Showing posts with label मिलिंद. Show all posts
Showing posts with label मिलिंद. Show all posts

Friday, October 28, 2011

प्रेम करु नका कधी

प्रेम करु नका कधी,
असे सर्वजण म्हणतात गं_
पण कोणी किती काही करा,
प्रेम ते आपोआप होत गं_

त्या त्या वेळेला त्या त्या क्षणी,
बरोबर योगायोग जुळतात गं_
ते सुंदर नाजुक क्षण मग_
अविस्मरणीय होवुन जातात गं_

म्हटलयं ना कोणीतरी या आयुष्यात,
प्रत्येक जण प्रेमात पडतो ग_
कारण प्रत्येकाच्या मनात एक,
हृद्यमर्दम दडलेला असतो ग_

मिलिँद_

Wednesday, October 5, 2011

काय ग ते तुझे ठुमकने

काय ग ते तुझे ठुमकने
अन काय तो तुझा ठेका
मान मुरडत नाचतेस तेव्हा
वाटते लावण्याचा तू एक पेठा . .

जरा जपून ताल धर पोरी
असेल तुझ्यासाठी तो गरबा
पण आम्हा मुलांच्या नजरा
धरून असतात ना ग दबा . . .

पण आम्हाला हि माहितेय
तुझा साज शृंगार तो कशाला
अरे कोणाला नाही वाटत
सौंदर्याची स्तुती ऐकायला . . .
*मिलिंद**

* *सर्वांना नवरात्री आणि विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा * *