Wednesday, October 5, 2011

छायाचित्र चारोळ्या - तेवणारा दिवा...


दिव्यात पेटणारी वाट...
दिव्याच्या प्रेमात तेवते...
दिवा पण तिच्या साठी...
अंधारात राहून झुलतो...
©*मंथन*™..
 
तुझ्या प्रेमा खातर
तर हे सारे घडते
तुझ्यासाठीच मन
माझे असे एकटेच तेवते
रणजीत
 
पाहून  दिव्यातली तेजोमय वात, 
कविता फुलली मनात,  
होऊ दे प्रकाशमय आसमंत सारा, 
येणार्य दीपावलीच्या शुभेचा देउया जरा" 
*गीतांजली*  
 
अंधाराच्या रातीला...
चल भेदून टाकू....
ज्योती सोबत दिवा...
आण्याबान्या लागला टाकू...
©*मंथन*™
 
मी दिवा ...तू ज्योती...
तू प्रकाश तर मी वाती
उजळू दे आसमंतात
आपली प्रेमाची नाती....
कृष्णा
 
फक्त तुझ्यासाठी तेवत होती ..
डोळ्यात निरांजने आणि ज्योती..
तूच गेला सोडून मग ..
कोणासाठी लावू त्यात वाती..
मंजुषा ..
 
अंधार फार झाला
दिवा जपून ठेवा
असतील हृदयी, पनत्या जरी खुप
दिवाळी येतेय, आपणास शेभेछा खुप खुप..
*दाशु**
 
अंधारया राती उजेड
असू दया हाती
या देशात जगण्या- मारण्याची
केली आहे आम्हीच आमची गोती.....
रणजीत
 
अंधकारमय जगात माझ्या
तू प्रेमाचा दिवा बनून आलीस
प्रकाशून गेलाय असमत सारा
उजळवून निघाल्यात चारी दिशा
कृष्णा **
 
अंधकारमय जीवन तूच उजळ्शील
असतील नसतील ती तेज
माझ्या झोळीत घालशील
आई भवानी आशीर्वाद दे
तुझ्या लेकराला यशस्वी तूच करशील
रणजीत
 
हा अंधार तो काय अंधार
तू जवळ नसल्यामुळे आजन्म अंधार
उजळवून जातील चारी दिशा
जेंव्हा तू माझ्या आयष्यात येशील
रणजीत..
 
गेल्या स्मृतीच्या अंधारात
दिप प्रज्वलित केलाय मी
कुठूनशी तुझी झुळूक
आयुष्यात जपून ठेवलीय मी
रेशु
 
एक तूच होतीस...
मला प्रकाश देणारी....
नाहीतर या दुनियेत ...
अंधारच होता माझ्या...
*संजय**..
 
अंधारया राती, 
जळतात आठवणीच्या या वाती. 
उजळली सारी दुनिया, 
पण विरहाचा अंधारच राहिला कायम माझ्या माथी...
*कृष्णा*

वात बनून तुझ्यासाठी सतत तेवत राहणारी.....
तुला प्रकाश मिळावा म्हणून सदैव जळत राहणारी....
त्याच प्रकाशातून मार्ग काढून निघून गेलास....
सांग ना माझी काय चूक होती..
कि वात विझण्याआधीच तू मला सोडून गेलास....
सुप्रिया.
 
 दिव्यातली वात.....
आहे तुझीच साथ.....
तेवत राहा अशीच माझ्या अंगणात....
अंधाऱ्या रात्री करू नकोस हा कधी घात.....
सुप्रिया.
 
तू जळत असतेस..
तेव्हा मी पण वितळत असतो...
अजाणते पणी आपण...
मेणबत्तीचे गुणधर्म पाळत असतो...
@*मंथन*
 
तू दु:खा मध्ये जळत होतास....
मी विरहामध्ये तळमळत होते...
मी तर होऊन मेणबत्ती...
स्वत: चेच अस्तित्व संपवत होते....
सुप्रिया.
 
 

0 comments:

Post a Comment