skip to main |
skip to sidebar
तीन दिवसाचं सहवास तुझा

तीन दिवसाचं सहवास तुझा आजही माझ्या अवतीभवती जाणवतो.,
तुझ्याशिवाय माझा श्वासही माझ्या डोळ्यांसोबत पाणावतो.,
तू गेल्यावर जाणवू लागल, तुझ्यासोबत अजून थोड जगायचं होत.,
तुझ माझ नात तुझ्या बरोबर राहून अनुभवायचं होत.,
प्रेमाच्या शोधात कधी मी स्वतःला हरवून आले,
आणि आयुष जगायचं म्हणताना जगणंच विसरून गेले.,
इथे प्रत्येक जन आपला हक्क मिळवण्याच्या प्रयत्नात दिसतो.,
आणि सहजासहजी नाही मिळाला तर मग, हरेक जन तो हिसकावत असतो..,
स्वप्ना आणि भावनेच्या जगात प्रेमाला कधीच मरण नसत.,
आणि प्रेम केल्यावर कळत., स्वप्न आणि भावना हे सगळ फक्त म्हणण्यापुरत असत.,
मोठेपणाच्या ओझ्याखाली मी स्वतःच जगन दबलेल.,
जस बाहेरून भक्कम दिसणार शिल्प आतून पूर्ण पोखरलेल.,
आता माझ्या सगळ्या भावना माझ्यासारख्याच मेलेल्या.,
आणि तरीही एकांतात बसून मी प्रेमावर कविता केलेल्या.,
-रागिणी
0 comments:
Post a Comment