Tuesday, September 27, 2011

किनारा फक्त तू.

अथांग सागरातील
एकमेव किनारा फक्त तू..
आसमंतातील चांदण्यांचा
एकमेव चंद्र फक्त तू,

झाडाला वेढलेली
एकमेव लता फक्त तू,
पुष्पलतांवरील फुललेले
एकमेव पुष्प तू,

प्रेमासाठी मरणारा
एकमेव प्रियकर फक्त तू,
सरणावर जळणारा
एकमेव दिवा फक्त तू,

@ सुरेश पाठे पाटील

0 comments:

Post a Comment