Friday, September 30, 2011

तुझ्यावर कविता करता करता

तुझ्यावर कविता करता करता
डोळा कधी लागलं मला
समजलेच नाही...
स्वप्न पाहता पाहता तू..
तू वास्तवात कधी आलीस ते
मला समजलेच नाही...
पण वास्तव हे पण कधी कधी स्वप्न असते...
हे मला आजच समजले तुझ्यामुळे ......
* संजय**

मी बोलत होतो

मी बोलत होतो माझ्या मनाला...
ते फक्त हसत होतं....
अधून मधून उगाचच रुसत होतं..
मलाच कळत नव्हते काय
चाललय माझ्या मनात ...
मला आवडते सावली तर
हे फिरतंय उन्हात...
मला तुझी आठवण झाली, आणि
माझं मन हसायला लागलं...
का हसतोस विचारलेस तर
तुझ्या स्वरात बोलायला लागले..

*संजय**...

छायाचित्र चारोळ्या..- उमलणारे गुलाब..

उमलतोय मी..
या जगाला फ़ुलविण्या साठी..
पाकळी पाकळीत भरलाय...
गुलकंद तुमच्या साठी..
©*मंथन*™..

कळी उमलतेय फुल होण्यासाठी
फुल सजतंय हार होण्यासाठी
हार बनतोय.....देवाच्या पायी
श्रद्धेने विलीन होण्यासाठी...
*कृष्णा**

पाकळी माझी मऊ मऊ...
केसात तुझ्या शोभेल का...?
क्षणभरासाठी स्पर्श तुझा...
माझ्या पाकळ्यांना लाभेल का..?
@*मंथन*™..

छायाचित्र: सोंगाडया - श्री

Thursday, September 29, 2011

*शेवटच्या बाकावर बसायचंय*

सातचीही शाळा माझी
पाच पासून आई हाक मारी
सहा ला होई जागी स्वारी.
अंघोळीसाठी दादा घाई करी
मी लुडबुड करता ताई मारी.
मग आईच मध्यस्थी करी
दप्तराचे तर ओझेच भारी
अभ्यास नाही केला
वाटे बसावे आज घरी
पण बाबांची ती हाक येता
पळतो मग दुध पिता पिता
सात वाजे मग निघता निघता
उशीर झाला आता पाठीत धपका
वर्गात असतो आपला धाक
वाट पाहे माझी शेवटचा बाक..
अवतरतात मग आपल्या बाई
सुरु होते मग अभ्यासाची घाई
आज नाही मला कसलीच घाई
भांडत नाहीत दादा अन ताई
करीत नाही मध्यस्थी आई
बाबांची पण ती हाक नाही
मला परत एकदा जगायचंय
शेवटच्या बाकावर बसायचंय
*कृष्णा**

Wednesday, September 28, 2011

हसरे दु:ख - व पु काळे...mp3


डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा..

सुप्रिया च्या चारोळ्या...

एकदा एक फूलपखारू हळूच माझ्या हाती बसले...
डोळे त्याचे पाणावलेले ओठ थोड़े थरथरलेले....
सहज विचारले मी त्याला तुझे काय रे गवसले???
आसवे टिपत म्हणाले.....माझे पहिलेच प्रेम फसले!!!!!!!!
सुप्रिया.

शब्द शब्द मांडत गेले
एक एक वाक्य रचत गेले
बघता बघता वेळ सरत गेली
अरे वा आता माझी पण चारोळी बनत गेली........
सुप्रिया.

नव्हताच कधी मला कवितेचा छंद...
नुसतेच होते शब्द नव्हता त्याला गंध ....
जेव्हा जुळले माझे मृगजळाशी बंध.....
शब्द रचु लागले माझे मंद मंद मंद......
सुप्रिया

आकाशी आज सप्त रंग उमटू लागले आहे.....
वाराही आज बेभान वाहू लागला आहे .....
आठवणीत तुझ्या आज उंच -उंच भरारी मारू देत मला....
आभाळ ही आज ठेंगणे वाटू लागले आहे...............
सुप्रिया.

भगतसिंग जाणून घ्या

भगतसिंग जाणून घ्या थोडा नास्तिक नसून आस्तिकच होता पण त्यांना नास्तिक बनायला लागल समाज घडवण्यासाठी, बदलण्यासाठी त्यांनी त्यावेळच्या व आजच्या पिढीला नवा आदर्श दिला आहे देशभक्तीची मशाल दिली आहे अश्या महापुरषास मनाचा मुजरा....... (रणजीत)

२३ मार्च,१९३१ रोजी भगतसिंग(सप्टेंबर २७, १९०७ - मार्च २३, १९३१) लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अनेक वीर शहीद झाले. त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे. पण त्या सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे. म्हणूनच त्यांनी ’शहीद-ए-आलम’ असा किताब दिला जातो.
भगतसिंग विचार
प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये, समजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग - नरक, जन्म -पुनर्जन्म,८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांड्वलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते
संग्रहित........
माझे बोल
मला हि भगतसिंग सारखे व्हायला आवडेल त्यांच्या विचारावंवर जगायला आवडेल आजही क्रांतीची गरज आहे. ती करण्या करिता प्रत्येकामध्ये भगतसिंग सारखे विचार पेर्याला हवे मी माझ्या परीने प्रयत्न करच आहे पण तुम्ही हि क्रांतीचे साक्षीदार व्हा! असे मला वाटते कारण क्रांती हि एकट्याने होत नसते असे हि आहे व षंड म्हणून जगण्याला काही अर्थ आहे का?
या मानलेल्या देवानी फक्त मानवाला बुद्धी दिली आहे व तशी कार्यक्षमता म्हणून अन्यथा इथल्या जनावरांनी कंटाळून पुन्हा क्रांती घडून दिली असती.......
कारण भारतातील लोकानकडून काय होणे दिसत नाही जो तो नुसता स्वार्थीपणा नाकोत्या गोष्टीकडे नाहकभर.....
आजही युवा पिढी नको तेथे जाया होताना दिसते देशभक्ती तर सोडा पण आई बाबांचा हि आदर नाही ठेवत ते अश्या क्रांतीकारांचा काय ठेवणार........
असो पण आता अति होत आहे असे नाही का वाटत आता पुन्हा गरज आहे कि नाही क्रांतीची असे नाही का वाटत
सर्वस्वी विचार तुमचा...........
रणजीत......
प्रजासत्ताक.....२८.०९.११
या लेखाचे सर्व अधिकार लेखक आणि "माझी लेखणी" यांचे आहेत...

Tuesday, September 27, 2011

डोळस प्रेम - एक कथा....

डोळस प्रेम - एक कथा....

त्याच्या आयुश्यातला सर्वात मोठा धक्का दायक क्षण नुकताच घडून गेला होता, तसा तो खुप आनंदी मुलगा पण त्याला शांत अन एकटे राहायलाच जास्त आवडायचे. पण त्या घटनेने तो खुप हेळाऊन गेला होता य आधी जे पाहीले नाही त्या सर्वाला अचानक सामोरे गेला पण काय करणार नियतिच्या मनात तेच होते..

नियतीच्या मनात अजूनही खुप काही होते, म्हणूनच तर तिची अन त्याची भेट झाली. म्हणतात ना ज्याचे दु:ख त्यालाच कळते, पण येथे दोघांची दु:खे सारखीच होती. म्हणून त्यांनी एकमेकांना साथ देण्याचे ठरवले.. एक मेकाला दु:खात साथ देता देता ते एकमेकांच्या सुखाचे हि साथी झाले. त्यांनी एकमेका समोर कधी कबूल नाही केले पण एकमेकावर खुप प्रेम करु लागले होते.

कबूल हि कसे करतील आपला हा निर्दयी समाजाने त्यांना सुखाने जगू नसते दिले... पोथि पुराणात म्हटले आहे प्रेमाला कोणतीहि सीमा मर्यादा नसते.. आणि त्या दोघांनीही समाजाच्या पाठमोरे आपल्या प्रेमाचे अंकूर उमलवू लागले.. तो थोडा लाजाळू होता या आधी मुलीशी बोलायचे म्हटले तर हनूमानाच्या पाया पडून जाणारा, मात्र तिच्या सोबत असताना तो सारं जग तिच्यातच सामावले आहे असे भासून तिच्यातच रमून जायचा, अन ती पण त्याच्या बरोबर खुप खुश असायची तो सोबत असला की सारी दु:ख विसरुन रमून जायची..

तासन तास फोन वर बोलणे, वैगरे तसे रोज ते शरीराने दुर असले तरी मनाने सतत एकमेकांसोबत असायचे. एखाद्या वेळी त्याने फोन केला नाही की ती खुप अस्वस्थ होऊन जाई.    त्यांनी एकमेकाच्या दु:खाला एकमेकाचा सहारा बनविला अन प्रत्येक दिवस नव्याने जगू लागले.. असे एक वर्ष कधी उलटून गेले त्यांना कळलेच नाही, ते एकमेकांसोबत असताना वेळेचे भानच राहायचे नाही त्यांना.

एक दिवस एक बातमी तिने त्याला सांगीतली अन त्याच्या पायाखालची जमीन निसट्ली, त्याला काय करावे कळेना. ती बातमी तिच्या लग्नाची होती नुकलेच पाहूणे तिला पाहून गेले होते. तिलाही काही सुचेना अश्या वेळी काय करावे. तो तर स्तब्ध झाला होता. तो तिला विचारणार माझ्याशी लग्न करशील..? पण त्याचे शब्द ओठीच अडले, त्याला माहीत होते या नात्याला ह निष्ठूर समाज कटू नजरेने पाहणार अन त्याच्या पेक्षा तिलाच जास्त त्रास देणारं... नियतीने त्या दोघांना काही कारणस्तव एकत्र आणले खरे पण आयुष्य भरासाठी एकमेकाची सोबत घडवून द्यायची राहून गेली. नी या प्रसंगाला एकत्र समोरे जायचे ठरवले होते या नियतीचे नियम तोडून...

काही दिवसात लग्न झाले, दोघेही आधी सारखेच आनंदी एकमेकांसोबत गप्पा गोष्टी एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होऊन प्रत्येक दिवस घालवू लागले.. फ़रक इतकाच की लग्ना नंतर ते कधीही भेटले नाहीत.. पण प्रेमा नंतर मैत्री या अशक्य वाक्याला त्यांनी शक्य करून दाखविले, ती तिच्या नवरया सोबत खुश होती. अन तीला खुश पाहून तो पण आनंदी होता..

प्रेम म्हणजे शरिराने एक होणे नाही तर, प्रेम म्हणजे मने एकरूप होणे... जर मनात ठाम विश्वास असेल मग कोणत्याही प्रसंगाला तुम्ही आनंदाने सामोरे जाऊ शकता... नाते तोडण्या पेक्षा ते जास्तीत जास्त कसे टीकवता येईल या कडे लक्ष द्या..

आंतरजाल  साभार- कवी- लेखक.. (गुपित)

या लेखाचे सर्व अधिकार हे लेखकाने माझी लेखनी  ला दिले आहेत..

रणजीत च्या चारोळ्या..


कोण सांगतो विसरुन जा..
तर कोण म्हणतो तुझे नशीब फुटके
तर कोण म्हणतो मी ट्राय करतो आता
अरे विनोद करता कि जखमेवर मिट चोळता..
रणजीत.......

या मुलीना कळणार नाही हो दुख:
ते करणार फक्त आमच हास्य.......
प्रेम करतो आम्ही नाळ तोडून
ते म्हणतील जा जग सोडून....

रणजीत २५.०९.११.

पाण्या विना मासा कसा तडफडतो
त्याला पाण्याची किंमत विचारा
प्रेम हे सर्वाना काय माहित
माझ्या सारख्या विरह सोसलेल्यानानाच विचारा
रणजीत.......

मी हि असाच आहे
दुख: मनी घेऊन जगतो आहे
पण तू सुखी राहावी
हेच सर्वाना सांगतो आहे
पण अंतर मनातून तीळतीळ तुटतो आहे...
रणजीत २५.०९.११.

तुझा विचार करते वेळी
दिस अन रात्र कधी होते
हेच उमजत नाही
तू का सोडून गेली हेच मला समजत नाही
रणजीत.२६.०९.११.

तुझे हे वेढे भ्रम तुलाच माहित
हे फेरे व संस्कृतीचे ढोंग मला कशाला
तू माझी व मी तुझा नीरनंतर
हेच मला माहित...
रणजीत २६.०९.११.

तुला पाहावे म्हणून
मेघ आले दाटून
तुला भेटावे म्हणून
बरसलो मी डोळ्यातून(आकाशातून)..
रणजीत २६.०९.११.

किनारा फक्त तू.

अथांग सागरातील
एकमेव किनारा फक्त तू..
आसमंतातील चांदण्यांचा
एकमेव चंद्र फक्त तू,

झाडाला वेढलेली
एकमेव लता फक्त तू,
पुष्पलतांवरील फुललेले
एकमेव पुष्प तू,

प्रेमासाठी मरणारा
एकमेव प्रियकर फक्त तू,
सरणावर जळणारा
एकमेव दिवा फक्त तू,

@ सुरेश पाठे पाटील

Saturday, September 24, 2011

स्वप्नभंग ..


स्वप्नभंग ..
स्वप्नाच्या दुनियेत ..
सुंदर चित्र रेखाटल ..
चंचल मनाचे वारू ..
जोरात सुसाटल ..
मदनाने मला..
भलतंच पिसाटल ..
प्रीतीने तुझ्या ..
पूरत झपाटल ..
अचानक ....कोपऱ्यावरच कुत्र ..
जोरात केकाटल ..
दचकून जोरात जागी झाले ..
डोळे माझे खाडकन उघडले ..
स्वप्नांना माझ्या..
मी जाळून टाकले ..
नाव तुझे रे त्यातून ..
मीही गाळून टाकले ..
प्रीतीच्या माझी ..
झाली राखरांगोळी ..
अळी......मिळी.....गुपचिळी ..
मंजुषा . २३ / ९ /२०११

Friday, September 23, 2011

कृष्णा च्या चारोळ्या..


तुझ्यासाठीच मी हट्ट आहे सोडला.....
स्वप्नाच काय घेतेस.....
आठवणींनी तर मला
हरवायचा चंगच आहे बांधला...

कधीच नाही मला समजल
कुणीच नाही कधी जाणाल
काय चूक अन काय बरोबर
तू हि नाहीस समजावलं ..

चार ओळीत सांगायला
मला कधीच नाही जमत
शब्दांचा खेळ तसा माझ्यासाठी नवा
तीन चा नको अडीच अक्षराचा मेळ हवा...

जर का असती हृदय दोन
जरी एक तुटल असता.....
किमान जीव तरी वाचला असता...
प्रेमात हरला तरी आधार राहिला असता ...

किती दिवसांनी आज पुन्हा एकदा
डाव होता मी मांडला
आठवणीच्या हिंदोळ्यावर
का असा तू अर्ध्यावर सोडला...

जर नसशील तू माझ्यासवे
तर कसा असेन मी माझ्यासवे
इथे तिथे नसेन..नको शोधू मला
तुझ्या स्वागता उभा असेन नभा...

असून जवळी...काय शोधिसी
वेळी अवेळी तुझी साद
थेट भिडे या काळजा....
मन मोहित करी मज पामरा ...

हूर हूर माझिया जीवाला...लावून तू अशी गेलीस...
जीवनाची गाण गायचाच मी राहिलो...
आयुष्य जगायचं कुणामुळ राहूनच गेल ..
डोळे भरून तुला एकदा पाहायचाच राहील ...

कोण चोर अन कोण शाव
इथे सगळेच करतात लपून घाव
सोन्याच्या खाणीत असे
चोरांना भलताच वाव...

भोवऱ्यासारखी माझी स्थिती
गिर गिर गिर गिर गिरकी घेती
आकाश कधी तर पाताळ कधी...
नभ ठेंगणे केले तुझ्यासाठी ..

एकच ध्यास असे जीवाला
कधी भेटेन माझ्या सखीला
जरी सखी माझी दूर देशी....
मन तिथ मला क्षणात नेशी...

**
कृष्णा*

संजय च्या ४ चारोळ्या..


भेटतील तुला कैक
पण माझ्यासारखा भेटणार नाही...
तू जाशील कदाचित माझ्यापासून दूर...
मी प्रेम करणे सोडणार नाही....*संजय**...
थोडासा विवंचनेत होतो..
पण वागणे माझे दुहेरी नव्हते ...
आत्मा हवा होता दोघांचा एक
पण मन तुझे कळत नव्हते...* संजय**...
विरह असा कठीण आहे
जीवन एक सजा आहे...
प्रेम आणि भंग सारे...
वादळात मी भरकटलो आहे...* संजय**...
तिला पाहिलेलं कधी स्वप्नात ..
आज मी तिला डोळ्यासमोर पाहिलं....
भर दिवसा एका चांदणीला
या धरतीवर मी पाहिलं...* संजय**..

Tuesday, September 20, 2011

तीन दिवसाचं सहवास तुझा


तीन दिवसाचं सहवास तुझा आजही माझ्या अवतीभवती जाणवतो.,
तुझ्याशिवाय माझा श्वासही माझ्या डोळ्यांसोबत पाणावतो.,

तू गेल्यावर जाणवू लागल, तुझ्यासोबत अजून थोड जगायचं होत.,
तुझ माझ नात तुझ्या बरोबर राहून अनुभवायचं होत.,

प्रेमाच्या शोधात कधी मी स्वतःला हरवून आले,
आणि आयुष जगायचं म्हणताना जगणंच विसरून गेले.,

इथे प्रत्येक जन आपला हक्क मिळवण्याच्या प्रयत्नात दिसतो.,
आणि सहजासहजी नाही मिळाला तर मग, हरेक जन तो हिसकावत असतो..,

स्वप्ना आणि भावनेच्या जगात प्रेमाला कधीच मरण नसत.,
आणि प्रेम केल्यावर कळत., स्वप्न आणि भावना हे सगळ फक्त म्हणण्यापुरत असत.,

मोठेपणाच्या ओझ्याखाली मी स्वतःच जगन दबलेल.,
जस बाहेरून भक्कम दिसणार शिल्प आतून पूर्ण पोखरलेल.,

आता माझ्या सगळ्या भावना माझ्यासारख्याच मेलेल्या.,
आणि तरीही एकांतात बसून मी प्रेमावर कविता केलेल्या.,
-रागिणी

मुक्त चिंतन

मुक्त चिंतन
काय झाले आहे मला ..
काहीच कळत नाही ..
काय शोधत आहे ..
काहीच सुचत नाही ..
एकांताची मला भीती वाटते ..
विचारांचे मोहोळ दाटून येते .
कळा आतल्या जीवाच्या ..
कोणाला सांगणार .
सांगितल्या तरी त्या ..
इतरांना काय समजणार ..
त्या मोहक शब्दांना टाळायचे किती ठरवते .
पण हि चुकार नजर पुन्हा तिकडेच वळते ..
चंचल मनाला या कसे आवरू ..
माझेच मला मी कसे सावरू ...
वेड्यासारखी माणसांच्या गर्दीत फिरत असते ..
स्वताच स्वताला शोधत असते .
उपाय काहीच सुचत नाही ..
कोंडी काही सुटत नाही .
मंजुषा २० /९ /२०११

Monday, September 19, 2011

राहुनी गेले बरेच मागे

राहुनी गेले बरेच मागे, जे शोषून घ्यावयाचे,
आठवणींचे कवडसे, माणसांची वल्कले, भावनांचे पुंजके,
उरले आहेत फक्त आता, वर्तमानातले निरस जगणे,
तरीही वाटते, येईल कोणीतरी आयुष्यात पुन्हा,
घेउनी जाईल मज त्या विश्वात,
स्फुरेल मज एक हर्षित काव्य, उल्हासित मी अन माझे लिहिणे,
परी सगळे नुसते कल्पनातीत, शुष्क आहे वास्तव हे,
विसरूनच गेलो मी, एक माणूस म्हणून जगावयाचे....
-प्रसाद पिंपळकर.

Saturday, September 17, 2011

खोल जागी साठणारे पाणी

खोल जागी साठणारे पाणी
कधीच वाहत नसते
तसा मी हि कधीच थांबत नाही
जेथे आपलेपनाच नसतो
तेथे थांबण्याला अर्थ तरी काय असतो....
रणजीत

Friday, September 16, 2011

मनातलं गुपित कसं सांगू तुला

मनातलं गुपित कसं सांगू तुला,
न बोलता काही कसं समजेल तुला,

मनातल्या मनात मी जेव्हा लाजतो,
निखळ हसणे जेव्हा तुझे आठवतो,

काश तुझ्या मनातील रहस्य कळावं,
फुलपाखरू बनून फक्त तुझ्याभोवती फिरावं,

तुला बघितल्यापासून चलबिचल झालीये,
माझी वृत्ती नेहमीपेक्षा अविचल झालीये,

आज मात्र तुला भेटून सर्व सांगायचंय,
मनातल सगळ उलगडून दाखवायचय,

प्रेमाचं गुपित तुला सहजच कळेल,
माझी अडखळती गाडी तेव्हाच पुढे ढळेल,

@ सुरेश पाठे पाटील

Thursday, September 15, 2011

मृगजळ

मृगजळ
तुला काय वाटले ..
मला कळत नव्हते ..
तुझे भ्रमरासारखे धावणे .
अन मला मुद्दाम जळवणे..
किती प्रेम करतोस माझ्यावर .
सांगायची आवश्यकता नाही ...
म्हणून तर तुझा तिरस्कारही ..
मनावर कधी घेतला नाही .
काय देवू तुला बदल्यात ..
माझ्याकडे माझे काहीच नाही ..
मृगजळाच्या मागे धावू नकोस .
सुखाचा जीव दुखात घालू नको ..
फसवणे मला कधीच जमले नाही ..
म्हणून तर तुला जवळ येवू दिले नाही ..
विसरून जा मला कायमची .
एव्हडीच तुला विनंती कळकळीची ..
मंजुषा . १५ /९ /२०११

प्रेम हे प्रेम असतं

प्रेम -प्रेम हे प्रेम असतं
तिथे तिरस्काराच काही काम नसतं....
जीवनाचे रंग असतं हे प्रेम...
कधी पांढरा कधी हिरवा तर
कधी गुलाबी असतं हे प्रेम....
... प्रेमानीच जिंकायचं असतं हे प्रेम...
जिंकून पण कधी कधी हरायचं
असतं हे प्रेम ...
असंच असतं हे प्रेम ....
जिथे तिरस्कारच काही काम नसतं हे प्रेम
** संजय**...

ती मला भेटली

ती मला भेटली अगदी स्वप्नवत ...
नाजूक अगदी एका पाकळीसारखी...
सहज बोलणारी ...
अगदी निर्भेळ मनाची ..
हवीहवीशी वाटावी अशीच....
कविता बोलावी असे बोलणारी ..
ती मला भेटली अगदी स्वप्नवत ...
**संजय**

तू

तू
माझ्या ध्यासात तू ..
माझ्या शब्दात तू ..
माझ्या श्वासात तू ..
माझ्या डोळ्यात तू ..
... तू आणि फक्त तूच ..
माझ्या कल्पनेच्या साम्राज्याताला ..
अनभिषिक्त सम्राट आहेस तू ...
रंग तरी कुठे आहे आपला वेगळा ..
मी तुझी खुळी आणि तू माझा खुळा..
मंजुषा १५ /९ /२०११

पारिजातक

रातराणी होऊन मी..
फुलते रात्र भर..
सूर्य देवाच्या स्वागताला...
पहाटे पसरते अंगणभर..
@ *मंथन*

सखे तुझ्याचसाठी पारिजातकाने हा सडा टाकीला .
तुझ्या कोमल शरीराला इजा होऊ नये म्हणून..
पहाटे पहाटे तुझ्या स्पर्शाने ..
त्याला पुन्हा नव्या उमेदीने फुलता यावे म्हणून..
@* मंथन*

सखे तुझ्याचसाठी,
पारिजातकाने हा सडा टाकीला॥
तू आली अन त्याचा सुगंधहि,
तुझ्याच साठी वाहिला ॥
- सोंगाड्या


सखे तू येणार म्हणून आहेस म्हणून
बघ हा पारिजातक किती बहरला
पहाटे तुझ्या स्वागतासाठी अंगणात
सुगन्ध फक्त तुझ्यासाठीच दरवळला...
*कृष्णा*


पारिजातकाचा सडा हा सखे ..
पाउल ठेव जपून जरा..
टोचेल ग फुल ...
तुझ्या कोमल पायाला..
@* मंथन*


मी असं इथे वाट बघत उभा....
जणू स्तब्ध ह्या डोंगर कडा
जपून टाक नाजूक पाऊल सखे...
इथे पारिजातकाने टाकलाय सडा...
*कृष्णा*

Monday, September 12, 2011

तुझ्या वर लिहायचे

तुझ्या वर लिहायचे..
मी मनापासून ठरवतो...
लिहायला बसलो कि...
शब्द शब्द हरवतो..
©*मंथन*