Friday, September 23, 2011

कृष्णा च्या चारोळ्या..


तुझ्यासाठीच मी हट्ट आहे सोडला.....
स्वप्नाच काय घेतेस.....
आठवणींनी तर मला
हरवायचा चंगच आहे बांधला...

कधीच नाही मला समजल
कुणीच नाही कधी जाणाल
काय चूक अन काय बरोबर
तू हि नाहीस समजावलं ..

चार ओळीत सांगायला
मला कधीच नाही जमत
शब्दांचा खेळ तसा माझ्यासाठी नवा
तीन चा नको अडीच अक्षराचा मेळ हवा...

जर का असती हृदय दोन
जरी एक तुटल असता.....
किमान जीव तरी वाचला असता...
प्रेमात हरला तरी आधार राहिला असता ...

किती दिवसांनी आज पुन्हा एकदा
डाव होता मी मांडला
आठवणीच्या हिंदोळ्यावर
का असा तू अर्ध्यावर सोडला...

जर नसशील तू माझ्यासवे
तर कसा असेन मी माझ्यासवे
इथे तिथे नसेन..नको शोधू मला
तुझ्या स्वागता उभा असेन नभा...

असून जवळी...काय शोधिसी
वेळी अवेळी तुझी साद
थेट भिडे या काळजा....
मन मोहित करी मज पामरा ...

हूर हूर माझिया जीवाला...लावून तू अशी गेलीस...
जीवनाची गाण गायचाच मी राहिलो...
आयुष्य जगायचं कुणामुळ राहूनच गेल ..
डोळे भरून तुला एकदा पाहायचाच राहील ...

कोण चोर अन कोण शाव
इथे सगळेच करतात लपून घाव
सोन्याच्या खाणीत असे
चोरांना भलताच वाव...

भोवऱ्यासारखी माझी स्थिती
गिर गिर गिर गिर गिरकी घेती
आकाश कधी तर पाताळ कधी...
नभ ठेंगणे केले तुझ्यासाठी ..

एकच ध्यास असे जीवाला
कधी भेटेन माझ्या सखीला
जरी सखी माझी दूर देशी....
मन तिथ मला क्षणात नेशी...

**
कृष्णा*

1 comments:

vipul said...

मी कधी च कोणा चा नवतो
पण जेव्हा तुला मी बघितले
मी माझा कधी च झालो नाही
वारा जसा फिरतो तसा फिरत राहिलो
आणि तुझी सावली शोधत राहिलो
***विपुल***

Post a Comment