Thursday, September 15, 2011

मृगजळ

मृगजळ
तुला काय वाटले ..
मला कळत नव्हते ..
तुझे भ्रमरासारखे धावणे .
अन मला मुद्दाम जळवणे..
किती प्रेम करतोस माझ्यावर .
सांगायची आवश्यकता नाही ...
म्हणून तर तुझा तिरस्कारही ..
मनावर कधी घेतला नाही .
काय देवू तुला बदल्यात ..
माझ्याकडे माझे काहीच नाही ..
मृगजळाच्या मागे धावू नकोस .
सुखाचा जीव दुखात घालू नको ..
फसवणे मला कधीच जमले नाही ..
म्हणून तर तुला जवळ येवू दिले नाही ..
विसरून जा मला कायमची .
एव्हडीच तुला विनंती कळकळीची ..
मंजुषा . १५ /९ /२०११

0 comments:

Post a Comment