Tuesday, September 20, 2011

मुक्त चिंतन

मुक्त चिंतन
काय झाले आहे मला ..
काहीच कळत नाही ..
काय शोधत आहे ..
काहीच सुचत नाही ..
एकांताची मला भीती वाटते ..
विचारांचे मोहोळ दाटून येते .
कळा आतल्या जीवाच्या ..
कोणाला सांगणार .
सांगितल्या तरी त्या ..
इतरांना काय समजणार ..
त्या मोहक शब्दांना टाळायचे किती ठरवते .
पण हि चुकार नजर पुन्हा तिकडेच वळते ..
चंचल मनाला या कसे आवरू ..
माझेच मला मी कसे सावरू ...
वेड्यासारखी माणसांच्या गर्दीत फिरत असते ..
स्वताच स्वताला शोधत असते .
उपाय काहीच सुचत नाही ..
कोंडी काही सुटत नाही .
मंजुषा २० /९ /२०११

0 comments:

Post a Comment