Wednesday, September 28, 2011

सुप्रिया च्या चारोळ्या...

एकदा एक फूलपखारू हळूच माझ्या हाती बसले...
डोळे त्याचे पाणावलेले ओठ थोड़े थरथरलेले....
सहज विचारले मी त्याला तुझे काय रे गवसले???
आसवे टिपत म्हणाले.....माझे पहिलेच प्रेम फसले!!!!!!!!
सुप्रिया.

शब्द शब्द मांडत गेले
एक एक वाक्य रचत गेले
बघता बघता वेळ सरत गेली
अरे वा आता माझी पण चारोळी बनत गेली........
सुप्रिया.

नव्हताच कधी मला कवितेचा छंद...
नुसतेच होते शब्द नव्हता त्याला गंध ....
जेव्हा जुळले माझे मृगजळाशी बंध.....
शब्द रचु लागले माझे मंद मंद मंद......
सुप्रिया

आकाशी आज सप्त रंग उमटू लागले आहे.....
वाराही आज बेभान वाहू लागला आहे .....
आठवणीत तुझ्या आज उंच -उंच भरारी मारू देत मला....
आभाळ ही आज ठेंगणे वाटू लागले आहे...............
सुप्रिया.

0 comments:

Post a Comment