Wednesday, March 28, 2012

चुडा... - कवी ग्रेस

तुला पहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळे!

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन तुला सावली...

मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू तुझे दु:ख झरते
जसे संचिताचे ऋतु कोवळे

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
दिसे कि तुझ्या बिल्वाराचा चुडा...

ग्रेस

जीव राखता राखता-कवी ग्रेस


जीव राखता राखता तुला हाताशी घेईन
झडझडीचा पाऊस डोळे भरून पाहीन
तुझे सोडवीन केस त्यांचा बांधीन आंबाडा
देहझडल्या हातांनी वर ठेवीन केवडा
तुझे मेघमोर नेसू तुला असे नेसवीन
अंग पडेल उघडे तिथे गवाक्ष बांधीन
दूध पान्ह्यात वाहत्या तुझ्या बाळांच्या स्तनांना
दृष्ट काढल्या वेळेचा मग घालीन उखाना
तुझे रूप थकलेले उभे राहता दाराशी
तुझा पदर धरून मागे येईन उपाशी
मुक्या बाहुलीचा खेळ देवघरात मांडीन
नथ डोळ्यांशी येताना निरांजनात तेवीन
तुझ्या चिमण्यांची जेव्हा घरी मळभ येईल
वळचणीचा पाऊस माझा सोयरा होईल
भाळी शिशिराची फुले अंगी मोतियांचा जोग
तुझ्या पापण्यांच्या काठी मला पहाटेची जाग
नाही दु: खाचा आडोसा नको सुखाची चाहूल
झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल
- ग्रेस

पाठीवर बाहुलीच्या-कवी ग्रेस

पाठीवर बाहुलीच्या
चांदणीचा शर
गोर्या मुलीसाठी आला
काळा घोडेस्वार …..
प्राक्तनाच्या घळीमध्ये
पावसाचे पाणी
अंधारात घोड्यालाही
ओळखले कोणी?
पुरूषाच्या पुढे आली
हिला चढे माज
चार बाया मिळूनिया
काढा हिची लाज
न्हाऊनीया केस ओले
दारामंदी आली
खुंटीवर टांगलेली
चोळी चोरी गेली
जोडव्याच्या जोडालाही
डोह घाली धाक
कुंकवाच्या करंड्यात
बाभळीची राख
पाठीमागे उभा त्याचे
दिसेल का रूप?
आरशाच्या शापानेही
आलिंगन पाप
रानझरा ओळखीचा
तहानेची बोली
कात टाकलेला साप
पाचोळ्याच्या खाली
- ग्रेस

Saturday, March 3, 2012

फेसबुक खोड्या

कुछ हटके ...
मित्रांनो मजेत घ्या बर ..नाहीतर म्हणाल म्हतारीलाच लागलाय चळ..

जुनीच पोस्ट आहे पण पुन्हा ताजी करू यात ..तरुण मित्रांसाठी ...एन्जॉय ...

फेसबुक खोड्या
.
1)ऑनलाईन च्याटवर जोपर्यंत ..
चेहरा तुझा दिसतो ..
ल्यापटोपचा स्क्रीन माझा .
तोपर्यंत चालूच असतो .
मंजुषा .

2)डोळ्याच्या कोनातून ..
हळूच तुला बघते ..
तुही बघत असशील म्हणून ..
पटकन डोळे मिटते ..
मंजुषा

3)तुझ्या वालवरचे स्टेटस ..
वाचून मी घेते ..
त्यावर कॉमेंट म्हणून ..
मी माझे स्टेटस टाकते ..
मंजुषा

4)वालवर तुझ्या सारखी ..
चकरा मारते ..
तुलाच भेटल्याचे समाधान ..
मानून घेते ..
मंजुषा

5)गुप्तहेरासारखी बारीक नजर ..
साऱ्यांवर ठेवते ..
चुकतंय कोणी दिसलं ..
तर कान पीरगळते ..
मंजुषा

6)कधी चारोळ्या ,कधी कविता ..
कधी प्रबोधन ,कधी आत्मचिंतन ..
फेसबुकच्या या विश्वात ..
मुक्तपणे करते भ्रमण ..
मंजुषा
१० /११ /११

Wednesday, February 8, 2012

निवडणुकीचा खेळखंडोबा

इंद्राने देवाने फोन यमराजाला केला
धर्तीवर जायचा आर्ज कुणी केला

यमराजा नि रिपोर्ट इंद्राला केला
मतदार यादीत थोडा घोळ झाला

निवडणुकीच्या धामधुमीत देवा
काहीच कळाल नाही बघा मला

आज कुणाचा नंबर होता
नकळत कुणाला उचलला

देवा सगळ्यांचा अर्ज मान्य करा
हजार दोन हजार मिळतील मला

आधुनिक बटणाच्या मशीनचा
कसा काय महाघोटाळा झाला

कळत नाही देवा या लोकशाहीत
निवडणुकीचा खेळखंडोबा झाला

कृष्णा

Monday, January 30, 2012

हुतात्मा दिन विशेष

हुतात्मा दिना निमित्त सारया हुतात्म्यांना श्रद्धांजली...

देश स्वातंत्र्या साठी...
का सोडलात घर दार...
इंग्रजी सत्तेच्या मनात...
का माजविला हाहाकार...

स्वातंत्र्य संग्रामात
बलिदान ते दिले
देशासाठी या तुम्ही
हौतात्म्य पत्करले ..

हौतात्म्याच्या तुमच्या
विसर की हो पडला
स्वप्नापरी तुमच्या
भारत आहे का घडला ?

सागरसुत

Sunday, January 29, 2012

ऋण फेड जीवनाची .........!!

तुझ्यासाठीच जगते

एका आई कडून आपल्या चिमुकल्या बाळासाठी..
 

तुझ्यासाठीच जगते
तुझ्यासाठी कष्ट करते
जीवाचा येवढा आटापिटा
सोन्या तुझ्यासाठीच करते

तू आहेस म्हणून
जीवन जगावेसे वाटते
तुझ्या भावी आयुष्यासाठीच
आज दुनियेशी झगडते

होशील तू मोठा
करशील माझे स्वप्न साकार
हीच एक इच्चा मनी
देशील मला मायेचा आधार

देवाकडे एकाच मागणे
माझ्या बाळाला सुख दे
त्याचे दुक्ख मला देऊन
माझे उदंड आयुष्य त्याला दे

मोना

मधुचंद्राची रात


 
 
मधुचंद्राची रात, असू बाहूपाशात.........!
कोमल श्यामल तन, हरवून मी तव नयनात...........!!

वचन देवूनी तुज, मी मिलना आतुर.........!
जाता नजर मम, उभी सावरता पदर...............!!

रातीच्या त्या पूर्वसंध्येस, उभी बागेत साजणी...........!
टाकता हाथ खांद्यावर, मूर्ती ती लाजरी...........!!

नयन्नांशी भिडता नयन, थोडा मी संभ्रमित............!
सुटता नजर नजरेतून, भासे ती कासावीस...........!!

टाकुनी पावुले गवतावर, का अशी दूर सखे चालली..........!
नजरेतुनी मज, तू का अशी दूर भासली...............!!

येता रात, रंगून सवे प्रणयात, दोघेही यौवनात मदमस्त असू..........!
फुलवुनी प्रेम ज्यात सखे, शृंगारात न्हालेले असू...........!!

मयूर आपटे .......!!

बघ ना सखे तो चंद्र....

बघ ना सखे तो चंद्र....
किती आहे निरागस...
अगदी तुझ्यासारखा....
असच काय ते तू बोलायचास....

बघ ना सख्या त्या चंद्राला...
तो हि आज एकटा पडला आहे...
अगदी माझ्यासारखा......
आता कधी रे मला तू भेटायचास......

एकटक त्या चंद्राकडे.....
मग मी पाहत बसायचे....
आज हि चंद्र आहे सोबत...
तुझी वाट किती पाहत राहायचे...????
सुप्रिया......

Sunday, January 8, 2012

पुन्हा मी माझा- चंद्रशेखर गोखले..

पुन्हा मी माझा- चंद्रशेखर गोखले..

मी माझा- चंद्रशेखर गोखले..

मी माझा- चंद्रशेखर गोखले..

Tuesday, January 3, 2012

रणजीत च्या चारोळ्या-मेहफ़िल

का कोणास ठाऊक
पुन्हा पुन्हा यावेसे
वाटते तुझे मदमोहक
नृत्य पाहण्या मन माझे
तुझ कडे वळते...
रणजीत

मी हि झुंबर होतो
अशाच रंग महाली
जिथे उधळत असते
अखंड योवन लाली
रणजीत

तू केसात माळतेस गजरा
नृत्या बरोबर गातेस हि
करुनी हसतमुख चेहरा
म्हणूनच का लोक म्हणती याला मुजरा
रणजीत

तू सुंदर लावण्यवती मेनका
करशी अनोखी अदा
मग मीही रंगेल होऊन
उधळतो दोलतजादा
होऊन फकीर तिथला
रणजीत

कित्येक मर्द येती
तुझ्या दारा
आयकुनी नृत्य,गाणी
ठेऊन जातो भाव वेगळा
रणजीत

तू नृत्य करता करता
गायशी गाणी
मदहोश करते त्याहुनी
तुझी नजर बोली
रणजीत

संपत चालला योवन रंग
सुरकुतलेले केतकी अंग
म्हणून कोरड्या दुष्कागत गर्दी
कधी तरी होते आता सुरांची दर्दी
रणजीत

उदास तू बसली
मोकळ्या महाली
काळ तो आठवता
स्वतः हसली स्वतः वरती
रणजीत

मी याच आशेने इथे बसलेला
सजेल बैठक गर्जतील वादये
जुळेल ते नाते हाताचे गजर्याशी
तू पुन्हा तीर्क्शील या रंग महाली
रणजीत

मला वाटले नव्हते
माझी आस हि
मृगजळ होऊन बसेल
तुझी साथ आता मला
कधीच नसेल
रणजीत

तुला पाहताच नाव
माझे हरवले होते
तुझ्याच ओठा वरती
मग आले होते
रणजीत

तुज्याच पायाखाली
पैंजण बनून
हरवलो होतो
नृत्य संपताच
स्वतःला सापडलो
रणजीत

सांग ना पुन्हा कधी
मला साद देशील
तुज्या हाकेसाठी
माझे कान हि तरसतील
रणजीत

का हि वेळ आली
अन तू मला
रंग महालातून
जाण्यासाठी शुभ रात्री म्हंटली...
रणजीत

अशी काय जादू
तुझ्या मैफिली
मी न राहतो
माझ्या मनी...
रणजीत

अग थोड बोलाचे
तरी होतेस मी
तर महाल बांधला
होता तुझा नावचा
त्यात तू होती नर्तिका...
रणजीत

तुझ्या त्या आदाने
मी तर झालो होतो फिदा
न राहून लोक हि बोलले
झाला हा हि वेडा..
रणजीत

तुझ्या मैफिलीत
येती लोक खूप
मी हि कोपरा
पकडून बसतो चूप
रणजीत

आजही मी रंग महाली
जाऊन येतो जरी
तू नसली तरी तुझ्या
आठवणी ताज्या करतो
रणजीत

तू तर नटरंग
नारी भलतीच
भुरळ पाडी तुझी
नृत्य,गाणी...
रणजीत

Monday, January 2, 2012

निळ्या स्वप्नात रमणारी मी

निळ्या स्वप्नात रमणारी मी
स्वप्न पहाट उजाडण्याची वाट पाहते
भावनांच्या ओल्या वाळूवर
पावलांचे ठश्यावर ठसे उमटवते !!
बेचैन वेदनेत रमणारी मी
ओल्या दवात भिजत राहते
पावसात खेळता खेळता
ओले पाय किनार्यावर रुतवते!!
रात्रीचे उसाशे पेलणारी मी
वेदनांचे हुंकार झेलीत राहते
पंख मिटल्या झोपड्यांचे
दुःख अनुभवत राहते
जीवनाचे संदर्भ कधी शोधते
तर कधी मोजत राहते ......
........संध्या......