Friday, December 23, 2011

पदर

उन्हातान्हात राबताना
थोडी सावली देतो हा पदर
घामानं माखल्या चेहऱ्याला
हळुवारपणे पुसतो हा पदर

हमसून रडणाऱ्या लेकराला
मायेच्या सावलीत घेतो पदर
थंडीनं बाळ कुडकुडताना
कधी तो बनतो गरम चादर

गरिबीच्या लक्तरातून कधी
उघडे पडते पदरावीन उदर
लाचारी ना दिसे कुणाला
विस्फारते विषयासक्त नजर

भिकेसाठी कधी विवश
पसरतो कुणापुढेही हा पदर
घरंदाज नारीचा संस्कार
कुळाची अब्रू झाकतो पदर
@ शंकर पाटील - २३/१२/२०११

0 comments:

Post a Comment