुळेच आपला देश स्वतंत्र झाला हे सर्वांना न्द्यात असेलच.........

मित्रांनो आता आपल्या घरातलेच उदाहरण घ्या ना सर्व विवाहीत पुरुषांना आपल्या पत्नीचा आवाज ऎकला नाहीतर दिवस काढता येत नाही. "अहो ऎकलयं कां..?" या आवाजातचं सर्व विवाहीत पुरुषांना पुढे काही तरी आहे हे माहीत होते. :) अहो हसु नका, हे आपण मानलं नाही तरी ते पुर्ण सत्य आहे. अहो मोबाईलचं जाळं इतकं पसरलं आहे की समोरचा आवाज ऎकून आपल्याला समजते काही तरी घोळ आहे. प्रेयशीचा आवाज मोबाईल वरुन ऎकायला प्रियकराचे कान आतुरलेले असतात अन तो आवाज ऎकला नाही तर त्याचं मन नुसतं कावरं बावरं होऊन जातं. अन फ़ोन वाजला " "हैलो जानू" हा शब्द जरी कानावर पडला ना पडला तर तो अख्खा अरबी समुद्र पोहुन तिच्यापाशी जाईल हे सगळं "स्वप्नवत" बाकी असे कुणी करणार नाही हे सांगायला नको तुम्हाला. पण त्या प्रेयशीच्या आवाजात काहीतरी जादु असेलच आणि नक्किच असेल...

आज या आवाजाला कायद्याने मर्यादा घातल्या आहेत. अहो आज मि एका रस्त्यावर एक फ़ळक वाचला. घरातील लोकांचा संभाषणाचा आवाज ५० डेसिबल, सभेचा आवाज ६० डेसिबल, वाहनांचा आवाज ३० डेसिबल, अरे हे काय आहे. कुणीतरी विचारा यांना तुम्ही तरी हे नियम पाळता का ऽ‌‍ऽऽऽ..? म्हणजे आता घरांमध्ये बायको ५० डेसिबल पेक्षा जास्त आवाजात नवरयाशी भांडली तर नवरा तीला कायद्याचे उल्लंघन केले म्हणून तुरुंगात टाकेल ..? प्रियकराला आपल्या प्रेयशीला इशारा देण्यासाठी आपल्या बाईकच्या होर्न चा आवाज ३० डेसिबल पर्यंत सेट करावा लागेल नाहीतर प्रेयशीचा बाप त्याच्या वर खटला भरेल, उगाय काहीतरी नियम काढायचे अन ते जनतेवर लादायचे, अरे शाहिरांचे शिवकालिन पोवाडे आपण कमी आवाजात ऎकले तर त्या शाहिरांचा किती अपमान होईल अन तेच आवाजाची मर्यादा न ठेवता ऎका अन पाहा अंगात कशी वीज संचारते, लता दिदींचा आवाज रात्री तारयांच्या मंद प्रकाशात आपल्या प्रेयशी सोबत ऎकला तर आजुबाजुच वातावरण कसे रोमांचक होऊन जाते.. अहो पण हे या टग्यांना कोण सांगणार कि "आवाज" या शब्दावर तुमचा राग का? कारण त्यांना गिरणी कामगारांच्या आवाजाचा, पिडित कुटुंबाच्या आवाजाचा, आणि महागाईत गुरफ़टून मरत चाललेल्या सामान्या जनतेच्या आवाजाचा त्रास त्यांच्या सहनशिळतेच्या पलिकडे गेला आहे. म्हणून त्यांनी हे चोचले चालवले आहेत पण मित्रांनो माझा एकच सल्ला आहे कुठेही अनुचीत प्रकार दिसला की आपल्या अंतर मनाचा आवाज नक्की ऎका आणि जोरात म्हणाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
!!अरे आवाज कुणाचा!!

स्पष्टीकरण:
मित्र मैत्रिणींनो आजवर कुणीही आवाजावर काही लिहिले नव्हते, पण माझ्या मित्राच्या ब्लोग व्दारे "आवाजा विषयीचे" माझे मत मी थोडक्यात मांडले आहे. याच्यातुन बोध एवढाच की कृपया आपला आवाज कसा ही असो त्याला दाबुन नका ठेऊ, खुला करा त्याला अन तो फ़क्त लोकांच्या भल्यासाठी बस्स...
!!जय हिंद जय महाराष्ट्र, जय शिवाजी!!
धन्यवाद
रुपेश सुर्वे (गोवंडी, मुंबई) १९/०१०/२०११

0 comments:

Post a Comment