Thursday, September 29, 2011

*शेवटच्या बाकावर बसायचंय*

सातचीही शाळा माझी
पाच पासून आई हाक मारी
सहा ला होई जागी स्वारी.
अंघोळीसाठी दादा घाई करी
मी लुडबुड करता ताई मारी.
मग आईच मध्यस्थी करी
दप्तराचे तर ओझेच भारी
अभ्यास नाही केला
वाटे बसावे आज घरी
पण बाबांची ती हाक येता
पळतो मग दुध पिता पिता
सात वाजे मग निघता निघता
उशीर झाला आता पाठीत धपका
वर्गात असतो आपला धाक
वाट पाहे माझी शेवटचा बाक..
अवतरतात मग आपल्या बाई
सुरु होते मग अभ्यासाची घाई
आज नाही मला कसलीच घाई
भांडत नाहीत दादा अन ताई
करीत नाही मध्यस्थी आई
बाबांची पण ती हाक नाही
मला परत एकदा जगायचंय
शेवटच्या बाकावर बसायचंय
*कृष्णा**

0 comments:

Post a Comment