Friday, September 16, 2011

मनातलं गुपित कसं सांगू तुला

मनातलं गुपित कसं सांगू तुला,
न बोलता काही कसं समजेल तुला,

मनातल्या मनात मी जेव्हा लाजतो,
निखळ हसणे जेव्हा तुझे आठवतो,

काश तुझ्या मनातील रहस्य कळावं,
फुलपाखरू बनून फक्त तुझ्याभोवती फिरावं,

तुला बघितल्यापासून चलबिचल झालीये,
माझी वृत्ती नेहमीपेक्षा अविचल झालीये,

आज मात्र तुला भेटून सर्व सांगायचंय,
मनातल सगळ उलगडून दाखवायचय,

प्रेमाचं गुपित तुला सहजच कळेल,
माझी अडखळती गाडी तेव्हाच पुढे ढळेल,

@ सुरेश पाठे पाटील

0 comments:

Post a Comment