Tuesday, September 27, 2011

रणजीत च्या चारोळ्या..


कोण सांगतो विसरुन जा..
तर कोण म्हणतो तुझे नशीब फुटके
तर कोण म्हणतो मी ट्राय करतो आता
अरे विनोद करता कि जखमेवर मिट चोळता..
रणजीत.......

या मुलीना कळणार नाही हो दुख:
ते करणार फक्त आमच हास्य.......
प्रेम करतो आम्ही नाळ तोडून
ते म्हणतील जा जग सोडून....

रणजीत २५.०९.११.

पाण्या विना मासा कसा तडफडतो
त्याला पाण्याची किंमत विचारा
प्रेम हे सर्वाना काय माहित
माझ्या सारख्या विरह सोसलेल्यानानाच विचारा
रणजीत.......

मी हि असाच आहे
दुख: मनी घेऊन जगतो आहे
पण तू सुखी राहावी
हेच सर्वाना सांगतो आहे
पण अंतर मनातून तीळतीळ तुटतो आहे...
रणजीत २५.०९.११.

तुझा विचार करते वेळी
दिस अन रात्र कधी होते
हेच उमजत नाही
तू का सोडून गेली हेच मला समजत नाही
रणजीत.२६.०९.११.

तुझे हे वेढे भ्रम तुलाच माहित
हे फेरे व संस्कृतीचे ढोंग मला कशाला
तू माझी व मी तुझा नीरनंतर
हेच मला माहित...
रणजीत २६.०९.११.

तुला पाहावे म्हणून
मेघ आले दाटून
तुला भेटावे म्हणून
बरसलो मी डोळ्यातून(आकाशातून)..
रणजीत २६.०९.११.

0 comments:

Post a Comment