skip to main |
skip to sidebar
भगतसिंग जाणून घ्या

भगतसिंग जाणून घ्या थोडा नास्तिक नसून आस्तिकच होता पण त्यांना नास्तिक बनायला लागल समाज घडवण्यासाठी, बदलण्यासाठी त्यांनी त्यावेळच्या व आजच्या पिढीला नवा आदर्श दिला आहे देशभक्तीची मशाल दिली आहे अश्या महापुरषास मनाचा मुजरा....... (रणजीत)
२३ मार्च,१९३१ रोजी भगतसिंग(सप्टेंबर २७, १९०७ - मार्च २३, १९३१) लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अनेक वीर शहीद झाले. त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे. पण त्या सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे. म्हणूनच त्यांनी ’शहीद-ए-आलम’ असा किताब दिला जातो.
भगतसिंग विचार
प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये, समजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग - नरक, जन्म -पुनर्जन्म,८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांड्वलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते
संग्रहित........
माझे बोल
मला हि भगतसिंग सारखे व्हायला आवडेल त्यांच्या विचारावंवर जगायला आवडेल आजही क्रांतीची गरज आहे. ती करण्या करिता प्रत्येकामध्ये भगतसिंग सारखे विचार पेर्याला हवे मी माझ्या परीने प्रयत्न करच आहे पण तुम्ही हि क्रांतीचे साक्षीदार व्हा! असे मला वाटते कारण क्रांती हि एकट्याने होत नसते असे हि आहे व षंड म्हणून जगण्याला काही अर्थ आहे का?
या मानलेल्या देवानी फक्त मानवाला बुद्धी दिली आहे व तशी कार्यक्षमता म्हणून अन्यथा इथल्या जनावरांनी कंटाळून पुन्हा क्रांती घडून दिली असती.......
कारण भारतातील लोकानकडून काय होणे दिसत नाही जो तो नुसता स्वार्थीपणा नाकोत्या गोष्टीकडे नाहकभर.....
आजही युवा पिढी नको तेथे जाया होताना दिसते देशभक्ती तर सोडा पण आई बाबांचा हि आदर नाही ठेवत ते अश्या क्रांतीकारांचा काय ठेवणार........
असो पण आता अति होत आहे असे नाही का वाटत आता पुन्हा गरज आहे कि नाही क्रांतीची असे नाही का वाटत
सर्वस्वी विचार तुमचा...........
रणजीत......
प्रजासत्ताक.....२८.०९.११
या लेखाचे सर्व अधिकार लेखक आणि "माझी लेखणी" यांचे आहेत...
2 comments:
thanks for sharing
स्वातंत्र्याचा चढला पारा
भगतसिंगांचा एकच नारा
चारी दिशांना भिडला वारा
इन्कलाबचा गुंजला नारा
*कृष्णा **
Post a Comment