Saturday, December 31, 2011

शुभेच्छा नववर्षाच्या

  क्षण आला गड्या क्षण गेला
कधी कुणासाठी तो थांबला
सेकंद, मिनिट,तास,दिन
वर्षही तो हळूच रांगला

गेला क्षण भलाबुरा जरी
जो गेला तो असेच चांगला
आल्या क्षणाच्या करा स्वागता
त्यासी बनवा तुम्ही आपला

बुऱ्या आठवणी त्या गाडुनी
बांधा नव्या स्वप्नांचा इमला
भल्यांची शिदोरी घ्या सोबती
आनंदाने जगा जीवनाला

नववर्षाच्या नव्या प्रतिज्ञा
धरा मनी नव संकल्पाला
सुख,समृद्धी,आरोग्य लाभो
शुभेच्छा साऱ्या परिवाराला
@ शंकर पाटील - ३१/१२/२०११

1 comments:

Post a Comment