Showing posts with label प्रेम कविता. Show all posts
Showing posts with label प्रेम कविता. Show all posts

Sunday, January 29, 2012

ऋण फेड जीवनाची .........!!

मधुचंद्राची रात


 
 
मधुचंद्राची रात, असू बाहूपाशात.........!
कोमल श्यामल तन, हरवून मी तव नयनात...........!!

वचन देवूनी तुज, मी मिलना आतुर.........!
जाता नजर मम, उभी सावरता पदर...............!!

रातीच्या त्या पूर्वसंध्येस, उभी बागेत साजणी...........!
टाकता हाथ खांद्यावर, मूर्ती ती लाजरी...........!!

नयन्नांशी भिडता नयन, थोडा मी संभ्रमित............!
सुटता नजर नजरेतून, भासे ती कासावीस...........!!

टाकुनी पावुले गवतावर, का अशी दूर सखे चालली..........!
नजरेतुनी मज, तू का अशी दूर भासली...............!!

येता रात, रंगून सवे प्रणयात, दोघेही यौवनात मदमस्त असू..........!
फुलवुनी प्रेम ज्यात सखे, शृंगारात न्हालेले असू...........!!

मयूर आपटे .......!!

Friday, October 28, 2011

प्रेम करु नका कधी

प्रेम करु नका कधी,
असे सर्वजण म्हणतात गं_
पण कोणी किती काही करा,
प्रेम ते आपोआप होत गं_

त्या त्या वेळेला त्या त्या क्षणी,
बरोबर योगायोग जुळतात गं_
ते सुंदर नाजुक क्षण मग_
अविस्मरणीय होवुन जातात गं_

म्हटलयं ना कोणीतरी या आयुष्यात,
प्रत्येक जण प्रेमात पडतो ग_
कारण प्रत्येकाच्या मनात एक,
हृद्यमर्दम दडलेला असतो ग_

मिलिँद_

Wednesday, October 5, 2011

तू माझा असणं म्हणजे

तू माझा असणं म्हणजे
नुसतं माझ असणं नव्हे
तू माझ असणं म्हणजे
जग माझ असणं
अशा या जगात
तुझ्या सोबती शिवाय
जगणं म्हणजे
नुसतंच जगणं आहे
नाहीतर पावला पावलाला मरण आहे
रेशु

Thursday, September 15, 2011

तू

तू
माझ्या ध्यासात तू ..
माझ्या शब्दात तू ..
माझ्या श्वासात तू ..
माझ्या डोळ्यात तू ..
... तू आणि फक्त तूच ..
माझ्या कल्पनेच्या साम्राज्याताला ..
अनभिषिक्त सम्राट आहेस तू ...
रंग तरी कुठे आहे आपला वेगळा ..
मी तुझी खुळी आणि तू माझा खुळा..
मंजुषा १५ /९ /२०११