Monday, September 19, 2011

राहुनी गेले बरेच मागे

राहुनी गेले बरेच मागे, जे शोषून घ्यावयाचे,
आठवणींचे कवडसे, माणसांची वल्कले, भावनांचे पुंजके,
उरले आहेत फक्त आता, वर्तमानातले निरस जगणे,
तरीही वाटते, येईल कोणीतरी आयुष्यात पुन्हा,
घेउनी जाईल मज त्या विश्वात,
स्फुरेल मज एक हर्षित काव्य, उल्हासित मी अन माझे लिहिणे,
परी सगळे नुसते कल्पनातीत, शुष्क आहे वास्तव हे,
विसरूनच गेलो मी, एक माणूस म्हणून जगावयाचे....
-प्रसाद पिंपळकर.

1 comments:

मंथन said...

https://www.facebook.com/groups/mrugjal

Post a Comment