Saturday, December 31, 2011

"माझी लेखणी ई- त्रैमासिक" पहिला अंक

नमस्कार मित्रहो....
उजाडला तो दिवस.. "माझी लेखणी ई- त्रैमासिक" पहिल्या अंकाचा उदयाचा दिवस...

माझी लेखणी ई- त्रैमासिक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर टिचकी मारा.....

*4Shared वरून डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी मारा*

*kiwi6 वरून डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी मारा*

*Docstoc वरून डाऊनलोड, Print करण्यासाठी येथे टिचकी मारा*




ओनलाईन वाचण्यासाठी खाली जा..



माझी लेखणी ई-तैमासिक पहिला अंक

शुभेच्छा नववर्षाच्या

  क्षण आला गड्या क्षण गेला
कधी कुणासाठी तो थांबला
सेकंद, मिनिट,तास,दिन
वर्षही तो हळूच रांगला

गेला क्षण भलाबुरा जरी
जो गेला तो असेच चांगला
आल्या क्षणाच्या करा स्वागता
त्यासी बनवा तुम्ही आपला

बुऱ्या आठवणी त्या गाडुनी
बांधा नव्या स्वप्नांचा इमला
भल्यांची शिदोरी घ्या सोबती
आनंदाने जगा जीवनाला

नववर्षाच्या नव्या प्रतिज्ञा
धरा मनी नव संकल्पाला
सुख,समृद्धी,आरोग्य लाभो
शुभेच्छा साऱ्या परिवाराला
@ शंकर पाटील - ३१/१२/२०११

Friday, December 23, 2011

पदर

उन्हातान्हात राबताना
थोडी सावली देतो हा पदर
घामानं माखल्या चेहऱ्याला
हळुवारपणे पुसतो हा पदर

हमसून रडणाऱ्या लेकराला
मायेच्या सावलीत घेतो पदर
थंडीनं बाळ कुडकुडताना
कधी तो बनतो गरम चादर

गरिबीच्या लक्तरातून कधी
उघडे पडते पदरावीन उदर
लाचारी ना दिसे कुणाला
विस्फारते विषयासक्त नजर

भिकेसाठी कधी विवश
पसरतो कुणापुढेही हा पदर
घरंदाज नारीचा संस्कार
कुळाची अब्रू झाकतो पदर
@ शंकर पाटील - २३/१२/२०११

Thursday, December 22, 2011

बहीणाबाई चौधरी यांच्या " कविता आणि ओव्या


बहीणाबाई चौधरी यांच्या " कविता आणि ओव्या " -

Thursday, December 15, 2011

माझी जन्मठेप - वि. दा. सावरकर..

माझी जन्मठेप-1
माझी जन्मठेप-2

Thursday, December 8, 2011

करंजी - व. पु. काळे.mp3

डाउनलोड करण्यासाठी खाली टिचकी मारा...

Saturday, December 3, 2011

पेरनी पेरनी-बहिणाबाई


पेरनी पेरनी
आले पावसाचे वारे
बोलला व्होलगा
पेर्ते व्हा रे पेर्ते व्हा रे
पेरनी पेरनी
आले आभायांत ढग
ढगांत बाजंदी
ईज करे झगमग
पेरनी पेरनी
आभायांत गडगड
बरस बरस
माझ्या उरीं धडधड
पेरनी पेरनी
काढा पांभरी मोघडा
झडीन तो झडो
कव्हा बर्सोती चौघडा
पेरनी पेरनी
आला धरतीचा वास
वाढे पेरनीची
शेतकर्‍या, तुझी आस
पेरनी पेरनी
आतां मिरूग बी सरे
बोलेना व्होलगा
पेर्ते व्हा रे पेर्ते व्हा रे
पेरनी पेरनी
भीज भीज धर्ती माते
बीय बियान्याचे
भरून ठेवले पोते
पेरनी पेरनी
अवघ्या जगाच्या कारनीं
ढोराची चारनी
कोटी पोटाची भरनी
पेरनी पेरनी
देवा, तुझी रे करनी
दैवाची हेरनी
माझ्या जीवाची झुरनी

*बहिणाबाई चौधरी*

आला पह्यला पाऊस-बहिणाबाई

आला पह्यला पाऊस
शिपडली भुई सारी
धरत्रीचा परमय
माझं मन गेलं भरी
आला पाऊस पाऊस
आतां सरीवर सरी
शेतं शिवारं भिजले
नदी नाले गेले भरी
आला पाऊस पाऊस
आतां धूमधडाख्यानं
घरं लागले गयाले
खारी गेली वाहीसन
आला पाऊस पाऊस
आला लल्‌करी ठोकत
पोरं निंघाले भिजत
दारीं चिल्लाया मारत
आला पाऊस पाऊस
गडगडाट करत
धडधड करे छाती
पोरं दडाले घरांत
आतां उगूं दे रे शेतं
आला पाऊस पाऊस
वर्‍हे येऊं दे रे रोपं
आतां फिटली हाऊस
येतां पाऊस पाऊस
पावसाची लागे झडी
आतां खा रे वडे भजे
घरांमधी बसा दडी
देवा, पाऊस पाऊस
तुझ्या डोयांतले आंस
दैवा, तुझा रे हारास
जीवा, तुझी रे मिरास..

*बहिणाबाई चौधरी*

रांगोळी प्रदर्शन-घाटकोपर, मुंबई

दिवाळी म्हटले कि दिव्यांचा सण, अन दारात रांगोळीची  आरास,  घाटकोपर (प) मुंबई ला प्रत्येक वर्षी रांगोळी प्रदर्शन  भरते अन मी आवर्जून पाहायला जातो. या वर्षी देखी गेलो होतो अन त्याचा आस्वाद तुम्ही घ्यावा म्हणून हि भेट तुमच्या साठी.. 


Add caption





Add caption






Add caption



Add caption


Add caption


Add caption



Add caption