Monday, October 3, 2011

रणजीत च्या चारोळ्या भाग २

फसवत नाहीत नाती
फसत असतो आपण
सवयच ती कोणालाही जवळ करण्याची
मग दूर गेल्यावर दुख:त जाण्याची...
रणजीत.......०३/०२/११३.३६am

मनातला घाव मनातच
ठेवू जपून किती
अर्थच नाही प्रेमाला जिथं
ते प्रेम कुठवर तसेच नेवू.......
रणजीत.....०३/०२/११.3am

दुन्येच्या गर्दीत एकटा मी
दुख:त सावरतो स्वत:ला स्वत: मी
फुलायचे भान न्हवतेच मुळी मला
म्हणूनच काट्यांच्या मर्जीत एकटा मी
रणजीत ०३/०२/११ २.४६am

शुभ प्रभात............
पाखरे उठली
नव्या दिशेने चालण्यास
नवे लक्ष्य गाठण्यास
हसत मुख बागडण्यास.........
आपण हि अशीच सुरवात करू........
चला उठारे सकाळ झाली..........
रणजीत..........०४.०४am

जगावे किती कोणासाठी
पळावे किती मृगजळापाठी
हे चक्र चालावे तरी किती
जगण्यासाठी प्रश्न आहेत तरी किती
पण उत्तर फक्त एकच माझ्या शरीराचा अंतच..........
रणजीत....... १६/०९/११

जगतो तर असा रोजच
हसतो हि असा रोजच
लढेन हि शेवटपर्यंत
दोष मी कोणाला का देवू
मग कोणी भेटो वा न भेटो
जगणे मी का सोडू....
रणजीत....०३/०२/११/३.२४am

दुखाचा डोंगरच इतका
कि सुख काय दिसत नाही
तरही हसतो अन हसवतो आहे
जगण्या-मरण्याची तमा आज हि नाही......
रणजीत...०३/०२/११ ३.२६.am

अस फक्त तुलाच का वाटत
माझा काय फायदा
म्हणून तुझे (तिचे) सुख मागतो
तू (ती) नाही म्हणून कि काय
चालताना कधी कधी रस्त्यावर एकटाच थांबतो...
रणजीत.......०३/०२/११/३.१६.am

0 comments:

Post a Comment